मालदिव्ज हे सध्या सर्व सेलिब्रेटीजसाठी हॉट डेस्टिनेशन ठरत आहे. कारण लॉकडाऊन संपताच एकानंतर एक अशा अनेक सेलिब्रेटीजनी मालदिव्जमध्ये हजेरी लावली आहे. काही दिवसांपूर्वी मालदिव्जमध्ये तापसी पन्नू, काजल अग्रवाल, टायगर श्रॉफ, दिशा पटनी, रकुलप्रित सिंह आणि तारा सुतारिया या सेलिब्रेटिजनां स्पॉट करण्यात आलं होतं. आता नुकतीच सोनाक्षी सिन्हादेखील मालदिव्जमध्ये वेकेशन एन्जॉय करण्यासाठी गेली आहे. सोनाक्षी सिन्हा मालदिव्जमध्ये तिच्या फ्रेंडसोबत गेली असून तिने सुट्टीचा आनंद घेत असलेले काही फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.
सोनाक्षी सिन्हाने सोशल मीडियावर शेअर केले हॉट फोटो
सोनाक्षीने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर मालदिव्ज वेकेशनचे फोटो शेअर केले आहेत. सोनाक्षीचे सोशल मीडिया चाहते अनेक आहेत. त्यामुळे या फोटोंवर लाईक्स आणि कंमेटचा पाऊस पडत आहे. सोनाक्षीने समुद्रात एन्जॉय करत असलेला फोटो शेअर करत त्याला कॅप्शन दिली आहे की, “पाण्यातला आनंद काही औरच!” या फोटोमध्ये सोनाक्षीने ब्लॅक अॅंड व्हाईट बिकिनी घातलेली आहे. फोटोमध्ये सनसेट होत असल्याचं दिसून येत आहे. ज्यामुळे तिचा हा लुक खूपच छान दिसत आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून सोनाक्षीला यावर अनेक कंमेटदेखील मिळत आहेत.
सोनाक्षी सध्या मालदिव्जच्या कोधिप्परू आयर्लंडवरील ग्रॅंडपार्कमध्ये वेकेशनवर गेलेली आहे. सोनाक्षीने या बिचवर आनंद लुटत असल्याचा आणखी एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने स्वतःला आयर्लंड गर्ल असं म्हटलं आहे. सोनाक्षीच्या या दोन्ही फोटोजनां आतापर्यंत अडीच लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळालेले आहेत. ज्यावरून तिच्या फॅन फॉलोव्हर्सचा अंदाज लावता येऊ शकतो.
जसे काही चाहते सेलिब्रेटीजवर प्रेम करतात तसं काहीजण त्यांना ट्रोलही करत असतात. सोनाक्षी सिन्हादेखील नेटकऱ्यांकडून बऱ्याचदा ट्रोल होत असते. तिच्या एका फोटवर कंमेट मिळाली आहे “नशेडी लोकांचा अड्डा” अखेर लोकांना समजू दे की मालदिव्जमध्ये असं काय आहे ? तर एका कंमेटमध्ये लिहीलं आहे की, “मालदिव्जमध्ये जाणाऱ्या सेलिब्रेटिजची एक लिस्ट तयार करायला हवी” एका कंमेटमध्ये लिहिलं आहे की, “मालदिव्जमध्ये कोरोना नाही का ? कारण हे सर्व अचानक मालदिव्जलाच जात आहेत” मालदिव्जमध्ये अचानक एका पाठोपाठ अनेक सेलिब्रेटीज जात असल्यामुळे अशा कंमेट सोनाक्षीला मिळाल्या आहे.
सोनाक्षी या चित्रपटातून लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला –
खरं तर गेल्या काही महिन्यांपासून सोनाक्षी कोणत्याच चित्रपटात दिसलेली नाही. ‘दबंग 3’ हा तिचा मागच्या वर्षीचा शेवटचा चित्रपट होता. सोनाक्षीने 2010 मध्ये दबंगमधूनच बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. सलमान खान आणि सोनाक्षीच्या दबंगमधील जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. ज्यामुळे ‘दबंग’च्या तिन्ही सिक्वलमध्ये सोनाक्षी मुख्य भूमिकेत झळकली होती. आता मात्र लवकरच सोनाक्षी ‘भुजः दी प्राईड ऑफ इंडिया’ या चित्रपटातून दिसण्याची शक्यता आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अजय देवगण आणि संजय दत्त मुख्य भूमिकेत असणार आहेत. त्यामुळे या वेकेशन ब्रेकनंतर सोनाक्षी पुन्हा एकदा फ्रेश होत तिच्या कामाला सुरूवात करणार असं वाटत आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
गौहर – झेद करणार 25 डिसेंबरला लग्न, प्री वेडिंगसाठी निवडले पुण्यातील रॉयल लोकेशन
अर्जून कपूरने स्वीकारली हजार मुलांची जबाबदारी, फूडक्लाऊडद्वारे करणार मदत
हे बॉलिवूड सेलिब्रिटी नाहीत आऊडसाईडर, त्यांचे आहेत असे कनेक्शन