ADVERTISEMENT
home / आरोग्य
मासिक पाळीत येत असतील रॅशेश

मासिक पाळीत येत असतील रॅश, तर नक्की वापरायला हवीत ही उत्पादने (Rashes Problems And Products To Try)

मासिक पाळी ही दर महिन्याची कटकट आहे असे अनेकांना वाटते. कारण मासिक पाळीपेक्षा मासिक पाळीत वापरण्यात येणारे सॅनिटरी पॅड नकोसे होतात.कारण पॅड योग्यवेळी बदलायला मिळाले नाहीत की, त्याचा परिणाम हा रॅश येण्यावर होतो. विशेषत: उन्हाळ्यात हा त्रास आपल्याला अधिक जाणवू लागतो. कारण आपण घातलेले कपडे आणि मासिक पाळी हायजिन याचा विचार करता त्याचा त्रास प्रायव्हेट पार्टवर होणे अगदी स्वाभाविक आहे. बाजारात मिळणारे वेगवेगळे सॅनिटरी पॅड वेगवेगळ्या गुणधर्मांनी युक्त असतात. त्वचेचा विचार करता त्यामध्ये काही ङटक समाविष्ट केलेले असतात. पण असे केले तरीदेखील तुम्हाला हा त्रास होणे स्वाभाविक असते.  मासिक पाळीत तुम्हालाही रॅश येत असतील तर तुमच्यासाठी काही खास उत्पादने (Rashes problems and products to try)आम्ही निवडली आहेत.

चांगल्या सॅनिटरी पॅडची निवड

महागडे सॅनिटरी पॅड चांगले असतत असा दावा आम्ही अजिबात करत नाही. त्यामध्ये असलेले घटक आणि त्याची क्षमता हे पॅड चांगले आहेत की नाही यावरुन ठरत असते. तुम्हाला चांगले सॅनिटरी पॅड निवडायचे असतील तर त्यामधील घटक तुम्ही सगळ्यात आधी तपासून घ्या. सॅनिटरी पॅड हे नेहमी पातळ आणि बायोडिग्रडेबल असतील तर त्याचे विघटन होण्यास मदत तर होतेच शिवाय ते प्लास्टिक मांड्याना घासत नाही.(Rashes problems and products to try) त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी अजिबात जळजळ होत नाही.  उस,मका यांच्या चोथ्याचा उपयोग करुन त्यांना फ्लॅट केले जाते. त्यानंतर त्यापासून पॅड तयार केेले जाते असे पॅड घेतल्यानंतर ते घेतल्यासारखे देखील वाटत नाही. कोणतेही सॅनिटरी पॅड हे काही काळानंतर तुम्ही हमखास बदलायला हवे. कारण त्यानंतर त्याचा त्रास होण्याची शक्यता असते. 

इंटिमेट जागेची घ्या काळजी

इंटिमेट जागा ही कायम स्वच्छ असायला हवी.कारण त्यामुळे तुम्हाला जर रॅशेश आले त्याची काळजी घेणे सोपे जाईल. जर तुमहाला रॅशेशमुळे खूपच जळजळ होत असेल तर तुम्ही त्या जागी एखादे इंटिमेट ऑईल लावण्यास काहीच हरकत नाही. तुम्ही ज्यावेळी सॅनिटरी पॅड लावता त्यावेळी तुमच्या नितंब आणि मांड्याच्या आतल्या भागाला तुम्ही एखादे ऑईल लावा. त्यामुळे तुम्हाला थोडासा थंडावा मिळण्यास मदत मिळते. विशेषत: रात्री झोपताना तुम्ही सॅनिटरी पॅड बददल्यानंतर तेल लावा. त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल. तुमची ती त्वचा देखील काळवंणार नाही. मासिक पाळीत मेन्स्टुरल कपचा वापर करत असाल तर तुम्हाला या अडचणींचा सामना करावा लागणार नाही. पण सगळेच याचा वापर करत नाही. सॅनिटरी पॅडच जास्त वापरले जाते

मांड्याना लावा रॅश क्रिम

खूप जणांच्या मांड्या जाड असतील तर अशांना पिरेड्समध्ये मांड्या घासण्याचा त्रास होऊ लागतो. मांड्यांना मांड्या घासणे (Thigh Chefing) चा त्रास असह्य होत असेल आणि मासिक पाळीत तर तो अधिक होत असेल तर त्यावेळी मात्र तुम्हाला त्या ठिकाणी एखादे चांगले रॅश क्रिम लावणे देखील गरजेचे आहे. कुठेही बाहेर जाताना तुम्ही तुमच्या मांड्यांना चांगल्या प्रतीची क्रिम लावली की, त्याचा फायदा अधिक होतो. तुम्हाला त्याचा त्रास होणे कालांतराने कमी देखील होईल. 

ADVERTISEMENT

असाही होऊ शकतो त्रास

मासिक पाळीत पिरेड्सने केवळ रॅशच येत नाही तर तुम्हाला काही इतर गोष्टींचाही त्वचेसाठी त्रास होत असतो. त्याची काळजी घेणे देखील गरजेचे असते.

  1. योनी मार्गाची जागा कोरडी पडणे. 
  2. नितंबावर लाल चट्टे उठणे, त्यामुळे तेथील भाग सोलवटून निघणे 
  3. खूप वेळा जर सॅनिटरी पॅड बदलले नाही तर रक्त लागून लागून त्या ठिकाणी अधिक खाज येऊ लागते. ही खाज अजिबात कमी होत नाही. 
  4. खूप जणांची त्वचा ही खूपच संवेदनशील असते. त्यामुळे काहींना तेथे फोडही येतात. त्यामुळे त्याची काळजी घेणे गरजेचे असते. 

आता तुम्ही मासिक पाळीत असा काही त्रास होत असेल तर काळजी घ्या

20 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT