बॉलीवूडचा कबीर सिंग म्हणजेच अभिनेता शाहीद कपूर हा दुसऱ्यांदा दादा झाला आहे. शाहीदचे सावत्र वडील आणि ईशान खट्टरचे बाब राजेश खट्टर यांना झाला आहे मुलगा. नुकतंच त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्यांचा मुलगा वनराजचे फोटो शेअर केले. खरंतर वनराजचा जन्म मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात झाला होता. पण राजेश यांनी आपल्या फॅन्ससाठी हे फोटो आत्ता शेअर केले आहेत.
आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बायको वंदना सजनी आणि मुलासोबतचे हे फोटो शेअर करत वनराजच्या वतीने त्यांनी लिहीलं आहे की, सगळ्यांना नमस्कार, वडिलांनी सांगितलं की, आताचा हा काळ खूपच कठीण आहे. पण हा कठीण काळही जाईल आणि तुम्ही सर्वजण आमच्या मुलांसाठी हे जग पुन्हा एकदा आधीपेक्षा जास्त सुंदर बनवाल. आम्ही या वचनासाठी तुम्हा सर्वांचे धन्यवाद करतो. घरी राहा सुरक्षित राहा. या पोस्टवर अनेक टेलीव्हिजन अभिनेत्यांनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
मागच्याच वर्षी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राजेश यांनी वडील होण्याबाबत सांगितलं होतं की, माझ्यासाठी वयाच्या पन्नाशीत वडील होणं हे खूप मोठं आव्हान होतं. असं करणारा ना मी पहिला माणूस आहे ना शेवटचा. तर त्यांची पत्नी वंदना म्हणाली होती की, गेल्या 11 वर्षात माझा तीनवेळा गर्भपात, तीन IUI, तीन IVF हे अयशस्वी ठरले. एवढंच नाहीतर तीन सरोगसीचे प्रयत्नही अयशस्वी ठरले. त्यानंतर आम्ही इथपर्यंत पोचलो आहोत. माझा आनंद मी शब्दांमध्ये व्यक्त करू शकत नाही. मला माझी कहाणी सांगायची आहे. कारण ती प्रत्येक कपलला विश्वास कायम ठेवण्यास आणि आशा न सोडण्यासाठी प्रेरणा देईल. मग कोणतंही वय का असेना.
राजेश हे शाहीदचे सावत्र वडील तर ईशानचे सख्खे वडील आहेत. 1990 मध्ये राजेश यांचं लग्न शाहीद आणि ईशानची आई नीलिमा अजीम यांच्याशी झालं होतं. मात्र नंतर 2001 साली त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर राजेश यांनी वंदना सजनी हिच्याशी 2008 साली लग्न केलं.
जेव्हा मीरानेच केलं शाहिदला इन्स्टावर ट्रोल
शाहीदचे सावत्र वडील आणि ईशानचे वडिल असलेले राजेश खट्टर हे आजही अभिनय क्षेत्रात सक्रीय आहेत. त्यांच्या बेहद या मालिकेतील भूमिका प्रेक्षकांना आवडली होती.
जेव्हा मीराने केली ‘कबीर सिंह’ करण्यासाठी शाहिदची मनधरणी
धडक’ बॉय ईशान आणि स्टुंडंट अनन्या दिसणार एकत्र, फोटो केला शेअर