ADVERTISEMENT
home / Women's Safety
Self defence products to carry in your bag if you are traveling alone

एकटं फिरताना सुरक्षेसासाठी स्वतःजवळ बाळगा या वस्तू

महिलांसाठी आजूबाजूचे वातावरण सुरक्षित असतंच असं नाही. एकटीने प्रवास करताना महिलांना अनेक गोष्टींबाबत सावध राहावं लागतं. पण याचा अर्थ महिलांनी एकटीने घराबाहेर पडूच नये असं नाही. आजकल सोलो ट्रॅव्हल करण्याचे प्रमाण वाढले आहे. एकटं फिरणं ही अनेकींची आवड असू शकतं. एवढंच नाही  तर कामानिमित्त अथवा एखाद्या अडचणीच्या वेळी महिलांना आवड नसतानाही एकटीने प्रवास करावा लागू शकतो. मग अशा वेळी स्वतःच्या सुरक्षेची काळजी देखील स्वतःलाच घ्यावी लागते. यासाठी एकटं फिरताना महिलांकडे या काही गोष्टी असायला हव्या. यासोबत वाचा भारतात एकट्या प्रवाश्यांसाठी उत्तम ठिकाणे (Places For Solo Travelers In India In Marathi) आणि शेअर करा 100+ Trekking Quotes In Marathi | Travel Quotes In Marathi, Safety Slogan In Marathi | जाणून घ्या सुरक्षा घोषवाक्य मराठी

पेपर स्प्रे

एकटं प्रवास करायची वेळ आली तर तुमच्या सुरक्षेसाठी एखादा पेपर स्प्रे पर्समध्ये जरूर बाळगा. सिरोना कंपनीचा पेपर स्प्रे तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरेल. या स्प्रेचा आकार अतिशय छोटा असून तो तुमच्या कोणत्याही आकाराच्या बॅगेत सहज मावेल. शिवाय याचा वापर करणंही खूप सोपं आहे. याचं नोझल दाबल्यावर खूप लांबवर धूर पसरू शकतो. महत्त्वाचं म्हणजे याचा परिणाम जवळजवळ पाऊण तास राहतो. त्यामुळे तुम्ही स्वतःची सुरक्षा या स्प्रेच्या मदतीने नक्कीच करू शकता.

सेफ्टी रॉडस

आजकाल बाजारात फोल्डेबल सेफ्टी रॉड मिळतात, जे मेटलने बनवलेले असतात. तुम्ही तुमच्या बॅगेत हे रॉड सहज ठेवू शकता. या रॉडचं वजन कमी असलं तरी ते प्रसंगी एखाद्यावर चांगले भारी पडू शकतात. तुमच्या गाडीत अथवा बॅगेत तुम्ही ते नेहमी ठेवू शकता. विशेषतः जेव्हा तुम्ही एकटीनेच प्रवास करत असता तेव्हा अशा गोष्टी जवळ असणं फायद्याचं ठरतं. 

नेलकटर 

चाकू स्वतःजवळ बाळगणं योग्य वाटत नसलं तरी जर तुम्हाला एकटीने प्रवास करायचा असेल तर असं करण्यास काहीच हरकत नाही. फक्त तुम्ही विमानप्रवास करताना तो तुम्ही तुमच्या हॅंडबॅगेत कॅरी करू शकत नाही. पण असं एखादं टूल जर तुमच्याजवळ असेल तर तुम्ही कुठे अडकला तर लॉक उघडण्यासाठी अथवा स्वतःची सुरक्षा राखण्यासाठी त्याचा वापर करू शकता. तुम्ही नेलकटर मधला चाकूदेखील यासाठी कॅरी करू शकता.

ADVERTISEMENT

सेल्फ डिफेन्स कीचेन

घराबाहेर पडताना तुमच्याजवळ घराच्या किल्ल्या असतात. मग त्यासाठी अशी कीचेन निवडा ज्यामुळे तुम्ही सेफ्ल डिफेन्स करू शकता. आजकाल अशा सेल्फ डिफेन्स की चेन कस्टमाइज करून मिळतात. जर तुमच्या हाताजवळ असं एखादं शस्त्र असेल तर तुम्हाला बाहेर फिरताना सुरक्षित वाटू शकतं. शिवाय तुम्हाला प्रवासात त्रास देणारी व्यक्ती तुमच्याकडे असलेल्या अशा शस्त्रामुळे बिचकून राहू शकते.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

17 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT