ADVERTISEMENT
home / Recipes
Benefits Of Stale Chapati In Marathi

शिळी पोळी खाल्ल्याने होतात फायदे, जाणून व्हाल हैराण (Benefits Of Stale Chapati In Marathi)

 

आपण बऱ्याचदा पाहतो की, घरातील पोळी शिळी झाली अर्थात दुसऱ्या दिवशी बरेच लोक ही पोळी गायीला खाऊ घालतात अथवा काही लोक कचऱ्यात फेकून देतात. खरं तर चपाती बनविण्याची रेसिपी तुम्हाला माहीत आहेच. आपल्याला नेहमी शिकवलं जातं की, अन्न हे पूर्णब्रम्ह आहे आणि ते वाया घालवू नये. अर्थात शिळं अन्नं खाणं कोणालाच आवडत नाही. पण त्याचा अर्थ असा नाही की, ते फेकून द्यावं. पोळी जेव्हा शिळी होते, तेव्हा ती खाणं आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं असं जर आम्ही तुम्हाला सांगितलं तर नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे. शिळी पोळी खाणं हे तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरतं. त्यामुळे शिळी पोळी टाकून देणं बंद करा आणि दुधाबरोबर खाणं सुरु करा. याचा उपयोग तुम्ही तुमचा ब्रेकफास्ट म्हणूनदेखील करू शकता.

शिळी पोळी खाण्याचे आरोग्यदायी लाभ (Health Benefits Of Stale Chapati In Marathi)

शिळी पोळी खाण्याचे एकच नाही तर अनेक फायदे आहेत. ही पोळी खाल्ल्याने आपल्या अनेक शारीरिक समस्या दूर होतात. जाणून घेऊया नक्की काय आहे शिळी पोळी खाण्याचे फायदे –

एनर्जी बूस्टरचं काम करते शिळी पोळी

Stale Chapati In Marathi

Shutterstock

ADVERTISEMENT

आपल्यापैकी काही व्यक्तींना थोडंसं काम केलं तरी थकायला होतं. अशा व्यक्तींसाठी शिळी पोळी म्हणजे एनर्जी बूस्टरचं काम करते. वास्तविक या पोळीमध्ये कार्बोहायड्रेड्स असतात जे तुमच्या शरीरातील कमतरता पूर्ण करतात. ज्यामुळे तुमच्या शरीराला लगेज एनर्जी मिळते आणि तुम्हाला उत्साही वाटतं.

वाचा – अंजीरमधील पोषकत्वे (Nutritional Value Of Anjeer)

पचनक्रिया व्यवस्थित राखायला होते मदत

शिळी पोळी खाल्ल्यास तुम्हाला पचनक्रियेची कोणतीही समस्या उद्भवत नाही. तुम्हाला पोटासंबंधित कोणताही आजार अर्थात पोटात सतत गॅस निर्माण होणं, पोट फुगणं असं काही जाणवत असेल तर त्यावर शिळी पोळी हा एक रामबाण उपाय आहे. शिळ्या पोळीमध्ये फायबर जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे पोटासंबंधित आजार दूर होतात.

शरीराचं तापमान नियंत्रणात राहातं

सामान्यत: आपल्या शरीराचं तापमान 37 डिग्री सेल्सिअस असतं. बऱ्याच कारणांनी आपल्या शरीराचं तापमान हे घटतं आणि वाढतं. पण जर आपल्या शरीराचं तापमान हे 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक झालं तर शरीराच्या अनेक भागांना त्याचा त्रास होऊ शकतो. पण तुम्ही जर शिळी पोळी खाल्लीत तर तुमच्या शरीराचं तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होते.

ADVERTISEMENT

शरीराचा आकार घडवण्यात फायदेशीर

फार कमी लोकांना हे माहीत असेल की, जिम जाणार्या लोकांसाठी शिळी पोळी फायदेशीर ठरते. शिळ्या पोळीमध्ये असणारे पोषक तत्व तुमचे मसल्स तर स्ट्रॉंग करतातच शिवाय तुम्हाला यातून अधिक ऊर्जा मिळते. यामुळे व्यायाम करून झाल्यानंतर तुमच्यामध्ये आलेला थकवा निघून जाण्यास मदत होते. त्यामुळे शरीराचा आकार घडवण्यात शिळी पोळी फायदेशीर ठरते.

वजन नियंत्रणात राहातं

वजन नियंत्रणात

Shutterstock

तुमचं वजन जर खूप वाढत असेल आणि तुम्ही त्यामुळे त्रस्त असाल तर त्यावर शिळी पोळी खाणं हा चांगला पर्याय आहे. शिळी पोळी खाल्ल्याने तुमच्या शरीरातील चरबी कमी व्हायला मदत होते. तसंच तुमचं मेटाबॉलिजम व्यवस्थित राहातं. यामुळे तुमचं तुमच्या भूकेवर नियंत्रण राहून वजनदेखील नियंत्रणात राहातं. तुम्हाला वजन कमी करण्याची इच्छा असल्यास, तुम्ही हा पर्याय अवलंबून पाहा.

ADVERTISEMENT

रक्तदाबाच्या त्रासातून मिळते मुक्तता

आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपल्या सर्वांची लाईफस्टाईल बदलली आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना रक्तदाबाचा त्रासही कमी वयात सुरु होतो. पण तुम्ही जर रोज सकाळी नाश्ता करताना दुधातून शिळी पोळी खाल्लीत तर त्याचा तुम्हाला फायदा होतो. यामुळे तुमच्या शरीरातील रक्तप्रवाहासह श्वासनलिकेचे ब्लॉकेज नीट करतात.

मधुमेही रूग्णांसाठी उपयुक्त

मधुमेही रूग्णांसाठी शिळी पोळी म्हणजे वरदान आहे. शिळी पोळी खाल्ल्याने शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राखण्यास मदत मिळते. वास्तविक शिळी पोळी इन्शुलिनमधील नियंत्रित करणाऱ्या रक्तामध्ये असलेली अतिरिक्त साखर कमी करण्यासाठी उपयोगी ठरते.

हाडांना ठेवते मजबूत

शिळ्या पोळीत असणारे प्रोटीन आणि कॅल्शियम हे घटक हाडांना मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात. शिळी पोळी खाल्ल्याने तुमची हाडं मजबूत आणि लवचिक राहतात.

शिळ्या पोळींनी बनवा हे अप्रतिम पदार्थ (Stale Roti Recipe In Marathi)

शिळ्या पोळीचे काही पदार्थ आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जे करून तुम्ही त्यामध्ये एक विशिष्ट चवही आणू शकता. पटकन आणि लगेच तयार होणारे असे काही खास पदार्थ तुमच्यासाठी.

ADVERTISEMENT

Polichi Kheer In Marathi

Instagram

ही खूपच सोपी पद्धत आहे. त्यासाठी तुम्हाला 1 ग्लास दूध आणि 1 शिळी पोळी लागते. पोळीचे बारीक तुकडे करून दुधात मिक्स करा. मग ते गरम करा आणि उरलेलं थोडं दूध घालून त्यात थोडी साखर मिक्स करा. उकळलं की गॅस बंद करून तुम्ही हे पिऊ शकता. साखरेशिवायदेखील ही डिश मस्त लागते.

शिळ्या पोळीचे पापड

Shilya Polichi Papad In Marathi

ADVERTISEMENT

Instagram

तुम्हाला तिखट आणि आंबट आवडत असेल तर तुम्ही हे करून पाहू शकता. शिळी पोळी तुम्ही तव्यावर तूप घालून पापडाप्रमाणे कडक करून घ्या. त्यावर मीठ, लाल तिखट, कोथिंबीर, कांदा आणि टॉमेटो घालून खा. तुम्हाला हवं तर तुम्ही त्यावर चाटमसालादेखील घालू शकता.

फोडणीची पोळी

Phodichi Poli In Marathi

Instagram

ADVERTISEMENT

ही पण अतिशय सोपी रेसिपी आहे. उरलेल्या शिळ्या पोळीचे लहान तुकडे करून घ्या. कढईत तेल, मोहरी, जिरं, मिरची तुकडे, कडिपत्ता, हळद, कांदा घालून परतून घ्या. वरून हे पोळी तुकडे आणि मीठ घालून थोडं कुरकुरीत होईपर्यंत वाफ काढा आणि ओलं खोबरं घालून खायला द्या. 

नोट – लक्षात ठेवा की, पोळी ही केवळ एक दिवस शिळीच असायला हवी. त्यातून खराब वास येत असल्यास, त्या पोळीचा उपयोग करू नका. कारण त्यामुळे फूड पॉईझनिंग होण्याची शक्यता असते. 

हेदेखील वाचा

Kitchen Tips: चुकूनही वापरू नका फ्रिजमध्ये ठेवलेली कणीक

ADVERTISEMENT

उपवासाच्या दिवसात चहा-कॉफी पिणं योग्य की अयोग्य

मुंबईची शान असलेला वडापाव खायचाय, तर ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या

01 Aug 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT