ADVERTISEMENT
home / आरोग्य
लहान मुलांना नाईट टेरर्सचा त्रास का होतो? वाचा!

लहान मुलांना नाईट टेरर्सचा त्रास का होतो? वाचा!

जेव्हा एखादी व्यक्ती घाबरलेल्या अवस्थेत दचकून किंवा आरडाओरडा करत झोपेतून उठते, परंतु दुसर्‍या दिवशी त्या व्यक्तीला यातले काहीही आठवत नाही तेव्हा त्याला नाईट टेरर्स असे म्हणतात. हा त्रास लहान बाळांमध्ये तसेच वाढत्या वयाच्या लहान मुलांमध्ये जास्त आढळतो. लहान मुलांना हा त्रास का होतो याची काही कारणे आहेत.  

सहसा 3 ते 7 वर्षे वयोगटातील मुलांना हा त्रास असल्याचे दिसून येते आणि सुमारे 30% मुलांना किमान एकदा तरी हा त्रास होतो. अगदी वर्षाच्या आतल्या बाळांना देखील नाईट टेरर्स असू  शकतात. या वयोगटात बाळांची आकलन करण्याची क्षमता कमी असल्याने इतक्या लहान बाळांना हा त्रास सहसा होत नाही. पण काही बाळांना देखील हा त्रास होतो. अर्थात दुसऱ्या दिवशी त्यातले काही आठवते की नाही हे बाळांना सांगता येत नसल्याने आपल्याला कळायला मार्ग नाही की नाईट टेरर मुळे बाळ दचकून रडत उठतेय की त्याला काही वेगळा त्रास होतोय. या त्रासाविषयी फार लोकांना माहिती देखील नाही. नाईट टेरर्स व भयानक स्वप्नामुळे घाबरून दचकून उठणे यात फरक आहे.  

लहान मुलांना होणारे नाईट टेरर्स

लहान मुलांना हा त्रास का होतो याचे उत्तर अजून डॉक्टरांना मिळालेले नाही.  नाईट टेरर व मेंदूमध्ये घडणाऱ्या रासायनिक प्रक्रियांचा एकमेकांशी काय संबंध आहे यावरही अभ्यास सुरु आहे. तज्ज्ञांच्या मते जी मुले  झोपेत चालतात, त्यांना नाईट टेरर्सचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. तसेच ज्या मुलांना नाईट टेरर्सचा त्रास होतो ती मुले झोपेतच घाबरून ओरडत,रडत उठतात आणि झोपेतच इकडेतिकडे पळत सुटतात. रात्री जे घडले त्यातले त्यांना सकाळी काहीच आठवत नाही. त्यामुळे याबाबतीत त्यांना ओरडू किंवा रागावू नये. ज्यावेळी मुलांना असा त्रास होत असेल त्यावेळी पटकन खोलीतला दिवा सुरु करून मुलाला झोपेतून पूर्ण जागे करावे म्हणजे ते शांत होतात. जागी झाल्यावर मुले लगेच शांत होतात.  

अधिक वाचा जाणून घ्या वयानुसार प्रत्येकाने किती तास झोप घ्यावी

ADVERTISEMENT

का होतात नाईट टेरर्स?

नाईट टेरर्स बहुतेक वेळा झोपेच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये घडते. जसे की मूल जेव्हा नॉन-रॅपिड आय मूव्हमेंट झोपेच्या स्टेजमधून जेव्हा रॅपिड आय मुव्हमेंट झोपेच्या स्टेजमध्ये जात असते तेव्हा मेंदूच्या इलेक्ट्रिकल पॅटर्नमध्ये बदल होतो.  यामुळे नाईट टेरर्स होतात असे तज्ज्ञांचे मत आहे. जेव्हा मुले खूप जास्त तापाने आजारी असतात किंवा तणावाखाली असतात किंवा त्यांची झोप पूर्ण होत नसेल किंवा ते खूप खेळून खूप जास्त दमतात तेव्हा त्यांना नाईट टेरर्सचा त्रास होण्याचे प्रमाण जास्त असते किंवा ते होण्याची शक्यता जास्त असते.

काही संशोधकांचे असे मत आहे की नाईट टेरर्स अनुवांशिक आहेत. तसेच ते एका विशिष्ट जनुकाद्वारे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीत संक्रमित होतात. परंतु त्यांना अजून तो विशिष्ट जीन सापडला नाही. लहान मुलांना नाईट टेरर्सचा त्रास वाईट किंवा भीतीदायक स्वप्न बघितल्याने होत नाही. कारण हा त्रास झोपेच्या त्या स्टेजमध्ये होतो जेव्हा आपण स्वप्न बघत नसतो. आपल्याला बहुतांश स्वप्न ही झोपेच्या REM स्टेज मध्ये पडतात. 

नाईट टेरर्सची समस्या बहुतांश वेळेला आपोआपच बरी होते. मूल थोडे मोठे झाले की हा त्रास आपोआप जातो. तरीही तुमच्या मुलांना असा त्रास होत असल्यास तुमच्या डॉक्टरांना त्याबाबत सांगा व  त्यांना कुठला वेगळा त्रास तर नाही ना हे पडताळून बघा. तसेच तुमचे मूल जर दिवसा खूप चिडचिड करत असेल किंवा त्याला कसली भीती वाटत असल्यासही डॉक्टरांशी बोला.  

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा  MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
08 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT