तुमच्या चेहऱ्याच्या सौंदर्यामध्ये कायम डोकावात ते म्हणजे ब्लॅकहेडस… काहींना ब्लॅकहेड्सचा इतका त्रास असतो की, त्यांचा चेहरा त्यामुळे अधिक काळवंडलेला आणि निस्तेज वाटतो. अशा चेहऱ्याकडे पुन्हा पाहावेसे वाटत नाही. कारण असा चेहरा अस्वच्छ वाटतो. जर तुम्हालाही ब्लॅकहेड्सचा त्रास असेल तर आज आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत कारण तुम्ही हे ब्लॅकहेड्स घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने काढू शकता.
तुम्हाला ब्लॅकहेड्स आहेत का?
एक छोटा आरसा घेऊन तुम्ही तुमच्या नाकाजवळ न्या. तुम्हाला नाकावर काही काळे डाग दिसत आहेत का ते निरखून पाहा. जर तुमच्या नाकांवर ठिकठिकाणी काळ्या रंगाचे बारीक बारीक काहीतरी दिसत असेल तर ते ब्लॅकहेड्स आहेत हे समजून जा.
घरच्या घरी करा असा मेकअप जो तुम्हाला देईल प्रोफशन लुक
का होतात ब्लॅकहेड्स?
ब्लॅक हेड्सचा अधिक त्रास हा तेलकट त्वचा असलेल्या व्यक्तिंना होऊ शकतो. कारण तेलकट त्वचेवर सतत घाण साचत राहते. शिवाय अशा चेहऱ्यावर जर पोअर्स असतील तर ब्लॅक हेड्स त्वचेवर खोलपर्यंत पोहोचतात. जर ते वेळेवर काढले गेले नाही तर त्यामुळे तुमच्या चेहऱ्यांवर खड्डे पडतात. जे तुमच्या चेहऱ्यावर अजिबात चांगले दिसत नाही,
मग आता ब्लॅकहेड्स कसे काढायचे ते पाहुयात
-
अंड्याचा मास्क
अंड्याचा पांढरा बलक तुमचे ब्लॅकहेड्स कोणताही त्रास न देता काढू शकतो. त्यासाठी तुम्हाला लागणार आहे अंड
एका भांड्यात अंड्याचा पांढरा बलक काढून घ्या.
एक ब्रश घेऊन तुम्हाला अंड्याचा पांढरा बलक नाकाला लावायचा आहे. शिवाय तुम्हाला अजून ज्या ठिकाणी ब्लॅक हेड्स असतील तिथे तुम्हाला या बलकाचा जाड थर लावायचा आहे.
हा मास्क ओला असताना तुम्हाला त्यावर फेस टिश्यू त्यावर ठेवायचे आहे. अंड्याचा बलक पूर्णत: वाळल्यानंतर तुम्हाला एका फटक्यात पेपर नाकावरुन काढून टाकायचा आहे. तुमच्या ब्लॅक हेड्ससोबत व्हाईट हेड्सही बऱ्यापैकी निघतील.
-
टोमॅटोचा अर्क
तुमचे सौंदर्य वाढवण्यासाठी टोमॅटो चांगले आहे हे तुम्हाला माहीत असेल तर ब्लॅक हेड्स काढण्यासाठीही टोमॅटोचा उपयोग होऊ शकतो.
विशेष म्हणजे तुमची त्वचा कोणतीही असो तुम्ही टोमॅटोचा वापर करु शकता.
तुम्हाला रोज झोपताना तुमच्या ब्लॅकहेड्स असलेल्या ठिकाणी टोमॅटोचा अर्क लावायचे आहे आणि झोपून जायचे आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी थंड पाण्याने तुम्हाला तुमचा चेहरा धुवून टाकायचा आहे. हा प्रयोग रोज करायला काहीत हरकत नाही.
तुम्हाला कालांतराने ब्लॅकहेड्स कमी झालेले दिसतील.
घरच्या घरी फेसपॅक तयार करण्याआधी तयार करा या फेसपॅक पावडर
-
चारकोल ब्लॅकहेड्स रिमुव्हल
चारकोल पावडरसंदर्भात तुम्ही नक्कीच ऐकले असेल. चेहऱ्यावरील अतिरिक्त घाण काढण्यासाठी चारकोल चांगले आहे. ब्लॅकहेड्ससाठीही चारकोल एकदम बेस्ट आहे. हल्ली बाजारात चारकोल कॅप्सुलसुद्धा मिळतात.
2 कॅप्सुल चारकोल, ½ चमचा मुलतानी माती आणि पाणी
सारे मिश्रण एकत्र करुन त्याची थपथपीत पेस्ट तयार करुन घ्या. नाकाला लावून घ्या. वाळल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या.
त्यानंतर चेहऱ्याला अॅलोवेरा जेल लावायला विसरु नका.
-
बेकिंग सोडा
बेकिंग सोडा तुमच्या चेहऱ्यावरील धूळ आणि माती काढून तुमचा चेहरा स्वच्छ करतो. ब्लॅकहेड्सचा त्रास असल्यास तुम्ही हा प्रयोग करु शकता.
1 चमचा बेकिंग सोडा आणि थोडे पाणी घेऊन तयार मिश्रण तुम्हाला नाकाला लावायचे आहे. साधारण ५ मिनिटे हे ठेवा. नंतर चेहरा धुवून घ्या
आठवडयातून दोनदा हा प्रयोग करा.
-
स्क्रबिंग
तुमच्या त्वचेसाठी योग्य असा स्क्रब निवडून तुम्ही रोज तुमचे नाक अगदी मिनिटभरासाठी स्क्रब करा. (जास्त स्क्रब करु नका). स्क्रबमुळे तुमच्या चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स नैसर्गिक पद्धतीने नरम पडतात आणि निघून जातात. तुम्हाला नाक दाबून ते काढण्याची गरज भासत नाही.
तुम्हालाही ब्लॅकहेड्स झाले असतील तर तुम्ही हे काही घरगुती उपाय नक्की ट्राय करुन पाहा.
(फोटो सौजन्य- shutterstock)