ADVERTISEMENT
home / Periods
मैत्रिणींनो… जर पीरियड्स येण्याआधी पोट फुगत असेल तर करा हे उपाय

मैत्रिणींनो… जर पीरियड्स येण्याआधी पोट फुगत असेल तर करा हे उपाय

मैत्रिणींनो आपल्याला दर महिन्याला मासिक पाळी येणं हा रूटीनचाच भाग आहे. पण जेव्हा पीरियड्स येतात तेव्हा ते अनेक समस्या सोबत घेऊनच येतात. पीरियड्सच्या दरम्यान अनेकींचं फोट फुगतं. कपडे टाईट होतात. अशा अनेक समस्यांना आपल्याला पीरियड्सदरम्यान सामोरं जावं लागतं.

कारण पीरियड्सदरम्यान आपल्या शरीरात अनेक हार्मोनल चेंजेस होतात. जसं पोटात होणार ब्लोटींग म्हणजेच पोट फुगणे. एका प्रोजेस्ट्रॉन हार्माेनमुळे हे होतं. तसंच या काळात ब्रेस्ट टेंडरनेस म्हणजेच ब्रेस्टची सूज आणि कडकपणा वाढणं यासारखे बदलही जाणवतात. ही लक्षणं सामान्यतः 14 व्या दिवसापासून सुरू होतात आणि मासिक पाळी संपायच्या सात दिवसापर्यंत वाढू शकतात. पोटाचं ब्लोटींग पीरियड्सनंतर अचानकच कमी होतं.

पीरियड्सआधी पोट फुगत असल्यास करा हे उपाय

ADVERTISEMENT

जर तुमचंही पोट पीरियड्सदरम्यान फुगत असेल म्हणजेच ब्लोट होत असेल तर पुढे सांगितलेले काही सोपे उपाय करून पाहा, म्हणजे तुम्हाला काही प्रमाणात फरक नक्कीच जाणवेल.

प्रोटीन आणि पॉटैशिअमयुक्त आहार सुरू करा

हाय-प्रोटीनयुक्त फूड जसं केळं, खरबूज, टोमॅटो आणि अस्‍पागॅरससारख्या घटकांना तुमच्या डाएटमध्ये सामील करा. ही घटकांमुळे तुमच्या हार्मोन लेव्हल्स कमी होऊन पोट फुगणं आणि गोळा येणं यासारख्या समस्या कमी होतील. याशिवाय आहारात प्रोटीनचा समावेशही आवर्जून करा.

पोटात गॅस निर्माण करणारे पदार्थ टाळा

ADVERTISEMENT

तुम्हाला कदाचित बीन्स, ब्रोकोली आणि कोबी यासारख्या भाज्या आवडत असतील पण या दिवसांमध्ये शक्यतो टाळा. कारण या दिवसांमध्ये तुमचं शरीर योग्य प्रकारे जेवणाचं पचन करत नाही. त्यामुळे पोटात गॅसेस होतात.

रूटीनमध्ये करा एक्‍सरसाईजचा समावेश

तज्ञांचं असं मानणं आहे की, पीरियड्समध्ये तुम्ही अवश्य व्यायाम करायला हवा. ज्यामुळे पोटाची सूज कमी होईल. ज्या मुली अगदी आरामदायी लाईफस्टाईल जगतात त्यांचं पचनतंत्र अगदीच कमकुवत असतं. तसंच व्यायाम करताना येणाऱ्या घामामुळे तुम्हाला घाम येऊन बद्धकोष्ठाची समस्याही दूर होईल. जर तुम्हाला हेवी एक्सरसाईज करायला जमणार नसेल तर किमान योगा तरी अवश्य करा.

कॉफी आणि मद्यपान नकोच

ADVERTISEMENT

पीरियड्समध्ये कधीही मद्यपान आणि कॉफी पिऊ नये कारण मद्यपानामुळे ब्रेस्टला सूज येते तर दुसरीकडे कॉफीच्या सेवनाने पोटात गडबड होणं आणि डीहायड्रेशनसारखा त्रास होतो.

जास्तीतजास्त कोमट पाणी प्या

कोमट पाणी पिण्याचे इतरवेळीही अनेक फायदे आहेतच पण पीरियड्सदरम्यानही ब्लोटींगसाठी हा उत्तम उपाय आहे. या दिवसात थंड पाण्याऐवजी कोमट पाणी जास्तीत जास्त प्या. यामुळे तुम्हाला कधीच पोट फुगण्याचा त्रास होणार नाही.

बडीशोप खा

ADVERTISEMENT

बडीशोपमध्ये एंटी मायक्रोबियल (anti-microbial) गुण असतात ज्यामुळे पोटातील दुखणं आणि गॅस यासारख्या समस्या दूर होतात. हे पोटाच्या आखडलेल्या मांसपेशींमधील मोकळं करतं आणि पोट आपोआप कमी होतं.

आल्याचं सेवन करा

आल्याचा प्रयोग हा गॅस आणि पोट फुगण्याच्या समस्येसाठी अनेक जणांकडे आवर्जून केला जातोच. कारण आहेत यातील कार्यशील तत्त्व. या काळात आलं घ्यायचं असल्यास त्याचे 5 ते 6 तुकडे करा आणि 1 कप उकळत्या पाण्यात ते उकळून घ्या. मग हे पाणी गाळून आणि थंड करून नंतर हळूहळू प्या. जर तुम्हाला याची चव वाढवायची असेल तर तुम्ही यामध्ये मध आणि लिंबाचे काही थेंबही घालू शकता.

कोल्ड ड्रींक्स टाळा

ADVERTISEMENT

जर तुम्हाला कोल्ड्रींक किंवा बाजारातील अन्य ज्यूस आवडत असतील तर ते पीरियड्स येण्याच्या एक आठवड्याआधी बंद करा. कारण यामुळे तुम्हाला जास्त ब्लोटींग होऊ शकतं. या दिवसांमध्ये फक्त पाणी प्या आणि तेही किमान 8 ग्लास.

झोप घ्या

झोप घेतल्याने तुमच्या शरीराचा थकवा दूर होतो आणि तुम्ही लवकर रिकव्हर होता. त्यामुळे रात्री जागण्याऐवजी किमान 8 तासांची पुरेशी झोप घ्या.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

ADVERTISEMENT

हेही वाचा –

पीरियड पँटी म्हणजे काय आणि तिचा वापर

लग्नाआधी तुमच्या डॉक्टरला नक्की विचारा हे ‘6’ प्रश्न

मासिक पाळी अनियमित होण्यामागची कारणं

ADVERTISEMENT
14 Oct 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT