लाडका बाप्पा घरी आला की, घरात नवचैतन्य येते. विशेषत: या कोरोनाच्या दिवसात गेली चार महिने आपण सगळे घरी आहोत की, सगळ्यांनाच नकारात्मक उर्जेने ग्रासले आहे. पण बाप्पा येणार म्हटल्यावर अनेकांनी सगळी दु:ख चिंता विसरुन त्याचे अगदी भक्तिभावाने आणि त्याच जल्लोषात स्वागत केले आहे. बाप्पाच्या आगमनाच्या निमित्ताने आरती, भजनं यांचा मस्त आनंद लुटता येतो. मोदकांवर ताव मारता येतो. डाएटसोडून मस्त गोडधोड खाता येतं. या दिवसांमध्ये बाप्पाशी निगडीत अनेक गोष्टी लहान मुलांना सांगितल्या जातात. टीव्हीवरही अनेक कार्यक्रम लागतात. तुम्हाला माहीतच असेल की, गणपती बाप्पाचे आगमन झाल्यानंतर म्हणजे गणेश चतुर्थीच्या रात्री चंद्रदर्शन करणे वर्ज्य आहे. लहान मुलांनी किंवा मोठ्यांनीही चंद्राचे दर्शन करु नये म्हणून काही काळ घरातच घालवला जाचो. पण तुम्हाला यामागे असलेले नेमके कारण माहीत आहे का? चला तर आज जाणून घेऊया या मागील कथा आणि उपाय
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
तर घडले असे की
एकदा आपले लाडके बाप्पा मुषकावर सवार होऊन मोठ्या लगबगीने कुठे तरी जात होते. तेव्हा त्या गडबडीत असताना ते नेमके घसरले. त्यांना घसरताना पाहून चंद्र त्यांच्याकडे पाहून जोरजोरात हसू लागला. चंद्राला काही हसू आवरले नाही. ते पाहून गणेशाला राग आला. त्याने चंद्राकडे पाहत श्राप दिला… बाप्पा म्हणाले की, आजपासून तुझे तोंड कोणी पाहणार नाही. जो कोणी तुझे तोंड पाहील. त्यावर चोरीचा खोटा आळ येईल! घाबरलेल्या चंद्राने गणेशाला प्रसन्न करण्यासाठी मोठे तप केले.त्याच्या भक्तीमुळे गणपतीबाप्पा प्रसन्न झाले. चंद्राच्या भक्तीमुळे गणेशाने त्यांना शापातून मुक्त केले. पण तरीही भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीला मात्र तुझे तोंड कोणी पाहणार नाही. जो तुझ्याकडे पाहिल. त्यावर खोटा चोरीचा आळ येईल, ही अट मात्र कायम ठेवली. पण चंद्राने बाप्पाकडे विनंती केली, जर एखाद्याने चुकून त्या दिवशी चंद्राचे दर्शन केले तर त्याने काय करावे. माझ्या चुकीची शिक्षा एखाद्या निष्पाप व्यक्तीला नको. त्यावर बाप्पाने सांगितले की, संकष्ट चतुर्थी व्रत केल्यास खोट्या आळातून त्या व्यक्तिची सुटका होईल. म्हणून चुकून चंद्रदर्शन झाले की, घाबरुन जाऊ नका. मनोभावे संकष्ट चतुर्थी व्रत करा आणि गणेश चतुर्थी शुभेच्छा संदेश मराठी एकमेकांना नक्की द्या.
बाप्पाला का प्रिय आहे दुर्वा, माहीत आहे याची गोष्ट
कृष्णावरही आला होता चोरीचा आरोप
बाप्पासंदर्भातील ही पौराणिक कथा असली तरी त्याचा दाखला देणारी एक कथा श्रीकृष्णासंदर्भात सांगितली जाते. ती म्हणजे नेमक्या गणेश चतुर्थीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने चुकून चंद्राला पाहिले. चंद्राला पाहिल्यामुळे त्यांच्यावर स्यमंतक मणी चोरल्याचा आळ आला होता. श्रीमद्भागवातामध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यासंदर्भातील एक कथाच त्यामध्ये आहे.
यासोबतच वाचा गणपती बाप्पा विसर्जन स्टेटस.
आता या दिवशी चंद्र का पाहात नाही हे तुम्हाला कळलेच असेल. गणपती बाप्पा मोरया! आरोग्याची काळजी घेत यंदा गणेशोत्सव साजरा करा