अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेस आणि सुडौल शरीरयष्टीसाठी लोकप्रिय आहे. करोडो लोकांच्या ह्रदयात तिने तिच्या सौंदर्य आणि फिगर यांच्या जादूने स्थान मिळवले आहे. ती फिटनेस व्हिडिओज आणि सोशल मीडिया पोस्टमधून चाहत्यांना नेहमीच फिट राहण्याची प्रेरणा देत असते. मात्र आता खुद्द शिल्पा शेट्टीने तिच्या या फिट आणि सुखी जीवनाचं सिक्रेटच चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. शिल्पाने सोशल मीडियावर याचा खुलासा केला आहे. ज्यातून तिच्या सुखी आणि निरोगी जीवनाचं रहस्य उघड होत आहे.
शिल्पाचा फिटनेस मंत्र
शिल्पा शेट्टीने व्यायाम आणि योगाने स्वतःचा उत्तम फिटनेस राखला आहे. शिवाय ती तिच्या संसारातही अतिशय सुखी असल्याचं नेहमीच जाणवत असतं. पती राज कुंद्रा, मुलगा वियान आणि मुलगी शमीशा असं शिल्पाचे सुखी कुटुंब आहे. आई, बहीण, सासरची मंडळी यांच्यासोबतही ती नेहमीच तिचे आनंदाचे क्षण साजरे करत असते. एकीकडे बॉलीवूडमधीलअनेकमंडळी नैराश्याच्या अधीन गेलेली आढळतात. बाहेरील परिस्थिती, संसारातील अडीअडचणी, करिअरचे प्रेशर, मुलांच्या भविष्याची चिंता अशा अनेक गोष्टींचा ताण प्रत्येकावरच असतो. सर्वसामान्यांप्रमाणेच बॉलीवूड कलाकार यातून वाचलेले नाहीत. मात्र अशा ताणतणावाच्या जीवनातही शिल्पा शेट्टी नेहमीच हसमुख आणि आनंदी असते. शिल्पाने तिच्या सोशल मीडियावर याचं रहस्य खुलं केलं आहे. तिच्या या पोस्टनुसार तिने तिच्या या सुखी जीवनाची प्रेरणा एका 123 वर्षच्या व्यक्तीकडून घेतली आहे. यासाठी जाणून घ्या कोण आहे ही व्यक्ती…
कोण आहे शिल्पाला प्रेरणा देणारी व्यक्ती
शिल्पासाठी प्रेरणास्थान असलेली ही व्यक्ती आहे काशीमधील एक वयोवृद्ध योग साधक ‘शिवानंद बाबा’ शिवानंद बाबांकडे पाहून शिल्पाला नेहमीच सुखी आणि समाधानी राहण्याची शिकवण मिळत असते. तिने सोशल मीडियावर शेअर केलं आहे की, 123 वर्षांचे शिवानंद बाबा हे सर्वात सुखी आणि सकारात्मक व्यक्ती आहेत. निरोगी आरोग्यासाठी आपल्या सर्वांचे ते आदर्श आहेत. जर एखाद्याने सतत चांगले विचार केले, चांगले आचरण केले, मनात अगदी कमी ईच्छा आणि समर्पण भावना असेल तर तुम्हाला तुमच्यातच देव सापडू शकतो. ज्यामुळे तुमचे आयुष्य सुंदर आणि आनंददायी होते. शिल्पाने इंन्स्टाच्या पोस्टवर या सर्व गोष्टींचा सविस्तर उल्लेख केलेला आहे. तिने यासाठी एक खूप मोठी पोस्ट लिहिली आहे.
(3/4)
…excessive desires can help us attain an unimaginable level of calm, peace, & happiness. Who better than this living example to enlighten us with such wisdom in this day and age?
— SHILPA SHETTY KUNDRA (@TheShilpaShetty) July 14, 2020
सुखी जीवनासाठी शिल्पा नेमकं काय करते
शिल्पाच्या या पोस्टमध्ये तिने असाही उल्लेख केला आहे की, तिने शिवानंद बाबांकडून प्रेरणा घेत तिच्या सुखी जीवनाचा मंत्र घेतला आहे. तिने हा मंत्र शेअर करत सांगितलं आहे यासाठी “जीवनात आनंदी राहा, समाधानी राहा आणि सकारात्मक राहा”. शिल्पा शेट्टीने शेअर केलेली ही पोस्ट आणि व्हिडिओ तिच्या इन्स्टा आणि ट्विटर अकाऊंटवर व्हायरल होत आहे. तिला तिच्या चाहत्यांकडून यासाठी भरभरून प्रतिसाद मिळत आहे. तिच्या या पोस्टमुळे जगातील योगसाधनेमुळे फिट असलेली सर्वात जास्त वयाची व्यक्तीदेखील सर्वांसमोर आली आहे. शिवानंद बाबांच्या अचूक वयाबाबत अजुनही काही वाद नक्कीच आहेत. ज्यामुळे त्यांचे नेमके वय काय हा वादाचा मुद्दा असू शकतो. मात्र हा वादाचा मुद्दा सोडला तर शिल्पा सारख्या फिटनेस प्रिय व्यक्तीला अशा लोकांकडून प्रेरणा मिळते यात काहीच वावगं वाटण्यासारखं नक्कीच नाही. कारण जे स्वतः फिटनेस जपतात तेच इतरांना त्याची प्रेरणा देऊ शकतात. तेव्हा फिट राहा आणि सुखी राहा.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
थिएटर पुन्हा उघडण्याच्या बाबतीत शेखर कपूर यांनी दिली महत्वाची बातमी
इशा गुप्ताचे हॉट फोटोशूट, तूप खाऊन मेंटेन केली फिगर
मुंबईच्या डब्बेवाल्यांवरच उपासमारीची वेळ, या अभिनेत्यांनी पुढे केला मदतीचा हात