ADVERTISEMENT
home / मनोरंजन
समीरा रेड्डीने दिले सासूला आव्हान, सासूने केली बोलती बंद

समीरा रेड्डीने दिले सासूला आव्हान, सासूने केली बोलती बंद

बॉलीवूड अभिनेत्री समीरा रेड्डी गेल्या कित्येक वर्षापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. मात्र सोशल मीडियावर ती नेहमीच अॅक्टिव्ह असते. 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या चक्रव्यूह या चित्रपटानंतर तिने मोठ्या पडद्यावरून संन्यासच घेतला आहे. पण समीरा रेड्डीचा फॅन फॉलोईंग खूपच मोठा आहे. आपल्या मुलीच्या जन्माच्या वेळेपासून ती सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह झाली आहे. गरोदर असताना तिचे अंडरवॉटर फोटोशूटही खूपच व्हायरल झाले होते. त्यानंतर ती आपल्या दोन्ही मुलांबरोबरील अनेक व्हिडिओ शेअर करत असते. पण आता पुन्हा समीरा रेड्डी वर्दे (Sameera Reddy) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.  ते पण तिने तिच्या सासूला दिलेल्या आव्हानामुळे. अहं..जरा थांबा उगीच उलट सुलट विचार करू नका. समीराची सासू अर्थात अक्षय वर्देची आई यांचा दोघींचाही एकमेकींसह खूपच चांगला बाँड आहे. पण या दोघींचा एक व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे. समीराने दिलेले आव्हान तिच्या सासूने स्वीकारले आणि तिची बोलती बंद केली. 

समीरा रेड्डीने मुलीसोबतचा फोटो शेअर करत दिला हा पावरफुल मेसेज

सासू आणि सुनेचा बोलबाला

समीरा रेड्डीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला असून हा व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे. यामध्ये समीरा आणि तिची सासू या दोघांचेही बाँंडिंग दिसून येत आहे. वास्तविक समीराने आपल्या सासूसह एक आव्हान अर्थात चॅलेंज पूर्ण केले आहे. या चॅलेंजचं नाव आहे फ्लिप द स्वीच चॅलेंज (fliptheswitchchallenge). हल्ली हे चॅलेंज सोशल मीडियावर खूपच ट्रेंडिंग आहे. या आव्हानात दोन व्यक्तींना एकाच ट्यूनवर डान्स करायचा असून डान्स करता करता त्यांची पोझिशन बदलायची आणि एकमेकांचे कपडेही बदलायचे असतात. समीराने हे आव्हान आपल्या सासूसह पूर्ण केलं आहे. पण हे आव्हान पूर्ण करताना या दोघीही खूपच गोड दिसत असून दोघींनाही सतत बघावं वाटेल असा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये  समीराची सासू एका आरशासमोर उभी आहे आणि तिच्यामागे समीरा काळ्या टॉप आणि जीन्समध्ये डान्स करत आहे. पण काही सेकंदाने हा व्हिडिओ स्वीच होतो आणि समीराच्या जागी तिची सासू आणि सासूच्या जागी समीरा दिसते. व्हिडिओ बघून हा व्हिडिओ करताना दोघींनी खूपच धमाल केली असेल हे जाणवत आहे. हा व्हिडिओ खूपच मजेशीर असून सध्या खूपच व्हायरल होतो आहे. 

समीराने केलं ट्रोलर्सचं तोंड बंद, म्हणाली मी करिना नाही

ADVERTISEMENT

समीराचे गरोदरपणातील फोटोशूटही झाले होते व्हायरल

यापूर्वीही समीराने नायराच्या वेळी केलेल्या गरोदरपणातील फोटोशूटही व्हायरल झाले होते. कारण अगदी नवव्या महिन्यात तिने हे अंडरवॉटर शूट केले होते. समीराने 2014 मध्ये उद्योगपती अक्षय वर्देसह लग्न केले.  त्यानंतर तिने 2015 मध्ये हंस या तिच्या मोठ्या मुलाला जन्म दिला तर 2019 मध्ये तिने नायरा या गोड मुलीला जन्म दिला आहे. ती आपल्या दोन्ही मुलांना खूपच मस्त सांभाळत असून त्या दोघांबरोबरही मातृत्वाचा आनंद घेत आहे. त्याशिवाय ती अनेक ठिकाणी जाऊन गरोदरपणाच्या  काळात आपल्या फिटनेसची कशी काळजी घ्यायची याबद्दलही सांगते. दोन्ही गरोदरपणाच्या वेळी तिने स्वतःकडेही व्यवस्थित लक्ष दिले आणि फिटनेसची काळजी घेतली. त्यामुळे इतर महिलांनाही याचा उपयोग व्हावा असे तिला वाटत आहे. 

Pregnant समीरा रेड्डीचं अंडरवॉटर हॉट फोटोशूट, फोटो व्हायरल

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

12 Mar 2020
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT