पावसाळा जेव्हा आल्हाददायी वातावरण घेऊन येत असतो. तितकेच तो अनेक आजारांनाही निमंत्रण देतो. अशा या पावसाळ्याच्या काळात काय खावे काय खाऊ नये असा प्रश्न पडणे हे फारच साहजिक आहे. कारण या काळात दूषित पाण्यातून अनेक आजार होण्याची शक्यता असते. अशावेळी आहार-विहार चांगले असणे फारच जास्त गरजेचे असते.अशावेळी आहारात योग्य गोष्टी असतील तर पोटाचा त्रास होत नाही.पण या दिवसात मस्त गरमगरम भजी, चमचमीत आणि चुरचुरीत खाण्याची इच्छा होते. पण त्यासोबत जर तुम्ही पुदिन्याची चटणी खाल्ली तर तुम्हाला नक्कीच आराम मिळू शकतो. या काळात पुदिन्याची चटणी का खायला हवीत यामागेही अनेक कारणे आहेत.चला जाणून घेऊया या काळात का खायला हवी पुदिन्याची चटणी. या शिवाय पुदिन्याचा पराठा ही ट्राय करायला हवा
पुदिन्याचा वापर
भारतात पुदिन्याचा वापर हा अनेक खाद्यपदार्थामध्ये केला जातो. अगदी पाणीपुरीपासून ते बिर्याणीपर्यंत अनेक पदार्थांमध्ये याचा वापर येतो. इतकेच नाही. सरबतांमध्येही याचा वापर केला जातो. पुदिना हा पाचक असल्यामुळे त्याचा रस किंवा त्याचा अर्क सोड्यामध्ये घातला जातो. त्यामुळेही त्याची चव वाढण्यास मदत मिळते. त्यामुळे भारतीय घरांमध्ये पुदिन्याचा वापर अगदी रोजच्या जेवणात हमखास केला जातो. घरात चिकन असले तरी देखील हमखास त्यासोबत पचनासाठी म्हणजून पुदिन्याची चटणी दिली जाते. जी नुसती चवीलाच चांगली नसते. तर त्यामुळे पचनाला मिळते म्हणून ती दिली जाते.
पावसाच्या दिवसात अवश्य खा पुदिन्याची चटणी
पावसाच्या दिवसात तुम्ही पुदिन्याची चटणी का खायला हवी असा विचार करत असाल तर तुम्हाला या गोष्टी माहीत असायला हव्यात
- पुदिना हा कफनाशक आहे. पावसाळ्यात वातावरणात ओलावा, थंडावा आलेला असतो. शिवाय वातावरणातही दमटपणा असतो. अशावेळी श्वसनमार्गाला सूज येण्याची शक्यता असते. कफाचा त्रासही या दरम्यान होतो. या दिवसात तुम्हाला कफ होत असेल तर तुम्ही अवश्य पुदिना खायला हवा.
- कफ झाल्यामुळे नाक चोंदणे, श्वास घेण्यास त्रास होणे, खोकला येणे या सगळ्या गोष्टी तक्रारी कमी होतात.
- वाताचा त्रास होणाऱ्यांना या दिवसात पोटफुगी आणि पोटदुखी होण्याची भिती असते. अशावेळी पुदिना फार उपयोगी पडतो. पुदिन्याचे सेवन केले तर पोट बरे होण्यास मदत मिळते.
- जुलाबाचा त्रास या दिवसात होण्याची शक्यता अधिक असते. काहीही खाल्ले तरी पोट फुगून येणे आणि पातळ शौचाला होण्याचा त्रास होतो. अशावेळी पुदिन्याची चटणी खाल्ली तर त्यामुळे शौचास थांबू शकते.
- ज्यांना श्वास घेण्याचा त्रास असेल अशांनाही पुदिन्याचे सेवन केल्यामुळे आराम मिळू शकतो.
पुदिना खाताना तो ताजा असावा याची काळजी घ्या. पुदिना ताजा असेल तर तो अधिक परिणामकारकपणे काम करतो. जास्त पुदिना खाल्ला तरी देखील तुम्हाला मळमळ होऊ शकते. त्यामुळे पुदिना जपून खा.