ADVERTISEMENT
home / मनोरंजन
Project Streedhan Latest Campaign Focuses On The Best Gift For pregnant women in Marathi

प्रत्येक गरोदर स्त्रीने पाहायलाच हवी ‘ही’ जाहिरात, सोशल मीडियावर होतेय व्हायरल

गरोदरपण हे प्रत्येक महिलेसासाठी खास असतं. कारण हा जितका आनंदाचा काळ असतो तितकाच सुरक्षित राहण्याचाही असतो. गरोदरपणात महिलांच्या शरीरात आणि मनात अनेक बदल होत असतात. बाळ सुदृढ आणि निरोगी होण्यासाठी महिलांनी गरोदरपणात स्वतःची विशेष काळजी घ्यायला हवी. यासाठी जाणून घ्या प्रेगन्सीमध्ये कशी घ्याल काळ | Pregnancy Care Tips In Marathi नुकतंच प्रोजेक्ट स्त्रीधनने गरोदर महिलांसाठी एक अशी जाहिरात बनवली आहे जी सध्या सोशल मीडियावर सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. प्रत्येक गरोदर स्त्री आणि तिच्या घरातील लोकांनी पाहावी अशी ही जाहिरात आहे. अभिनेत्री सोनम कपूर लवकरच आई होणार आहे. ही जाहिरात तिला इतकी आवडली की तिनेही काही दिवसांपूर्वी तिच्या इन्टा अकाउंटवरून शेअर केली होती.

का आहे ही जाहिरात खास

प्रोजेक्ट स्त्रीधनमधून नेहमीच वेगळ्या आणि हटके स्टाईलने महिलांना आरोग्याचा सल्ला जाहिरातींच्या माध्यमातून दिला जातो. नुकतीच प्रदर्शित करण्यात आलेली त्यांची जाहिरात सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय. लोह- Iron हे उत्तम आरोग्यासाठी अतिशय गरजेचं असतं. मात्र गरोदरपणात महिलांना सर्वात जास्त लोहची गरज असते. कारण गरोदरपणात होणाऱ्या शारीरिक बदलांमुळे तिच्या शरीरात लोहची झीज होत असते. अनेकदा आरोग्य तपासणी दरम्यान भारतीय महिलांमध्ये गरोदरपणात लोहची कमतरता असलेलं जास्त प्रमाणात आढळून आलेलं आहे. ज्याचा वाईट परिणाम तिच्या शरीर आणि बाळाच्या जन्मावर होतो. म्हणूनच प्रोजेक्ट स्त्रीधनने ही जाहिरात बनवली आहे. या जाहिरातीचा मूळ उद्देश भारतीय महिलांमध्ये  याबाबत जागरूकता आणणे हा आहे. यासाठीच जाणून घ्या जाणून घ्या गरोदरपणात काय खावे | Pregnancy Diet Chart In Marathi,

तुम्ही पाहिली का ही जाहिरात

जाहिरातमध्ये एक गरोदर महिला आणि तिचे डोहाळजेवण दाखवण्यात आलं आहे. भारतात डोहाळजेवण हा खास विधी महिला गरोदर असताना तिच्या बाळासाठी केला जातो. सातव्या अथवा नवव्या महिन्यात डोहाळजेवण केलं जातं. ज्यामध्ये कुटुंबिय, नातेवाईक आणि मित्रपरिवाराला खास आमंत्रण दिलं जातं. या कार्यक्रमात गरोदर महिलेला आवडते पदार्थ खाऊ घातले जातात आणि तिला सुखसमृद्धीसाठी सोनं चांदी अथवा हिऱ्याच्या भेटवस्तू दिल्या जातात. मात्र या जाहिरातीमध्ये या महिलेला लोहयुक्त पदार्थ खाऊ घातले जात आहेत आणि याच पदार्थांचे दागदागिने परिधान केले जात आहेत. कारण जर या काळात महिलेला लोहयुक्त पदार्थ दिले नाहीत तर ती अशक्त होऊ शकते. म्हणूनच तिच्या रक्तात लोह वाढावं यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. या जाहिरातीमधून लोकांना हा संदेश दिला जात आहे की, गरोदर महिलांना या काळात सोन्याचांदीची नाही तर लोहची गरज असते. त्यामुळे या महत्त्वपूर्ण अशा जाहिरातीची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर ही जाहिरात व्हायरल होत असून यामधून महिलांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित केलं जात आहे. या जाहिरातीसाठी वापरण्यात आलेलं गाणंही लक्षवेधी आहे. यासोबतच वाचा गरोदर राहण्यासाठी उपाय, महत्त्वाची माहिती (Pregnant Rahanyasathi Upay In Marathi)

याआधी 2019 मध्ये धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर अशीच एक जाहिरात प्रदर्शित करण्यात आली होती. ज्यामध्ये महिलांनी सोनं खरेदी करण्यावर भर देण्यापेक्षा आरोग्य चांगलं राहण्यासाठी लोहयुक्त पदार्थ खाण्यावर भर द्यायला हवा असा संदेश देण्यात आला होता.

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

01 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT