साप हा प्राणी बघितलाच तर अनेकांची बोबडी वळते. तो चावल्यानंतर काय होईल याची कल्पनाही करवत नाही. साप चावण्याच्या घटना या गावी, शेतात काम करताना अनेकदा घडतात. ज्या ठिकाणी घनदाट झाडी असतात तेथे सापांचा वावर अगदी हमखास असतो. साप हा प्राणी सहसा पटकन येऊन चावत नाही. त्याच्यावर पाय पडला किंवा त्याला तुम्ही आक्रमण करताय असे वाटू लागते त्याचवेळी तो तुमच्यावर हल्ला चढवतो.साप चावल्यावर कधी कधी कळतही नाही. त्यामुळे साप चावल्यावर लक्षणे (snake bite symptoms in marathi) जाणून घेणे फारच गरजेचे आहे. साप चावल्यानंतर काही लक्षणे ही प्रकर्षाने दिसून येतात. तुम्हाला काही चावल्यासारखे झाले असेल आणि शरीरात काही बदल होऊ लागले असेल तर तुम्हाला साप चावल्याची शक्यता टाळता येत नाही. म्हणूनच जाणून घेऊया साप चावल्यावर लक्षणे आणि त्यावरील उपाय (snake bite treatment in marathi)
साप चावल्यावर दिसणारी लक्षणे (Snake Bite Symptoms In Marathi)
तु्म्हाला साप चावला आहे का? हे जाणून घ्यायचं असेल तर काही लक्षणं दिसू लागतात. या लक्षणांवरुन तुम्हाला कळू शकतं की, तुम्हाला साप चावला की नाही.
दोन दातांची खूण
साप चावला हे काही जणांना खूप वेळा कळत नाही. ट्रेकिंग किंवा रानात फिरायला गेल्यावर पटकन काहीतरी आपल्याला चावल्यासारखे वाटते. पण मच्छर चावले किंवा किटक चावले असा विचार करत असाल तर अशावेळी दुर्लक्ष करु नका. तुम्ही नीट पाय किंवा जेथे चावले तेथे तपासा. जर तुम्हाला दोन दातांच्या खुणा दिसत असेल तर तुम्हाला साप चावला असे समजून जा. दोन दातांची खूण ही साप चावलेली असू शकते.
श्वास घेण्यास त्रास होणे
शरीरात विष भिनू लागले की, शरीरातील ऑक्सिजन कमी होऊ लागतो. त्यामुळे अर्थात श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. जर काहीतरी चावल्यानंतर तुम्हाला जर असा श्वास घेण्यास अडथळा निर्माण होत असेल तर तुम्ही तुमचे शरीर तपासा जर तुमहाला काहीतरी चावल्यासारखे दिसत असेल तर हा त्रास झाल्याची शक्यता असू शकते.
पाय सुजणे, लाल दिसणे
साप चावल्यावर खूप जणांना पाय सुजण्याचा त्रासही होऊ लागतो. पाय सुजल्याचा त्रास देखील खूप जणांना होतो. ज्या ठिकाणी चावले तिथे जर विषबाधा झालेली असेल तर त्या ठिकाणी पाय सुजलेला दिसतो. तो भाग गरम लागतो. जखमेच्या ठिकणी पाय देखील लाल होतो. त्यामुळे तुम्हाला असे होत असेल तर त्वरीत डॉक्टरांनी संपर्क साधा.
पोटात दुखणे
पोटदुखी ही देखील सर्पदंशामुळे होऊ शकते. सर्पदंशाचे विष जर शरीरात भिनले असेल तर तुम्हाला हा त्रास होण्याची शक्यता आहे. खूप जणांना हा त्रास काही मिनिटातच जाणवतो. तर काही जणांना हा त्रास काही काळाने जाणवतो.
हातापायांना मुंग्या
साप चावल्यानंतर हातापायांना मुंग्या देखील येऊ लागतात. तुम्हाला साप चावल्यानंतर जर अशा मुंग्या येत असतील तर तुम्हाला याचे गंभीर परिणाम होऊ लागतात. त्यामुळे जर तुम्हाला हातापायांना मुंग्या येत असतील तर तुम्ही नक्की काळजी घ्या.
उलट्या होणे
साप चावल्यावर शरीरात विष भिनल्यामुळे उलट्या येण्याचे त्रास होऊ शकतात. जर तुम्हाला असा त्रास होत असेल तर तुम्ही लगेचच काळजी घ्याय. उलट्या होण्याचे त्रास होत असेल तर तुम्ही याची योग्य ती काळजी घ्यायला हवी.
मळमळणे
उलट्या होण्याआधी खूप जणांना मळमळ जाणवत राहते अशी मळमळ तुम्हाला होत असेल आणि तुम्हाला काहीतरी चावले असेल तर तुम्हाला साप चावण्याची शक्यता नाकारता येत नाही. साप चावल्याची लक्षणे मध्ये हे देखील एक लक्षण आहे.
साप चावल्यावर करायचा प्रथमोपचार (Snake Bite First Aid In Marathi)
साप चावल्यानंतर काही प्रथमोपचार हे करणे देखील तितकेच गरजेचे असते. त्यामुळे आराम मिळण्यास मदत मिळते. साप चावल्यावर (snake bite treatment in marathi) नेमकी कोणती ते देखील जाणून घेऊया.
डॉक्टरांचा सल्ला
साप चावल्यानंतर योग्य सल्ला घेणे हे सगळ्यात जास्त महत्वाचे असते. जर तुम्हाला साप चावला असेल आणि काही त्रास होऊ लागला असेल तर घरगुती इलाज करुन वेळ घालवण्याऐवजी त्वरीत डॉक्टर गाठा. कारण डॉक्टरांना त्यावर योग्य वेळी उपचार करणे सोपे जाते. साप चावल्यानंतर विष शरीरात भिनू न देणे फारच गरजेचे असते. जर विष शरीरात भिनले तर जिवास मुकावेल लागू शकते. त्यामुळे जर अशा गोष्टी टाळायच्या असतील तर तुम्ही योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या. सापाचा प्रकार जाणून घेत विष शरीरातून बाहेर काढण्यासाठी डॉक्टर मदत करु शकतात. त्यामुळे सगळ्यात आधी तु्म्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हालचाल रोखणे
साप चावल्यानंतर तुम्ही सगळ्यात आधी तुम्ही हालचाल करणं थांबवा. जर तुम्ही हालचाल केली तर हे विष शरीरात अधिक भिनायला लागते. त्यामुळे तुम्ही सगळ्यात आधी हालचाल रोखा. तुम्हाला साप चावल्यानंतर जळजळ होत असली तरी देखील तुम्ही ती हालचाल थांबवा. जर तुम्ही स्थिर आणि स्तब्ध राहिलात तर तुम्हाला साप चावल्याचा त्रास कमी होईल. त्यामुळे तुम्ही सगळ्यात आधी तुमची हालचाल रोखा
जंतुनाशकाने जखम स्वच्छ करणे
एखादी जखम झाल्यानंतर त्याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपण जंतुनाशकाने जखम स्वच्छ करुन काढतो. अगदी त्याचप्रमाणे साप चावल्यानंतर तुम्ही लगेचच ती जखम जंतुनाशकाने पुसून काढा. म्हणजे तुम्हाला त्रास कमी होईल. शिवाय जर विष आजुबाजूला लागले असेल तर जंतुनाशकामुळे त्याचा प्रभाव कमी होण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी सर्पदंश झालेला असेल तिथे तुम्ही जखम स्वच्छ करुन घ्या.
आवळपट्टी बांधणे
आवळपट्टी बांधताना तु्म्ही अनेकदा चित्रपटांमध्ये पाहिले असेल याचे कारण इतकेच असते की, आवळपट्टी बांधल्यामुळे विष इथे तिथे भिनत नाही. ज्या ठिकाणी साप चावला असेल तिथे ही आवळपट्टी बांधा. म्हणजे इतर भागाकडे विष भिनणार नाही. साप चावल्यानंतर आणि ते कळल्यानंतर तुम्ही लागलीच आवळपट्टी बांधा तरच तुम्हाला त्याचा फायदा मिळेल.
धीर देणे
साप चावल्यानंतर आता मृत्यू ओढावेल किंवा काहीतरी घडेल या भीतीने खूप जणांचा धीर जातो. तुम्हालाही असेच काही वाटत असेल तर धीर देणे हे कोणत्याही त्रासात महत्वाचे असते. साप चावलेल्या व्यक्तिला तुम्ही धीर देणे फारच गरजेचे असते. त्यामुळे शक्यतो धीर देण्याचे काम तुम्ही करत राहा. त्यामुळे साप चावलेल्या व्यक्तिची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.
तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)
- साप विषारी असेल हे कसे ओळखता येते?
सापांचे दोन प्रकार दिसून येतात. साधारणपणे विषारी आणि बिनविषारी असे साप असतात. बिनविषारी साप चावला. तर काळजी करण्याचे काहीच कारण नाही. पण विषारी साप चावला तर मात्र काही शारीरिक बदल जाणवू लागतात. विषारी साप चावल्यानंतर चक्कर येणे, विष अंगात भिनल्यास श्वास कोंडणे असा गोष्टी होऊ लागतात. जर तुम्हाला साप चावल्याची लक्षण जाणवत असतील तर तुम्हाला विषारी साप चावला असे समजावे
- साप चावल्यानंतर तोंडातून फेस येतो का?
साप चावल्यानंतर जर तो संपूर्ण शरीरात भिनला तर तोंडातून फेस येण्याची शक्यता असते. चित्रपटात दाखवल्याप्रमाणे लगेच फेस येत नाही. जर योग्यवेळी विषारी साप चावल्यावर काळजी घेतली नाही तर असे होण्याची शक्यता असते. - कोणते साप विषारी गटात मोडतात?
विषारी सापांमध्ये कोब्रा, किंग कोब्रा, फुरसं, रैटल स्नेक,रसेल वायपर,कोरल वायपर अशा काही सापांचा समावेश होतो. याशिवाय अन्य काही विषारी साप देखील आहेत.