ADVERTISEMENT
home / आरोग्य
reasons why you may feel tired all the time in Marathi

या कारणांमुळे येऊ शकतो अशक्तपणा, त्वरीत करा उपाय

बऱ्याचदा तुम्ही कमी झोपता आणि तुम्हाला दिवसभर थकल्यासारखं वाटत राहतं. कधी कधी खूप काम केल्यामुळे, अती प्रवास केल्यामुळे दिवसभर कंटाळा येतो. पण जर तुम्हाला बऱ्याच दिवसांपासून थकल्यासारखं, अशक्त झाल्यासारखं वाटत असेल तर ही मात्र एकादी गंभीर आरोग्य समस्या असू शकते. बऱ्याच लोकांना मधुमेह, कामाचा ताण, अती रक्तदाब, हायपोथायरॉइड, अपुरी झोप, अती कंप्युटरचा वापर यामुळे नेहमी असं वाटत राहतं. यासाठी जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती

अशक्तपणा घालवण्यासाठी उपाय (Home Remedies For Weakness In Marathi)

या कारणांमुळे सतत येतो थकवा 

जाणून घ्या कोणत्या कारणांमुळे तुम्हाला सतत कमजोर आणि अशक्त  वाटू शकते. 

अपुरी झोप 

जर तुम्ही दिवसभर काम करून रात्री उशीरा झोपत असाल तर तुमच्या शरीराला पुरेशी झोप मिळत नाही. यासाठी दिवसभर काम करणाऱ्या लोकांनी रात्री वेळेत झोपणं आणि सकाळी वेळेत उठणं गरजेचं आहे. जर तुमची झोप पूर्ण झाली नाही तर तुम्हाला थकवा येतो ज्याचा परिणाम तुमच्या काम आणि आरोग्यावर होतो.

ADVERTISEMENT

डिहायड्रेशन

पाणी कमी पिण्यामुळेही तुम्ही अशक्त, कमजोर होऊ शकता. शरीराला त्याचे कार्य व्यवस्थित करण्यासाठी पाण्याची गरज असते. पण जर तुम्ही कंटाळा केल्यामुळे अथवा कामाच्या गडबडीत कमी पाणी प्यायला तर तुम्हाला डिहाड्रेशनचा त्रास होतो. ज्यामुळे शरीर अशक्त आणि कमजोर होतं.

अॅनिमियाची लक्षणे, कारणे आणि घरगुती उपचार

थायरॉईड

आजकाल अनेक महिलांना थायरॉईड ग्रंथीच्या असंतुलनाचा त्रास होतो. बऱ्याचदा हायपोथायरॉईडमुळे तुमच्या शरीरातील मेटा बॉलिजम वाढतं आणि शरीराला उर्जा कमी मिळते. ज्यामुळे तुम्हाला सतत थकल्यासारखं वाटतं.

मधुमेह

रक्तातील साखर वाढण्यामुळेही तुम्हाला सतत थकवा जाणवू शकतो. यासाठीच मधुमेही लोकांना नेहमी अंगदुखी, पायदुखी, कंबरदुखी अथवा अशक्तपणा आल्यासारखं वाटत राहतं.

ADVERTISEMENT

मधुमेहावर नियंत्रण मिळविण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय (How To Control Diabetes In Marathi)

ताणतणाव

कामाचा ताणतणाव हा सध्या अनेकांमध्ये वाढलेला दिसून येतो. जर तुम्ही शिफ्टमध्ये काम करत असाल अथवा तुम्हाला रात्री उशीरापर्यंत काम करावं लागत असेल तर यामुळे तुमची दिनचर्या बदलते आणि तुम्हाला सतत थकल्यासारखं वाटू लागतं.

या काही कारणांमुळे तुम्हाला दिवसभर थकवा जाणवू शकतो. यासाठीच वेळीच सावध व्हा आणि उपचार करून या समस्या दूर करा. 

06 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT