ADVERTISEMENT
home / Fitness
शिल्पा शेट्टीने केलं सासूचं वर्कआऊट पाहून कौतुक

शिल्पा शेट्टीने केलं सासूचं वर्कआऊट पाहून कौतुक

आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की, वर्कआऊट आणि योगा करणं निरोगी आणि फिट राहण्यासाठी आवश्यक आहे. पण आपल्या सगळ्यांकडेच यासाठी लागणाऱ्या इच्छाशक्तीची कमतरता असते. त्यामुळे बरेचदा आपल्या प्रेरणा देतात ते बी-टाऊन सेलिब्रिटीज. त्यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी कुंद्रा. जी नेहमीच स्वस्थ रहा, मस्त रहा असा संदेश देत तिचे योगा व्हिडिओज शेअर करत असते. पण आता कळतंय की, फक्त 44 वर्षीय शिल्पाचं फिटनेस एन्थु नाहीतर तर तिचं कुटुंबही तिच्यासारखंच आहे.

आत्तापर्यंत आपण शिल्पा शेट्टी, तिचा नवरा राज कुंद्रा, तिचा क्युट मुलगा विआन आणि बहीण शमिताचे वर्कआऊट व्हिडिओज पाहिले होते. पण पहिल्यांदाच शिल्पाने तिच्या सासूचा वर्कआऊट व्हिडिओ शेअर केला. शिल्पाची सासू वर्कआऊट करत असताना पाठीमागे शिल्पाची कॉमेंट्री सुरू असून नातू विआन आजीला चिअर करत आहे. पाहा हा उत्साह देणारा व्हिडिओ.

शिल्पाने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, माझ्या 68 वर्षीय सासूबाई वर्कआऊट करत आहेत. किती प्रेरणादायी आहे हे. त्यांना हाय डायबेटीस आहे पण तरीही त्या आवर्जून वॉक घेतात किंवा योगा करतात. त्यांची मेहनत व्याखाणण्यासारखी आहे. मला त्यांच्या या शिस्तीबद्दल आदर आहे. यावरून त्यांना आरोग्याचं असलेलं महत्त्व कळतं. हा व्हिडिओ तुम्हालाही प्रेरणा देईल आणि हेही कळेल की, कधीही सुरूवात केली तरी हरकत नाही. हा व्हिडिओ पोस्ट केला तर त्या मला ओरडणार हे नक्की. खूप खूप प्रेम आई. आम्हाला तुमच्या आशिर्वादाबद्दल आणि या प्रेरणेबद्दल खूप अभिमान आहे. सर्वांनी घरी राहा आणि खुशाल राहा. तर या व्हिडिओवर शिल्पाची बहीण शमिताने कमेंट केली आहे, ‘सो स्वीट’ आणि राज कुंद्राने लिहीलं आहे की, ‘सुपर मॉमी’.

Good news: शिल्पा शेट्टी पुन्हा आई, घरी आली लक्ष्मी

ADVERTISEMENT

 

लॉकडाऊनच्या काळात शिल्पाने मुलांनाही कसं व्यस्त ठेवावं, याबाबतचा संदेश देणारा व्हिडिओही शेअर केला होता. तसंच ती आपल्या मुलासोबत क्राफ्टसुद्धा करत आहे.

कोणाला बघून आली शिल्पा शेट्टीला ‘अक्की’ची आठवण

या काळात शिल्पा आपल्या कुटुंबियांसोबतचे काही ना काही मजेशीर व्हिडिओ शेअर करत असते. मग तो मुलगा विआनसोबतचा मस्ती करतानाच व्हिडिओ असो वा सामाजिक संदेश देणारा नवऱ्यासोबतचा हँडवॉश व्हिडिओ असो.

ADVERTISEMENT

‘नन्ही परी’च्या स्वागतासाठी शिल्पाने ठेवली ग्रँड पार्टी

06 Apr 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT