ADVERTISEMENT
home / आरोग्य
तुम्ही विनाकारण चिंता करत असाल तर करा हे सोपे उपाय

तुम्ही विनाकारण चिंता करत असाल तर करा हे सोपे उपाय

आजकालच्या आधूनिक काळात माणसाला वेळ हा पैशाप्रमाणेच महत्त्वाचा आहे. मात्र हा वेळच काही जण नको त्या गोष्टींवर विचार करण्यासाठी घालवतात. विनाकारण चिंता करण्याची ही सवय मग कधी तुमचा स्वभाव होते तुम्हाला कळतही नाही. ज्याचा परिणाम तुम्ही सतत चीडचीड करत राहता, तुम्हाला सतत थकवा जाणवतो, वारंवार डोकेदुखी जाणवते आणि कोणाशी बोलण्याची इच्छा होत नाही. हळू हळू या लक्षणांचे नैराश्यामध्ये रूपांतर होऊ शकते. यासाठी वेळीच तुमची ही सवय बदलणं गरजेचं आहे. जर तुम्हाला सतत असे नकारात्मक आणि चिंतेचे विषय मनात येत असतील तर या गोष्टींवर लक्ष द्या.

एकटे राहू नका –

एकटं राहिल्यामुळे तुम्ही चिंता,काळजी करत बसण्याची शक्यता अधिक वाढते. यासाठी नेहमी एकटं राहणं टाळा. जेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही जास्त विचार करत आहात. तेव्हा कोणाशीतरी बोला. मात्र मित्र मंडळींशी बोलताना तुमच्या चिंता, काळजीचेच चिंतन करू नका. जवळच्या लोकांजवळ बोला आणि मन मोकळं करा. मात्र त्यानंतर त्या विषयावर फार विचार करत बसू नका. 

कोणत्याही गोष्टीला पटकन प्रतिक्रिया देऊ नका-

एखाद्या विषयावर बोलतान पटकन कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका. कारण त्यामुळे तुमच्या मनातील विचार प्रगट होतात आणि गैरसमज वाढत जातात. त्यापेक्षा त्या गोष्टीवर सारासार विचार करून मग तुमचा प्रतिसाद द्या. गरज नसेल तर उगाचच कोणाला सल्ले, उपदेश देत बसू नका. त्यापेक्षा तुमची विचारशक्ती एखाद्या चांगल्या कामात गुंतवा आणि तिचा चांगला फायदा करून घ्या. सकारात्मक पुस्तके वाचा, छंद जोपासा ज्यामुळे तुमचे विचारचक्र सुधारेल.

ADVERTISEMENT

pexels

श्वसनाचा व्यायाम करा –

मन आणि शरीर यांचा एकमेकांवर परिणाम होत असतो. तुम्ही जे चिंता काळजीचे नकारात्मक विचार करता त्यांचे पडसाद तुमच्या शरीरावर उमटतात आणि तुमचे आरोग्य बिघडते. यासाठी आरोग्य जपायचे असेल तर मन आणि शरीराला जोडणारा दुवा म्हणजे प्राणायम अथवा श्वसनाचा व्यायाम करायला हवा. ज्यामुळे तुमच्या शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळेल आणि मन निवांत होईल. जेव्हा जेव्हा तुमच्या मनात नकारात्मक विचार येतील तेव्हा श्वासावर लक्ष देत विचारांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करा. प्राणायामासोबत ध्यानधारणेचा यासाठी तुम्हाला फायदा होऊ शकतो.

स्वतःच्या गुणांकडे लक्ष द्या –

मनात चिंता, काळजीचे विचार आल्यामुळे जर तुम्हाला भविष्याची चिंता वाटत असेल तर चांगले विचार करा. जसे की तुमच्यामध्ये असलेले गुण, आवड, तुमच्यामधील एखादे कौशल्य, छंद यामुळे तुम्ही आयुष्यात बरंच काही करू शकता. आजवर तुमच्या आयुष्यात घडलेल्या चांगल्या गोष्टींचा विचार करा. त्या  तुम्ही कशा मिळवल्या त्यामागचे तुमचे प्रयत्न  आठवा आणि या परिस्थितीवर कशी मात करू शकता यावर चिंता नाही तर चिंतन करा. चिंतन म्हणजे अभ्यासपूर्वक केलेले विचार

अपयशावर अशी करा मात –

अपयश आल्यामुळे खचून न जाता त्या अपयशावर कशी मात करता येईल याचा विचार करा. कारण तुम्ही एकमेव व्यक्ती नाही ज्याच्या आयुष्यात अपयश आले आहे. आयुष्यात अशा गोष्टी सर्वांच्याच आयुष्यात घडतात. यासाठी अपयश ही यश मिळवण्याच्या प्रोसेसमध्ये आलेली एक यशाची पायरी आहे असं समजून पुढे जा. कारण प्रयत्न केल्यास पुढे तुमच्या आयुष्यात यशाचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे प्रयत्न करत राहणं हे तुमच्या हातात आहे. 

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य – pexels

अधिक वाचा –

असे करा पैशांचे नियोजन कधीच सतावणार नाही आर्थिक चिंता

सतत टेन्शन आल्यावर काय करावे (Anxiety Symptoms In Marathi)

ADVERTISEMENT

रात्री शांत झोप येत नाही का, मग फॉलो करा या टिप्स

 

19 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT