ADVERTISEMENT
home / मनोरंजन
सोनाली कुलकर्णीचा नथीचा नखरा, पारंपरिक पद्धतीने टोचलं नाक

सोनाली कुलकर्णीचा नथीचा नखरा, पारंपरिक पद्धतीने टोचलं नाक

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या सोशल मीडियावर फारच अॅक्टिव्ह आहे. लॉकडाऊनमध्ये अचानक साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून तिने चाहत्यांना धक्काच दिला होता. दुबईतील तिच्या एका जवळच्या मित्रांसोबत ती लवकरच लग्न करणार आहे. साखरपुड्यात तिने अगदी पारंपरिक आणि मराठमोळा लुक केला होता. तिचा हा लुक साधा असूनही अतिशय दिलखेचक वाटत होता तो म्हणजे तिने नाकात परिधान केलेल्या नथीमुळे…. नुकतेच तिने नथीमधले तिचे अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमधील सोनालीचा ‘नथीचा नखरा’ चाहत्यांना नक्कीच आवडला आहे. साधारणपणे आजकाल दाबाच्या अथवा प्रेस करून घालण्यासारख्या नथ बाजारात मिळतात. त्यामुळे नथ घालण्यासाठी नाक टोचलेलं नसलं तरी चालतं. मात्र आश्चर्य म्हणजे सोनालीने नथ घालण्यासाठी स्वतःचं नाकही टोचलेलं आहे.  एवढंच नाही तर  तिने अगदी पारंपरिक पद्धतीने नाक टोचलेलं आहे. सोनालीने तिच्या इन्स्टा अकाऊंटवरून  नाक टोचण्याचा व्हिडिओ आणि कारण शेअर केलं आहे. 

या कारणासाठी सोनालीने पारंपरिक पद्धतीने टोचलं नाक

सोनाली कुलकर्णीचा हिरकणी हा चित्रपट मागच्या वर्षी प्रदर्शित झाला होता. यात सोनाली कुलकर्णीने साकारलेली ही हिरकणी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीला उतरली होती. ज्यामुळे अप्सरानंतर पुन्हा एकदा सोनालीने आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली. या चित्रपटासाठी रायगडावर केलेलं शूट, तिथले अनुभव सोनालीने POPxo ला दिलेल्या एका खास मुलाखतीत प्रेक्षकांसोबत शेअर केले होता. विशेष म्हणजे हिरकणी साकारण्यासाठी तिने अगदी वर्षभर पार्लरमध्ये जाणंही टाळलं होतं.  मात्र जरी सोनाली हिरकणीसाठी वर्षभर पार्रलमध्ये गेली नसली तरी तिच्या हिरकणीच्या लुकने प्रेक्षकांना अक्षरशः भारावून टाकलं होतं. कारण त्यात तिने नेसलेली नऊवारीसाठी साडी आणि नाकातली मराठमोळी नथ. हिरकणी चित्रपटात नथ घालता यावी यासाठीच सोनालीने पारंपरिक पद्धतीने नाक टोचून घेतलं होतं. म्हणूनच तिने सोशल मीडियावर काही फोटोसोंबत “हिरकणी तुझ्यासाठी काय काय करावं लागलं” असं शेअर केलं आहे. अभिनेता आणि चित्रपटाचा निर्माता प्रसाद ओकने आणि तिच्या आजीने सांगितल्यामुळे तिने तिचं खरंखुरं नाक टोचलं असं तिचं म्हणणं आहे. सोनालीने  तिच्या पोस्टमध्ये याचाही उल्लेख केला आहे, “काही गोष्टी मात्र जुन्या पारंपरिक पद्धतीनेच कराव्या…” असं प्रसाद ओक आणि माझी आजी म्हणतात. तिने प्रसाद ओक यांची पत्नी मंजिरी ओकचेही यासाठी मनापासून आभार मानले आहेत. 

पाहा सोनालीचा नथीचा नखरा आणि नथींचे निरनिराळे प्रकार

नाक टोचणं हे महाकठीण काम असतं. कारण त्यासाठी नक्कीच थोडा त्रास आणि काही दिवस वेदना सहन कराव्या लागतात. मात्र एकदा नाक टोचलं की नंतर नथीचे विविध प्रकार परिधान करता येतात. यासाठीच सोनालीनेही तिचे नथीमधले विविध फोटो आणि एक कॅप्शन शेअर केली आहे. सोनालीने शेअर केलं आहे की, “एकदा त्रास सहन केला की मग पुढे मिरवायला सज्ज…” म्हणूनच आम्ही तुमच्यासोबत सोनालीचे हे निरनिराळ्या अदांमधील फोटो शेअर केले आहेत. यामधील तुम्हाला सोनालीचा नथीमधला कोणता फोटो आवडला हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा. 

ADVERTISEMENT

Instagram

Instagram

ADVERTISEMENT

Instagram

Instagram

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

‘नथ’ घातल्याशिवाय महाराष्ट्रीयन साजशृंगार अपूर्ण, पाहूया सध्याचा Trend

मराठमोळ्या पारंपरिक दागिन्यांनी खुलू शकतो नववधूचा शृगांर

नववधूवर खुलून दिसतील बाजूबंदच्या या ’15’ डिझाईन्स (15 Traditional Bajuband Designs)

ADVERTISEMENT
19 Jul 2020
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT