ADVERTISEMENT
home / Love
Rose Day Quotes In Marathi

50+ Rose Day Quotes In Marathi | रोझ डे आणि प्रेम संदेश

व्हॅलेंटाईन्स डेच्या आधीचा संपूर्ण एक आठवडा प्रेमाचा आठवडा म्हणून साजरा केला जातो. या आठवड्याला ‘व्हॅलेंटाईन वीक’ असं म्हणतात. या आठवड्याचा पहिला दिवस रोझ डे (Rose Day) या नावाने सेलिब्रेट केला जातो. फेब्रुवारी महिन्याच्या सात तारखेला रोझ डेने व्हॅलेंटाईन्स विकला सुरूवात होते. या दिवशी कोणतीही व्यक्ती आपल्या आवडत्या व्यक्तीला गुलाबाचं फुल देऊन प्रेमाचं अथवा मैत्रीचं नातं जोडू शकते. मनातील सुंदर भावना व्यक्त करण्यासाठी एका सुंदर गुलाबाचं फुलाचा आधार यासाठी घेतला जातो. ज्यामुळे गुलाबाच्या फुलाला प्रेमाचं प्रतिक मानलं जातं. रोझ डेला तुम्ही कोणत्या रंगाचं फुल देता यावरून तुमच्या मनातील भावना ठरतात. यंदा असं गुलाबाचं फुल देताना सोबत रोझ डेसाठी हे प्रेमाचे संदेश (Rose Day Messages in Marathi) तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला देऊ शकता. 

Rose Day Quotes In Marathi | रोझ डे साठी मराठी कोट्स

Rose Day Quotes In Marathi
Rose Day Quotes In Marathi

रोझ डेला फेसबुक, व्हॉट्सअप, सोशल मीडियासाठी स्पेशल कोट्स (Rose Day Quotes In Marathi).

१. जेव्हा जेव्हा मी गुलाबाचं फुल पाहिन, माझ्या डोळ्यासमोर तुझाच चेहरा समोर येईल.  “Happy rose day”

२. माझ्या गुलाबाच्या फुला, काय सांगू तुला, आठवण येते मला पण इलाज नाही त्याला कारण प्रेम म्हणतात याला  “Happy Rose Day”

ADVERTISEMENT

३. गुलाबाच्या फुलांचा गुच्छ आणि भरभरून प्रेम… फक्त तुझ्यासाठी  “Happy Rose Day”

४. जर आयुष्यात काही बनायचं असेल तर, गुलाबाचं फुल बना, कारण, ते  त्या हातांनाही सुंगधित करतं जे त्याल्या कुस्करून फेकून देतात   “Happy Rose Day”

५. माझ्या वेडेपणाला काहीच मर्यादा नाही, मला तुझ्याशिवाय दुसरं काहीच सुचत नाही, मी गुलाब आहे तुझ्या बागेतला, माझ्यावर तुझ्याशिवाय या जगात कुणीच नाही.   “Happy Rose Day”

६. गुलाबाच्या फुलाला गुलाब कसं देऊ, तूच आहेच श्वास माझा, तुझ्याशिवाय कसं जगू   “Happy Rose Day”

ADVERTISEMENT

७. फुले जशी दिसतात बागेत सुंदर, तसंच राहू आपण दोघेपण  “Happy Rose Day”

८. लाल रंग प्रेमाचा, पिवळा आहे मैत्रीचा, पांढऱ्यातून मिळते शांती आणि गुलाबी आहे कृतज्ञतेचा… म्हणूनच आज मी तुला सर्व रंगाची फुल देत आहे…. “Happy Rose Day”

९. कितीही रुसलीस आणि रागावलीस तरी, माझं तुझ्यावरचं प्रेम या गुलाबाप्रमाणे कधीच कमी होणार नाही…  “Happy Rose Day”

१० आज मेसेजमधूनच पाठवत आहे गुलाबाचं फुल… कारण आज थोडा बिझी आहे… पण यातूनच सिद्ध होतं की तु फक्त माझी आहेस…  “Happy Rose Day”

ADVERTISEMENT

११. तुझ्या ओठांवर नियमित गुलाबाचं फुल उमलावं, तु नेहमीच आनंदी असावं, मी आयुष्यभर फक्त तुझ्यासोबत राहावं आणि तुझ्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी व्हावं.  “Happy Rose Day”

१२. तु माझ्या ह्रदयात अशी आहेस जसं हे गुलाबाचं फुल, आयुष्यात फक्त आनंदाची बरसात करत राहणारं…  “Happy Rose Day”

१३.मला प्रेमात हरायचं अथवा जिंकायचं नाही, फक्त तुझ्यासोबत आयुष्यभर जगायचं आहे.   “Happy Rose Day”

१४. फुल सुकलं तरी सुगंध देतंच राहतं, तसंच आपलं प्रेम आयुष्याच्या शेवटाप्रमाणे सुंगधितच राहावं.  “Happy Rose Day”

ADVERTISEMENT

१५. सगळ्यांपेक्षा तु वेगळी आणि सुंदर आहेस, पण त्याही पेक्षा सुंदर आहे तुझं माझ्या आयुष्यात असणं.  “Happy Rose Day”

१६. तुला मनातलं सांगताना, हातात उमलली गुलाबाची कळी, न सांगता समजलं तुला, जेव्हा पाहिली तुझ्या गालावरची खळी, “Happy Rose Day”

१७. आनंद नेहमी गुलाबाच्या फुलासारखा असतो, हातात धरला तर हाताची बोटंही सुंगधित करतो. “Happy Rose Day”

१८.गुलाबाचं फुल आज माझ्या प्रिय पत्नीला जी मला तिच्या तळहातावरच्या फोडोप्रमाणे जपते.”Happy Rose Day”

ADVERTISEMENT

१९. तु फक्त बागेत फुलणारं गुलाबाचं फुल नाहीस, तु आहेस माझं जीवन,तुला पाहात राहणं हेच आहे माझ्या जगण्याचे साधन. “Happy Rose Day”

२०. सर्वात अप्रतिम गोष्ट आहे मैत्री, प्रेमासाठी ती तुटता कामा नये. “Happy Rose Day”

Rose Day Quotes For Love In Marathi | रोझ डे निमित्त खास कोट्स

Rose Day Quotes For Love In Marathi
Rose Day Quotes For Love In Marathi

रोझ डेला तुमच्या आवडत्या व्यक्तीजवळ प्रेम व्यक्त करण्यासाठी मदत करतील हे रोझ डे कोट्स आणि प्रपोज करण्यासाठी प्रेम संदेश

१. आज पाठवत आहे मी तुला रोझ, कारण तुझी आठवण येते मला दररोज  “Happy Rose Day”

ADVERTISEMENT

२.  एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्यांना रोझ डे च्या शुभेच्छा! आणि बाकीच्यांना रोजच्याच शुभेच्छा  “Happy Rose Day”

३. एक रोझ जे भेटत नाही रोज रोज, मात्र आठवत राहतं दररोज  “Happy Rose Day”

४. तुझी चाहुल लागताच माझा चेहरा खुलतो, तुझा स्पर्श होतात माझं मन मोहरतं. अशा माझ्या प्रिय…ला  “Happy Rose Day”

५. जसं गुलाब गुलाबाच्या रोपाशिवाय जगू शकत नाही, तसंच मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत  “Happy Rose Day”

ADVERTISEMENT

६. आयुष्यभर सोबत असावी अशी साथ आहेस तू, माझ्या जीवनातील सुंदर स्वप्न आहेस तू, लोक काही म्हणाले, तरी माझ्यासाठी सुंदर गुलाबाचं फुल आहेस तू  “Happy Rose Day”

७. मैत्री आणि प्रेमात एक छोटसं अंतर असतं, मैत्री गुलाबाचं फुल आहे तर प्रेम त्या गुलाबाचा सुगंध असतं.  “Happy Rose Day”

८. तुझी आठवण येणार नाही असं कधीच होणार नाही, कारण तु माझं तुझ्याशिवाय कुणावरही प्रेम नाही.  “Happy Rose Day”

९. ‘हो’ म्हणणाऱ्या खूप असतील पण मला ‘अहो’ म्हणणारी हवी.  “Happy Rose Day”

ADVERTISEMENT

१०. समोरचा आपल्याकडे सतत पाहत आहे हे त्याला पाहिल्याशिवाय कळत नाही.  “Happy Rose Day”

Rose Day Shayari In Marathi | रोझ डे साठी शायरी

Rose Day Shayari In Marathi
Rose Day Shayari In Marathi

प्रेम आणि शायरी याचं एक अतूट नातं आहे. म्हणूनच रोज डेला गुलाबाच्या फुलासोबत पाठवा या प्रेमाच्या चारोळ्या (Rose Day Shayari In Marathi).

१. तू सोबत असताना मला गरज कोणाची लागत नाही, तू फक्त सोबत राहा मी दुसरं काही मागत नाही.  “Happy Rose Day”

२. जवळ तिच्या असताना, शब्दांना फुटली नाही भाषा, विसरून जातं सारं काही अशी आहे तिच्या प्रेमाची नशा…  “Happy Rose Day”

ADVERTISEMENT

३. गोड आठवणी आहेत, तिथे हळुवार भावना आहेत, हळूवार भावना आहेत तिथे अतूट प्रेम आहे…. आणि जिथे अतूट प्रेम आहे तिथे नक्कीच तू आहेस  “Happy Rose Day”

४. तू शांत राहा जरा… थोडं स्पर्शांनाही बोलू दे, अंगावरल्या शहाऱ्याचं गुपित त्यांना खोलू दे.  “Happy Rose Day”

५. तू माझ्याकडे क्षणभर तरी पाहायला पाहिजे, आणि तो क्षण माझ्या आयुष्यात कायम  राहायला पाहिजे.  “Happy Rose Day”

६. माझ्या अंगणात असतो तुझ्या आठवणींचा पाऊस, तुझं माझं नातं फक्त त्या एकट्यालाच ठाऊक  “Happy Rose Day”

ADVERTISEMENT

७. तुझं असं शांत राहणं सलत राहतं मला, तू काही नाही बोललीस तरी तुझ्या मनातलं कळतं मला.  “Happy Rose Day”

८. माझा राग तुझ्यावर कणभर आहे, माझा आबोला तुझ्याशी क्षणभर आहे, माझं तुझ्यावर असलेलं प्रेम मात्र आयुष्यभर आनंदी राहशील इतकं आहे.  “Happy Rose Day”

९. तू कविता असशील तर मला शब्द व्हायचं आहे, तुला मिळवायचं नाही, आयुष्यभर तुझं व्हायचं आहे. “Happy Rose Day”

१०. साधं गुलाब तोडताना काट्यांनी घायाळ व्हावं लागतं, इश्काच्या आगीत होरपळताना रात्र रात्र जागावं लागतं.  “Happy Rose Day”

ADVERTISEMENT

Happy Rose Day Wishes In Marathi | रोझ डेसाठी प्रेमाचे संदेश

Happy Rose Day Wishes In Marathi
Happy Rose Day Wishes In Marathi

रोझ डेला तुमच्या प्रिय व्यक्तीला पाठवण्यासाठी शुभेच्छा (Happy Rose Day Wishes In Marathi) आणि व्हॅलेंटाईन्स डे निमित्त प्रेमाचे संदेश

१. आयुष्यात प्रत्येकाला एका चांगल्या मित्राची आणि एका चांगला जोडीदाराची गरज असते. मी किती भाग्यवान आहे की माझी मैत्रीण, प्रेयसी, बायको तूच आहेस.  “Happy Rose Day”

2. तुझे येणे आणि तुझे जाणे, नकळत असं वळून पाहणे, आवडते मला तुला असं चोरून चोरून पाहत राहणे.  “Happy Rose Day”

३. मैत्री करायची असेल त गुलाबाच्या फुलासारखी कर, आयुष्यभर फक्त आनंदाची बरसात कर  “Happy Rose Day”

ADVERTISEMENT

४. माझाच प्रॉब्लेम आहे की, मला सतत तू माझ्या डोळ्यासमोर हवी आहेस, तुझा क्षणभर विरहही मला सहन होत नाही.  “Happy Rose Day”

५. स्वप्नातील राजकुमारासोबत मला रिप्लेस करशील का, या वेड्याच्या आयुष्यातील स्वप्नपरी होशील का.  “Happy Rose Day”

६. आता ह्रदय धडधडत आहे फक्त तुझ्या विचारांनी, मी दिलेले हे गुलाबाचं फुल फेकून देशील की ह्रदयाशी धरशील.  “Happy Rose Day”

७. विखुरलं आहे माझं आयुष्य तुझ्या वाटेवरती, स्वैर व्हायचं आहे आता तुझ्या प्रेमाच्या लाटेवरती.  “Happy Rose Day”

ADVERTISEMENT

८. नाही आठवण काढसीस तरी चालेल विसरून मात्र जाऊ नको.  “Happy Rose Day”

९. मैत्री की प्रेम हा निर्णय तुझा आहे. मला मात्र आयुष्यभर फक्त तुझी साथ हवी आहे.  “Happy Rose Day”

१०. प्रेम नसेल तर तसं सांग मैत्री मात्र तोडू नकोस, तुझ्या या प्रिय मित्राला वाऱ्यावरती सोडू नकोस.  “Happy Rose Day”

Rose Day Messages In Marathi | रोझ डे साठी शुभेच्छा संदेश

Rose Day Messages In Marathi
Rose Day Messages In Marathi

रोझ डेसाठी हे शुभेच्छा (Rose Day Messages In Marathi) आणि प्रेम संदेश तुमच्या नक्कीच उपयोगाचे ठरतील. 

ADVERTISEMENT

1. डोळ्यात साठलेल्या आठवणींनी रात्रही सरेना, किती दिवस झाले आता तुला पाहून स्वप्नात तरी ये ना. “Happy Rose Day” 

2. तुझ्यापासून सुरू होत तुझ्यातच संपलेला मी, माझे मीपण हरवून तुझ्यातच हरवलेला मी. “Happy Rose Day”

3. प्रेमात थोडं भांडल्याशिवाय प्रेमात गोडी येणार नाही, थोडंस दूर गेल्याशिवाय जवळ येण्याची गंमत कळणार नाही. “Happy Rose Day”

4. रात्री जागून तिचा विचार करणं म्हणजे प्रेम नाही, तर तिच्या सोबत स्वप्नवत जगणं म्हणजे प्रेम असतं. “Happy Rose Day”

ADVERTISEMENT

5. कुणी चंद्रावर प्रेम करतं तर कुणी सुर्यावर जीव ओवाळून टाकतं. मी मात्र तिच्यावरच प्रेम करतो जी फक्त माझ्यासाठी जगते. “Happy Rose Day”

6. भेटलीच पाहिजे म्हणून प्रेम करणं म्हणजे डीप लव्ह, भेटणार आहेच म्हणून प्रेम करणं म्हणजे स्टॉंग लव्ह आणि भेटणार नाही हे माहीत असूनही प्रेम करणं म्हणजे रिअल लव्ह. “Happy Rose Day”

7. तुला माझी चिंता करण्याची गरज नाही कारण मी आधीपासूच तुझ्या ह्रदयात आहे. “Happy Rose Day”

8. एकवेळ फसवून प्रेम कर पण प्रेमात असं फसवू नकोस,विचार करून प्रेम कर पण प्रेम केल्यावर विचार करत बसू नकोस, ह्रदयापासून प्रेम कर पण प्रेम केल्यावर ह्रदय तोडू नकोस. “Happy Rose Day”

ADVERTISEMENT

9. फक्त एक इशारा पुरे आहे, फक्त ह्रदयाचा एक कोपरा पुरे आहे, तुला कधीही गरज लागली तर फक्त एक मिस कॉल पुरे आहे. “Happy Rose Day”

10. प्रेम, इश्क, मोहब्बत म्हणजे काय मला माहीत नाही, मला फक्त इतकंच माहीत आहे हा चेहरा माझा आहे जो गुलाबासारखा नाजूक आहे. “Happy Rose Day”

Rose Day Status In Marathi | रोझ डे निमित्त प्रियजनांसाठी मेसेज

Rose Day Status In Marathi
Rose Day Status In Marathi

रोझ डेला पोस्ट करण्यासाठी वापरा हे प्रेम संदेश (Rose Day Status In Marathi) आणि व्यक्त करा तुमचे प्रेम.

1. तु कितीही समजव मला पण मी तुझ्यासाठी पागल होतो, आहे आणि राहणार. “Happy Rose Day”

ADVERTISEMENT

2. देवाजवळ एकच प्रार्थना तुझ्या प्रेमाशिवाय आयुष्यात काही नको, प्रत्येक जन्मी मिळावी तुझी साथ नाहीतर मग जीवनच नको. “Happy Rose Day”

3. दूर असताना राहवत नाही, प्रेमाचं नातं हे असंच असतं. “Happy Rose Day”

4. कधीही काही झालं तरी स्वतःला एकटं समजू नकोस, कारण श्वासात श्वास असेपर्यंत मी फक्त तुझाच असेन. “Happy Rose Day”

5. प्रेम हे रबरासारखं असतं, एकाने सोडून दिलं तर धरेल त्याला जास्त लागतं. “Happy Rose Day”

ADVERTISEMENT

6. तु इतक्या प्रेमात पाहावं की, नजरेनंही आपोआप लाजावं, तुझ्या नुसत्या स्पर्शानेही पायातलं पैजण रूणझुणावं. “Happy Rose Day”

7. प्रेम काय असतं हे माहीत नाही. पण तुझ्याइतकं सुंदर असेल तर जन्मोजन्मी मला ते हवंय “Happy Rose Day”

8. सांगताही येत नाही आणि लपवताही येत नाही, तुझ्यावर इतकं प्रेम आहे की ते दाखवताही येत नाही. “Happy Rose Day”

9. रोज रोज आय लव्ह यु म्हणणं म्हणजे प्रेम नाही, रोज रोज रोझ देणं म्हणजे प्रेम नाही. प्रेम ही फक्त एक अनुभूती आहे. जी दोघांनाही एकदम व्हावी. “Happy Rose Day”

ADVERTISEMENT

10. प्रियकर आणि प्रेयसीमध्ये नाही त्यांच्या ह्रदयात असतं प्रेम, फक्त शरीरातच नाही तर आत्म्यातही नांदतं प्रेम “Happy Rose Day”

02 Feb 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT