ADVERTISEMENT
home / मनोरंजन
अभिनेता म्हणून चालला नाही पण गायक म्हणून झाला हिट

अभिनेता म्हणून चालला नाही पण गायक म्हणून झाला हिट

कधी कधी ज्या क्षेत्रात आपल्याला करीअर करायचे असते. त्या करीअरमध्ये आपल्याला यश मिळतेच असे सांगता येत नाही. बॉलीवूडमध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत. ज्यांनी त्यांच्या करीअरची सुरुवात काही वेगळी केली होती. पण त्यांना दुसरा पर्याय निवडावा लागला. बॉलीवूडमधील हा एक कलाकार आधी अभिनेता म्हणून आला खरा. पण चांगला दिसत असूनही त्याच्या अॅक्टिंगला कोणीच पसंती दिली नाही. पण एक गायक म्हणून तो सर्वोत्तम आहे. हा गायक अन्य कोणी नसून सोनू निगम आहे. आज संगीत क्षेत्रात त्याचे नाव अव्वल स्थानावर आहे. जाणून घेऊया त्याचा हा फ्लॉप टू हिटचा प्रवास

का केलं नाही तब्बूने आजपर्यंत लग्न, जाणून घ्या कारण

अशी झाली सोनू निगमची सुरुवात

बालपणीचा सोनू

Instagram

ADVERTISEMENT

सोनू निगमचा जन्म 30 जुलै 1973 ला हरयाणा येथील फरिदाबाद येथे झाला. त्याचे वडील अगम कुमार निगम आणि शोभा निगम. अगम कुमार हे स्वत: गायक होते. तर सोनूची बहीणही  क्लासिकल गायिका आहे. सोनू साधारण 4 वर्षांचा असतना वडिलांसोबत स्टेज शो करायला जायचा. त्यावेळी मोहम्मद रफी यांची गाणी तो गायचा. अनेक लग्नसमारंभात त्याने त्यांची गाणी गायली. पुढे निगम परिवार मुंबईत आले. बॉलीवूडमध्ये गाणे गाण्यासाठी त्यांनी आपले नशीब आजमावले. वयाच्या 18 व्या वर्षी सोनूला गाण्याची संधी मिळाली. त्याला उस्ताद घुलम मुस्तफा खान यांच्याकडे शिकता आले. त्याने प्ले बॅक सिंगीगला सुरुवात केली आणि तो आज एक टॉपचा सिंगर आहे. आज त्याच्या आवाजाचे जगभर फॅन आहेत. त्याला त्याच्या आवाजासाठी अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

 

अभिनयातही दाखवली चुणूक

सोनू निगमचे कुरळे केस आणि देखणा चेहरा यामुळे त्याने अभिनयातलही आपले नशीब आजमवायचे ठरवले. त्याला अनेक ऑफर्सही आल्या. त्याने अनेक चित्रपटात काम सुद्धा केले. बालकलाकार म्हणून त्याने त्या पूर्वीही काम केली होती. ‘कामचोर’ (सोनू, 1982), ‘उस्तादी उस्ताद से’(छोटा राजू, 1982), ‘बेताब’ (छोटा सनी), हम से हे जमाना (छोटा शिवा, 1983), तकदीर (छोटा शिवा, 1983), कृष्णा कृष्णा (सुदामा, 1986) या काही चित्रपटात त्याने बालकलाकार म्हणून काम केली होती. पण त्याने हिरो म्हणून त्याचा अभिनय दाखवला तो. जानी दुश्मन : एक अनोखी कहानी( 2002). या चित्रपटात त्याला पाहिल्यानंतर अनेकांना त्याने अभिनयात काम करु नये असे वाटले. त्यानंतर त्याने ‘काश आप हमारे होते’, लव इन नेपाल  अशा काही चित्रपटात काम केले. पण म्हणावे तसे त्याला यश मिळाले नाही. 

प्रेमात असूनही लग्न करु शकल्या नाहीत या सेलिब्रिटी जोड्या

ADVERTISEMENT

काही तरी नवा करण्याचा प्रयत्न

सोनू निगम

Instagram

सोनू निगमला या संदर्भात अनेकदा प्रश्न केला जातो की, त्याने अभिनयात करिअर करण्याचा निर्णय का घेतला? त्यावर तो म्हणाला की, माणसाने काहीतरी वेगळं करत राहायला हवं. अनेकांनी आतापर्यंत वेगवेगळे प्रयत्न केले आहेत. ते यशस्वी होतातच असे नाही. सोनूने हे कितीही सांगितले असले तरी अभिनयापेक्षा त्याच्या आवाजात जादू आहे हे आपण सर्वांनीच मानायला हवे. 

बॉलीवूडस्टारची एकमेकांशी अशी गुंतली आहेत नाती

ADVERTISEMENT

कॉन्ट्राव्हर्सीज

सोनू निगम

Instagram

सोनू निगमने फार कमी कॉन्ट्राव्हर्सीज त्याच्या करिअरमध्ये केल्या. पण ज्या केल्या त्याच्यामुळे तो फारच अडचणीत आला. त्याने मुस्लिमांच्या अजाणवेळी वापरल्या जाणाऱ्या लाऊडस्पीकर आक्षेप घेतला होता. त्यावरुन त्याला जबरदस्त ट्रोल करण्यात आले. पण त्यानंतर त्याने सगळ्याच प्रार्थना स्थळांविषयी हे उद्गार काढले असे म्हटले. हे प्रकरण शांत झाल्यानंतर त्याने अजाणचा एक व्हिडिओ पोस्ट केला. त्याच्या इमारतीतून येणारा अजाणचा आवाज मुद्दाम त्याने पोस्ट केला. त्यामुळेच पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले. त्यानंतर त्याचे मुंडण करणाऱ्याला 10 लाख रुपये दिले जातील असा अजब फतवा काढण्यात आला. मग काय सोनूने स्वत:च केस कापले आणि 10 लाखाची मागणी केली. 

सोनूच्या करीअरची सुरुवात अगदी बालकलाकार म्हणून झाली. त्याला चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली.त्याला तिथे यश मिळाले नाही. पण तो उत्तम गायक म्हणून चांगला नावारुपाला आला.

ADVERTISEMENT

 घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा.

09 Apr 2020
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT