‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि तिचा पती निक जोनस (Nick Jonas) या दोघांचे अनेक चाहते आहेत. पण प्रियांका लग्न झाल्यापासून बऱ्याचदा वेगवेगळ्या कारणांसाठी ट्रोल होत असते. निक आणि प्रियांका नेहमीच लग्नाच्या आधीपासून कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. सध्या प्रियांका जरी बॉलीवूडमधील चित्रपट करत नसली तरीही तिचा फॅन फॉलोईंग काही कमी झालेला नाही. जितकी ती चाहत्यांना आवडते तितकंच तिला काही बाबतीत ट्रोलही केलं जातं. प्रियांकाची छोटीशी चूकदेखील तिला ट्रोल होण्यासाठी कारणीभूत ठरत असते. पुन्हा एकदा तिच्या एका लहानशा चुकीमुळे प्रियांका चोप्रा ट्रोल झाली आहे. यावेळीदेखील ती ज्या गोष्टीवरून ट्रोल झाली आहे ते अगदीच नगण्य कारण आहे. पण तरीही सोशल मीडियावर तिला भरभरून प्रतिक्रिया देत ट्रोल करण्यात आलं आहे. आता तुम्ही म्हणाल पुन्हा प्रियांकाने नक्की काय केलं? तर आम्ही तुम्हाला सांगतो.
घटस्फोटाची बातमी दिल्याबद्दल प्रियांका आणि निक करणार मासिकाविरूद्ध कारवाई
निक जोनसचं वय चुकीचं सांगितलं!
बॉलीवुड सेलिब्रिटीजना आता ट्रोल (troll) होणं ही काही नवी गोष्ट राहिलेली नाही. प्रत्येक लहानसहान गोष्टींवर बॉलीवूड असो अथवा हॉलीवूड सर्वांनाच सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येतं. डेटिंगच्या अफवेपासून ते अगदी लग्न आणि चित्रपटांच्या निर्णयांपर्यंत सर्वच गोष्टीत सर्वात जास्त ट्रोल होण्याचा अनुभव असेल तर तो आहे प्रियांका चोप्राला. पुन्हा एकदा तिच्या वाट्याला हा अनुभव आला आहे. प्रियांकाने यावेळी असं काही केलं आहे की, ज्यामुळे तिला जास्तच ट्रोल करण्यात येत आहे. नुकतंच प्रियांकाने आपला आणि निकचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला, ज्यामध्ये तिने निकचं वय चुकीचं लिहिलं आहे. त्यामुळे सोशल मीडिया युजर्सना आयती संधीच चालून आली. त्यांनी पुन्हा एकदा प्रियांकाला ट्रोल करायला सुरुवात केली. प्रियांकाने फोटोच्या कॅप्शनमध्ये निकचं वय एक वर्षाने वाढवून 27 लिहिलं आहे. निक सध्या 26 वर्षांचा आहे. त्याच्या वाढदिवसाला खरं तर आता केवळ 12 दिवस शिल्लक आहेत. येत्या 16 सप्टेंबरला निक 27 वर्षांचा होईल. पण तरीही ट्रोलर्सने प्रियांकाला पुन्हा एकदा या गोष्टीवरून ट्रोल केलं आहे. इतकंच नाही तर अनेकांनी प्रियांकाला कमेंट्समध्ये निकचं योग्य वय सांग असंही लिहिलं आहे. अर्थात या सगळ्याने प्रियांका आणि निकला नेहमीप्रमाणेच काही फरक पडणार नाही. पण पुन्हा एकदा चुकीच्या गोष्टीसाठी ही जोडी चर्चेत आली आहे हे नक्की.
प्रियांका चोप्रा आणि निक जोनसचे वेकेशन फोटो व्हायरल
प्रियांका आणि निक नेहमीच व्यक्त करतात प्रेम
प्रियांका आणि निक जोनस एकमेकांना 2016 मध्ये भेटले. त्यानंतर एकमेकांना डेट करायला लागले. 2017 मध्ये गाला अवॉर्ड्स दरम्यान त्यांनी पब्लिक अपिरिअन्स दिला. त्यानंतर ते अधिकाधिक जवळ आले आणि दोघांनी 2018 वर्षाखेरीस लग्नही केलं. या दोघांनी भारतातील जयपूर येथे हिंदू आणि ख्रिश्चन या दोन्ही पद्धतीने लग्न केली असून दोन्ही लग्न अगदी शाही पद्धतीने झाली होती. त्यानंतर प्रियांका पुन्हा न्यूयॉर्कला निघून गेली. हल्ली प्रियांका निकच्या अनेक कॉन्सर्ट्सना त्याला साथ देताना दिसते. तर लवकरच तिचा फरहान अख्तरबरोबर चित्रपट येत असून ती त्याच्या प्रमोशनसाठी पुन्हा एकदा भारतात येईल असं म्हटलं जात आहे.
प्रियांका – निक ख्रिश्चन पद्धतीने विवाहबद्ध