छोट्या मुलांच्या रिएलिटी शोजला नेहमीच प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. त्यात जर तो डान्स रिएलिटी शो असेल तर मग तो आवर्जून पाहायला जातोच. नुकताच सुपर डान्सर चॅप्टर 3 च्या फिनाले पार पडला आणि हा किताब जिंकला अवघ्या 6 वर्षाच्या रूपसाने. रूपसाही या शोमधली सर्वात लहान कंटेस्टंट होती. तिला एक्सप्रेशन क्वीन असंही या शोवर म्हटलं जायचं. आपल्या खोडकर स्वभावाने आणि डान्सने तिने जजेसकडून खूप कौतुक करून घेतलं. तिचं चांगलंच फॅन फॉलोइंगही आहे. रूपसा विनर तर निशांत हा या सिझनचा रनरअप ठरला.
रूपसासाठी सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस
रूपसा जिंकल्यावर सोशल मीडियावर तिच्या फॅन्सनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. रूपसाला ही ट्रॉफी जिंकल्याबद्दल तब्बल 15 लाख रुपये एवढी रक्कम मिळाली आहे. तर टॉप 7 कंटेस्टंट्सना प्रत्येकी एक लाख रूपये बक्षीस मिळणार आहे. फिनालेमधील सर्व पाच फाईनलिस्टनी मेरा वाला डान्स या गाण्यावर परफॉर्मन्स दिला. सोशल मीडियावर रूपसाच्या जिंकण्याचा आनंद तिचे फोटो शेअर करून केला जात आहे.
कोलकत्याला जाऊन करणार सेलिब्रेट
चिमुकली रूपसा जिंकल्यानंतर फारच खूष आहे आणि आपल्या घरी जाऊन कुटुंबियांसोबत तिला आपला विजय सेलिब्रेट करायचा आहे. तसंच यापुढेही ती डान्स करतच राहील. अशी प्रतिक्रिया तिने दिली. रूपसासोबत टॉप पाच फाईनलिस्टमध्ये जयश्री, तेजस, सक्षम आणि गौरव हे होतो. तर रूपसाला या सर्व प्रवासाता गाईड करणारा गुरू होता निशांत भट.
शिल्पा शेट्टीचा धमाकेदार परफॉर्मन्स
सुपर डान्सर 3 ची जज असलेल्या अभिनेत्री शिल्पा शेट्टीही फिनालेमध्ये धमाकेदार डान्स परफॉर्मन्स दिला. शिल्पा शेट्टीने यावेळी भरनााट्यम नृत्य सादर केलं. असं पहिल्यांदा झालं आहे जेव्हा शिल्पा शेट्टीने टीव्हीवर भरतनाट्यम नृत्य सादर केलं. तसंच शिल्पा शेट्टीने चेन्नई एक्सप्रेसमधील तितली, एबीसीडीच्या मुकाबला आणि और भारतमधील इत्थे या गाण्यावरही परफॉर्म केलं.
रूपसा आणि शिल्पाची बाहुबली मूमेंट
रूपसा जिंकल्यावर शिल्पाने प्रतिक्रिया दिली की, तीच या किताबाची योग्य दावेदार होती. तिने प्रत्येक आठवड्याला एकसे एक परफॉर्मन्स दिला. एवढंच नाहीतर एका एपिसोडमध्ये तर शिल्पा शेट्टीने रूपसाच्या पायांचं चुंबन घेत बाहुबली मूमेंट क्रिएट केली.
सुपर डान्सर चॅप्टर 3 हा शो गेले पाच महिने सुरू होता. तसंच या ग्रँड फिनालेमध्ये प्रसिद्ध गायक हिमेश रेशमिया आणि जावेद अलीसुद्धा होते. जावेद अली आणि हिमेश रेशमियानेही परफॉर्मेंस दिला.
हेही वाचा –
SaReGaMaPa Little Champs 2019: नागपूरच्या सुगंधा दातेने मारली बाजी