ADVERTISEMENT
home / Festival
रामनवमीला राशीनुसार नैवेद्य दाखवल्यास नक्कीच होईल रामकृपा

रामनवमीला राशीनुसार नैवेद्य दाखवल्यास नक्कीच होईल रामकृपा

चैत्र मासाच्या नवमीला रामनवमी साजरी केली जाते. भारतभर अगदी आनंद आणि उत्साहात हा सण साजरा केला जातो. या वर्षी रामनवमीचा सण हा 21 एप्रिलला साजरा केला जाईल. वेदशास्त्रानुसार त्रेतायुगात रावणाच्या अत्याचारांचा अंत करण्यासाठी आणि पुन्हा धर्माची स्थापन करण्यासाठी भगवान विष्णूंनी पृथ्वीवर मनुष्याच्या रूपात राम अवतार घेतला होता. साधारणतः दरवर्षी रामनवमीचा सण हा मार्च-एप्रिल दरम्यानच येतो. हिंदू कॅलेंडरनुसार रामनवमी चैत्र महिन्याच्या नवव्या दिवशी असते. जो चैत्र महिन्याचा शेवटचा दिवस असतो. त्यामुळेही हिंदू सणांमध्ये रामनवमीला विशेष महत्त्व आहे. संपूर्ण देशात जरी रामनवमी साजरी केली जात असली तरी खासकरून उत्तर भारतात भगवान रामाची जन्मभूमी अयोध्या येथे या सणाचं भव्यदिव्य आयोजन केलं जातं. रामनवमीच्या दिवशी देवळांमध्ये भजन-किर्तनाचं आयोजन केलं जातं आणि अनेक ठिकाणी या निमित्ताने शोभायात्राही काढली जाते. या दिवशी बरेच जण उपवास धरतात. 

प्रसाद स्वरूपात पंचामृत श्रीखंड, खीर हलवा यांचा नैवेद्य दाखवला जातो. रामाच्या पूजेसाठी दूध आणि तूपाच्या वापराचं फार मह्त्त्व असतं आणि याच कारणामुळे रामनवमीच्या शुभदिवशी तूपापासून बनवलेले गोड पदार्थ आवडीने खाल्ले जातात. हे पदार्थ नेवैद्य म्हणून दाखवल्यास श्रीराम प्रसन्न भक्तांच्या कष्टाचं निवारण नक्कीच करतात. उपवास आणि नेवैद्य हा या सणाचा महत्त्वपूर्ण भाग आहेत. रामनमीची माहिती (Ram Navami chi Mahiti) तुम्हाला असेलच. तुम्ही रामनवमी शुभेच्छाही आवर्जून देत असाल. पण तुम्हाला हे माहीत आहे का, या दिवशी प्रभू रामांना तुमच्या राशीनुसार नैवेद्य दाखविल्यास त्यांची अपरंपार कृपा तुमच्यावर होते. 

राशीनुसार श्रीरामाला दाखवा नेवैद्य Ram Navami Bhog According to Sunsign

मेष – मेष राशीच्या लोकांनी शुद्ध तुपातील लाडू आणि डाळिंब्याचा नैवेद्य रामाला दाखवावा. यामुळे नक्कीच लाभ होईल. 

ADVERTISEMENT

वृषभ – तुमची रास वृषभ असेल तर रामनवमीला श्रीरामाला रसगुल्ले नेवैद्य म्हणून ठेवा. तुमची प्रत्येक इच्छा निश्चितच पूर्ण होईल. 

मिथुन – मिथुन राशीच्या लोकांना काजूपासून बनवलेली कोणतीही मिठाई जसं काजूकतली, काजू बर्फी किंवा काजूरोलचा नैवेद्य श्रीरामाला दाखवावा. तुमच्या प्रत्येक कष्टाचं निवारण होईल. 

कर्क – तुमची रास कर्क असल्यास माव्यापासून बनवलेली मिठाई आणि नारळाचा भोग भगवान रामासमोर दाखवावा. 

सिंह – सिंह रास असणाऱ्यांनी गूळ किंवा बेलाच्या फळाचा नैवेद्य श्रीरामापुढे ठेवावा. 

ADVERTISEMENT

कन्या – कन्या राशीच्या लोकांनी तुळशीची पानं आणि नासपती किंवा कोणतंही हिरव्या रंगाचं फळ रामाला अर्पित करावं. तुमच्या समस्याचं निवारण नक्कीच होईल. 

तूळ – तूळ रास असल्यास कलाकंद आणि सफरचंदाचा नैवेद्य दाखवावा. 

वृश्चिक – तुमची रास वृश्चिक असल्यास गुळाची रेवडी भगवान रामाला अर्पित करावी. 

धनू – या राशीच्या लोकांनी भगवान रामाला बेसनाची चिक्की किंवा बेसनापासून बनवलेली शुद्ध तुपातली कोणतीही मिठाई नैवेद्य म्हणून दाखवावी. नक्कीच लाभ होईल. 

ADVERTISEMENT

मकर – मकर रास असल्यास रामनवमीच्या निमित्ताने गुलाबजाम आणि काळ्या द्राक्षांचा नैवेद्य श्रीरामाला दाखवावा. 

कुंभ – कुंभ राशीच्या लोकांनी चॉकलेटी रंगाची कोणतीही बर्फी आणि चिकूचा प्रसाद श्रीरामापुढे ठेवावा. 

मीन – भगवान श्रीरामाला मीन रास असल्यास जिलबी आणि केळ्याचा नैवेद्य दाखवावा. सर्व अडकलेली कामे नक्कीच मार्गी लागतील.

अशाप्रकारे नैवेद्या दाखवा मग तुमच्यावर श्रीरामाची कृपादृष्टी नक्की होईल. जर देवळात जाणं शक्य नसल्यास तुम्ही घरच्याघरीही हा नैवेद्य श्रीरामाला अर्पण करू शकता. तुमची इच्छा आणि शक्य असल्यास गोरगरीबांनाही रामनवमीच्या निमित्ताने अन्नदान नक्की करा. तसंच रामनवमीला नेवैद्यासोबतच रामरक्षेचं पठणही आवर्जून करा. या पठणामुळे तुम्हाला सकारात्मक उर्जा मिळेल आणि आयुष्यातील कोणत्याही संकटाला तोंड देण्यासाठी तुम्ही समर्थ व्हाल.

ADVERTISEMENT
16 Apr 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT