कॅन्सर हा शब्द ऐकला तरी धडकी भरते. पोटात गोळा येतो. कारण हा असा रोग आहे, जो लवकर लक्षात येत नाही आणि जर उशीर झाला तर माणसाचा हमखास जीव जातो. दबक्या पावलांनी येणारा हा जीवघेणा रोग शरीरात कधी व कसा पसरतो. हे कधी कधी लक्षात देखील येत नाही. हा कोणत्याही प्रकारचा कॅन्सर असू शकतो आणि विशेष म्हणजे हा रोग होण्याचे नेमके कारण अजूनही शास्त्रज्ञांच्या लक्षात आलेले नाही. ज्याला एकदा कॅन्सर झाला व सुदैवाने त्यातून तो बरा झाला तरीही त्याला आयुष्यभर धास्ती असते की, आता पुन्हा हा भयंकर रोग परत तर येणार नाही ना!
Table of Contents
शरीरातील पेशींच्या अनियंत्रित विभाजनामुळे कॅन्सर होतो. या पेशी अनियंत्रितपणे वाढू लागल्या की, त्यामुळे शरीरातील निरोगी उती नष्ट होऊ लागतात आणि रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होतो. कॅन्सर हा शरीराच्या कुठल्याही भागात होऊ शकतो आणि शरीरात इतर ठिकाणी पसरूही शकतो.
पोटाचा कॅन्सर किंवा जठराचा कर्करोग (Potacha Cancer in Marathi) किंवा Stomach Cancer पोटाच्या अस्तरातून विकसित होतो. पोटाच्या कॅन्सरची बहुतेक प्रकरणे गॅस्ट्रिक कार्सिनोमा या प्रकारांत मोडतात. याचे गॅस्ट्रिक एडेनोकार्सिनोमा सारखे अनेक उपप्रकार आहेत. तसेच लिम्फोमा आणि मेसेन्कायमल ट्यूमर देखील पोटात विकसित होऊ शकतात. पोटाच्या कॅन्सर ची लक्षणे (Symptoms Of Stomach Cancer In Marathi) ही सुरुवातीला छातीत जळजळ, ओटीपोटात वरच्या बाजूला दुखणे, मळमळणे आणि भूक न लागणे अशी असतात. कॅन्सर वाढल्यास नंतर वजन कमी होणे, त्वचा पिवळी पडणे, डोळे पांढरे होणे, उलट्या होणे, गिळण्यास त्रास होणे आणि स्टूलमध्ये रक्त येणे अशी पोटातील कॅन्सरची लक्षणे (Stomach Cancer Symptoms In Marathi) आहेत. पोटाचा कॅन्सर (Stomach Cancer In Marathi) पोटातून शरीराच्या इतर भागांमध्ये पसरू शकतो, विशेषतः यकृत, फुफ्फुसे, हाडे, ओटीपोटाचे अस्तर आणि लिम्फ नोड्स या भागांत कॅन्सर पसरण्याचा धोका जास्त असतो.
आपल्या आजूबाजूला किंवा दुर्दैवाने कुटुंबात कुणाला कॅन्सरचे निदान झाल्यावर आपल्या मनात पहिला प्रश्न येतो की पोटाचा कॅन्सर बरा होतो का! पोटाच्या कॅन्सरवर उपाय (Potacha Cancer Upay) आहेत का?
पोटाच्या कॅन्सरची वाढ होत असताना रुग्णाला फार तीव्र लक्षणे (Potacha Cancer Lakshan) जाणवत नाहीत. तरीही तुम्हाला पचनाचा कुठलाही त्रास फार काळ होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण पोटाचा कॅन्सर वाढून सेकण्ड स्टेजला पोहोचला की मग त्यावर उपचार करणे कठीण होते.
What Is Stomach Cancer In Marathi – पोटाचा कर्करोग म्हणजे काय?
पोटाचा कर्करोग म्हणजे जठराचा कर्करोग होय. आपले पोट हे एखाद्या पिशवीप्रमाणे असते. आपण जे अन्न खातो ते अन्ननलिकेतून जठरात येते. अन्ननलिका गॅस्ट्रोएसोफेजल (जीई) जंक्शनवर पोटाशी जोडलेली असते. गॅस्ट्रोएसोफेजल जंक्शन डायाफ्रामच्या अगदी खाली असते. (डायफ्राम म्हणजे फुफ्फुसाखाली श्वासोच्छवासाच्या स्नायूंचा पातळ शीटसारखी रचना असलेला अवयव होय) अन्न पोटात आल्यानंतर पोटात गॅस्ट्रिक ज्युसेस स्रवतात आणि अन्नपचनास सुरुवात होते. लागते. अन्न व गॅस्ट्रिक ज्युसेस एकमेकांत मिसळले जातात आणि नंतर ड्युओडेनम (पक्वाशय) नावाच्या लहान आतड्याच्या पहिल्या भागात रिकामे केले जातात. .पोटाचा कर्करोग हा किंवा मोठे आतडे, यकृत, स्वादुपिंड किंवा लहान आतड्याचा कर्करोग यांसारख्या पोटात उद्भवू शकणार्या इतर कर्करोगांपेक्षा वेगळा आहे. आपल्या पोट पाच भागांत विभागलेले असते. कार्डिया, फंडस, बॉडी (कॉर्पस), अँट्रम आणि पायलोरस असे हे पाच भाग आहेत.
आपल्या पोटाच्या स्नायूंनाही पाच स्तर असतात. यातील सर्वात आतल्या स्तराला म्युकोसा असे म्हणतात. याच लेयरमधून पोटातले ऍसिड आणि पाचकरस स्त्रवले जातात. बहुतांश केसेसमध्ये याच लेयरमध्ये पोटाच्या कॅन्सरची सुरुवात होते. कर्करोगाची स्टेज ठरवण्यासाठी हे स्तर महत्त्वाचे आहेत. यावरूनच एखाद्या व्यक्तीचे रोगनिदान व उपचार ठरवले जातात. जसजसा कर्करोग म्युकोसा लेयर मधून वाढत जातो तशी रुग्णाला अधिक ऍडव्हान्स ट्रीटमेंटची गरज पडते. पोटात आलेली गाठ किती मोठी आहे, किती पसरली आहे यावरून कॅन्सरची स्टेज ठरते.
पोटाचा कर्करोग हळूहळू विकसित होतो. खरा कर्करोग होण्याआधी, पोटाच्या आतील आवरणामध्ये (म्युकोसा लेयर) बदल होतात. या सुरुवातीच्या बदलांमुळे क्वचितच लक्षणे उद्भवतात, त्यामुळे ते अनेकदा लक्षात येत नाहीत. .पोटाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सुरू होणार्या कर्करोगामुळे वेगवेगळी लक्षणे दिसू शकतात आणि त्याचे परिणाम वेगवेगळे असू शकतात. कर्करोगाचे स्थान कुठे आहे यावर उपचारांची दिशा ठरते.
Stomach Cancer Causes In Marathi – पोटाचा कर्करोग होण्याची कारणे
पोटाचा कर्करोग होण्याची अनेक कारणे आहेत. पोटाच्या कर्करोगाचा धोका महिलांपेक्षा पुरुषांना जास्त असतो. तज्ज्ञांच्या मते महिलांच्या शरीरात असणारे इस्ट्रोजेन महिलांचे कर्करोगापासून काही प्रमाणात संरक्षण करते पुढील काही कारणांमुळे पोटाचा कर्करोग होण्याची शक्यता असते.
इन्फेक्शन – हेलिकोबॅक्टर पायलोरी या जंतूच्या संसर्गामुळे जठराचा कर्करोग होण्याची H. pylori पोटाचा कर्करोग ट्रिगर करू शकतो. H. pylori मुळे पोटाला गंभीर प्रकारची सूज येते आणि कॅन्सरचा धोका निर्माण होतो. Epstein–Barr virus मुळे देखील कर्करोगाचा गंभीर धोका होतो.
धुम्रपान- धूम्रपानामुळे पोटाचा कर्करोग होण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. जे लोक धूम्रपान करत नाहीत त्यांच्यापेक्षा धूम्रपान करणाऱ्यांना पोटाचा कर्करोग होण्याचा धोका 82% ने जास्त आहे. धुम्रपानामुळे होणारे जठराचे कर्करोग हे मुख्यतः अन्ननलिकेजवळ पोटाच्या वरच्या भागात होतात.काही अभ्यासांमध्ये असे लक्षात आले आहे की अति मद्यपानामुळे सुद्धा पोटाचा कर्करोग होऊ शकतो.
डाएट- स्मोक्ड पदार्थ, अति प्रमाणात मीठ असलेले पदार्थ, लाल मांस, प्रक्रिया केलेले मांस, यांसह इतर काही पदार्थांमुळे पोटाचा कर्करोग होऊ शकतो असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. क्युअर्ड केलेल्या मांसातील नायट्रेट्स आणि नायट्रेट्सचे एच. पायलोरीसह काही विशिष्ट जीवाणूंद्वारे अशा संयुगांमध्ये रूपांतर केले जाऊ शकते ज्यामुळे प्राण्यांमध्ये पोटाचा कर्करोग होतो असे एका अभ्यासात आढळले आहे.
लठ्ठपणा – लठ्ठपणामुळे देखील पोटाच्या कॅन्सरचा धोका वाढतो. लठ्ठपणामुळे गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लक्स रोग (GERD) चा त्रास होऊ शकतो व त्यामुळे गॅस्ट्रिक एडेनोकर्किनोमाचा धोका वाढतो. गॅस्ट्रिक कार्डिया एडेनोकार्सिनोमाचा धोका लठ्ठ व्यक्तींमध्ये 2 पटीने जास्त वाढल्याचे दिसून आले आहे.तसेच शरीरातील आयोडीनची कमतरता आणि जठरासंबंधी कर्करोग यांच्यात परस्परसंबंध असल्याचेही एका अभ्यासात दिसून आले आहे.
तसेच सुमारे 10% कॅन्सरच्या केसेस या अनुवांशिक असतात आणि 1 ते 3% केसेसमध्ये एखाद्या व्यक्तीच्या पालकांकडून अनुवांशिकतेने आलेल्या डिफ्यूज गॅस्ट्रिक सिंड्रोममुळे पोटाचा कर्करोग होऊ शकतो. याखेरीज मधुमेह, ऍनेमिया, क्रॉनिक एट्रोफिक गॅस्ट्र्रिटिस यामुळेही पोटाच्या कॅन्सरचा धोका वाढतो.
Stomach Cancer Symptoms In Marathi – पोटाच्या कर्करोगाची लक्षणे
पोटाच्या कर्करोगाची पुढील काही लक्षणे असू शकतात.
- अन्न गिळण्यास त्रास होतो.
- खाल्ल्यानंतर पोट फुगल्यासारखे वाटते.
- थोडेसे अन्न खाल्ल्यानंतर पोट लगेच खूप भरल्यासारखे वाटते.
- बऱ्याच वेळेला छातीत जळजळ होते
- अपचनाचा त्रास होणे.
- सारखा मळमळण्याचा त्रास होणे.
- पोटदुखी होणे.
- सारख्या उलट्या होणे.
- काहीही कारण नसताना वजन कमी होणे.
- ओटीपोटात सूज येणे किंवा द्रव जमा होणे
- स्टूल मधून रक्त्त जाणे
- अॅनिमिया असल्यामुळे थकवा किंवा अशक्त वाटणे
- कर्करोग यकृतामध्ये पसरल्यास त्वचा आणि डोळे पिवळसर होणे
यापैकी बहुतेक लक्षणे पोटाच्या कर्करोगाव्यतिरिक्त व्हायरल इन्फेक्शन किंवा अल्सर या इतर रोगांमुळेही होण्याची शक्यता असते. यापैकी काही लक्षणे इतर प्रकारच्या कर्करोगामध्ये देखील दिसू शकतात. ज्यांना यापैकी कोणतीही समस्या असेल आणि त्या जर लवकर बऱ्या होत नसतील, त्यांनी वेळ न दवडता डॉक्टरांना भेटले पाहिजे जेणेकरून आजारावर त्वरित उपचार सुरु करता येतील.
Stomach Cancer Remedies In Marathi – पोटाच्या कर्करोगावर उपचार
पोटाच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांच्या संपूर्ण टीमची आवश्यकता असते.
- गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट- पोट आणि आतड्यांसह गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टमध्ये तज्ञ असलेले डॉक्टर
- सर्जन किंवा सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट – शस्त्रक्रियेचा वापर करून कर्करोगावर उपचार करणारे
- वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट- औषधोपचाराने कर्करोगावर उपचार करणारे
- रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट – रेडिएशन थेरपी देणारे
- पॅथॉलॉजिस्ट – विविध चाचण्यांद्वारे कर्करोगाचे निदान करणारे
- रेडिओलॉजिस्ट- इमेजिंग चाचण्या करून रोगाचे निदान करणारे
पोटाच्या कर्करोगावर शस्त्रक्रिया, रेडिएशन थेरपी, केमोथेरपी, टार्गेटेड थेरपी किंवा इम्युनोथेरपीद्वारे उपचार केले जाऊ शकतात. रुग्णांच्या उपचारांच्या प्लॅनमध्ये कर्करोगाची लक्षणे आणि औषधांच्या साइड इफेक्ट्ससाठीही उपचारांचा समावेश असू शकतो, जो कॅन्सरवरील उपचारांचा एक महत्त्वाचा भाग आहे. कर्करोगावरील उपचार हे कर्करोगाचा प्रकार आणि स्टेज, उपचारांचे संभाव्य दुष्परिणाम आणि रुग्णाची प्राधान्ये आणि एकूण आरोग्य यासह अनेक घटकांवर अवलंबून असतात. बर्याचदा, पोटाच्या कर्करोगाच्या उपचारांसाठी विविध प्रकारच्या ट्रीटमेंटचे कॉम्बिनेशन केले जाते. दुर्दैवाने, काही केसेसमध्ये पोटाचा कर्करोग पूर्ण बरा होणे कठीण होऊ शकते कारण तो सेकण्ड स्टेजला पोहोचेपर्यंत लक्षातच येत नाही.
शस्त्रक्रिया म्हणजे ऑपरेशन दरम्यान ट्युमर आणि आसपासचे काही निरोगी टिश्यू काढून टाकणे. परंतु कुठल्या प्रकारची शस्त्रक्रिया करायची हा निर्णय कर्करोग कुठल्या स्टेजला आहे त्यावर अवलंबून असते. कॅन्सरच्या सुरुवातीच्या स्टेज मध्ये म्हणजे अगदी सुरुवातीच्या किंवा पहिल्या स्टेजमध्ये, जेव्हा कॅन्सर फक्त पोटातच असतो, तेव्हा शस्त्रक्रिया करून पोटाचा कर्करोग असलेला भाग आणि जवळपासच्या लिम्फ नोड्स काढून टाकतात याला सबटोटल किंवा पार्शल गॅस्ट्रेक्टॉमी म्हणतात. पार्शल गॅस्ट्रेक्टॉमीमध्ये, सर्जन पोटाचा उर्वरित भाग अन्ननलिका किंवा लहान आतड्याला जोडतात.
जर कर्करोग लिम्फ नोड्स किंवा पोटाच्या इतर भागात पसरला असेल तर रुग्णांना शस्त्रक्रिया आणि केमोथेरपी किंवा केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी दिली जाते. सर्जन सबटोटल गॅस्ट्रेक्टॉमी किंवा टोटल गॅस्ट्रेक्टॉमी करू शकतात.टोटल गॅस्ट्रेक्टॉमी दरम्यान, सर्जन जठर पूर्णपणे काढून टाकतात आणि अन्ननलिका थेट लहान आतड्याला जोडतात.जेव्हा कर्करोग स्टेज IV ला पोहोचतो, तेव्हा मुख्य उपचार म्हणून शस्त्रक्रिया करण्याची शिफारस केली जात नाही. त्याऐवजी इतर प्रकारच्या उपचारांची शिफारस केली जाते.
Diet For Stomach Cancer In Marathi – पोटाच्या कर्करोग साठी आहार
कोणत्याही रोगाविरुद्ध लढण्यात पोषणमूल्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. पोटाच्या कर्करोगामध्ये रुग्णांना पुढील आहार दिला तर कॅन्सरविरुद्ध लढा देण्यास मदत होते.
Quercetin युक्त पदार्थ खा: Quercetin हे वनस्पतींमध्ये आढळणारे flavonoid आहे. हे रेड वाईन, कांदे, ग्रीन टी, सफरचंद आणि बेरीज यासारख्या अनेक वनस्पती आणि पदार्थांमध्ये आढळते. Quercetin मध्ये अँटिऑक्सिडेंट्स आणि anti-inflammatory घटक असतात ज्यामुळे सूज कमी होण्यास मदत होते, कर्करोगाच्या पेशी नष्ट होतात, रक्तातील साखर नियंत्रित होते आणि हृदयरोग टाळण्यास मदत होते. कांदे, सफरचंद, लिंबूवर्गीय फळे, चेरी आणि ब्रोकोली हे पदार्थ आहारात असायला हवेत. ग्रीन टी चे शरीराला इतरही फायदे आहेत.
हळद : हळदीमध्ये कर्क्युमिन हे रसायन आढळते. त्यात कर्करोगविरोधी गुणधर्म आहेत आणि ते कर्करोगाच्या पेशी नष्ट करते. म्हणून आहारात हळदीचा समावेश आवर्जून करायला हवा.
ऍलिसिन: ऍलिसीन हे कंपाउंड सूज व जळजळ कमी करण्यास मदत करते तसेच शरीरातील पेशी आणि ऊतींना हानी करणाऱ्या फ्री रॅडिकल्सना ब्लॉक करण्यात मदत करते. लसूण हा ऍलिसिनचा एक उत्तम स्रोत आहे आणि कर्करोगाविरूद्ध खूप प्रभावी आहे. तसेच कांदा देखील ऍलिसिनचा चांगला स्रोत आहे.म्हणून आहारात कांदा व लसूण असायला हवा.
व्हिटॅमिन ए, सी आणि ई: कॅन्सरविरुद्ध आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन्सने समृद्ध असा आहार घ्या. व्हिटॅमिन ई साठी भरपूर पालक आणि बदाम खा. लिंबूवर्गीय फळे आणि टोमॅटो मधून व्हिटॅमिन सी मिळते तसेच व्हिटॅमिन ए साठी गाजर आणि रताळी यांचा आहारात समावेश करा.
कर्करोग झाला असल्यास किंवा होऊ नये म्हणूनही धूम्रपान टाळा व जास्त खारट आणि स्मोक्ड पदार्थ खाऊ नका. मद्याचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक आहे त्यामुळे ते पूर्णपणे टाळलेलेच चांगले.
दिवसातून तीन वेळेला भरपूर खाण्याऐवजी थोड्या थोड्या वेळाने थोडे पण पौष्टीक अन्न खा. जेवताना, अन्न चांगले चावून घ्या आणि हळूहळू खा. भरपूर द्रवपदार्थ प्या. दररोज आठ ते दहा ग्लास पाणी प्यायलाच हवे. परंतु जेवणाच्या वेळी किंवा त्याच्या आसपास जास्त पाणी पिणे टाळा. सोडा सारखी कार्बोनेटेड पेये पूर्णपणे वर्ज्य करा. भरपूर फायबर असलेले अन्न शक्यतोवर खाऊ नका. त्यामुळे त्रास होण्याची शक्यता असते. तसेच कॅफिनचे मर्यादित प्रमाणात सेवन करण्याचा प्रयत्न करा.
Yoga And Exercise For Stomach Cancer – पोटाच्या कर्करोगासाठी योगासने आणि व्यायाम
योग केल्यास कर्करोग झालेल्या लोकांना मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे मदत होऊ शकते, असे संशोधनात आढळले आहे. जरी योग केल्याने कर्करोग थेट बरा होत नसला तरीही योगामुळे रोगाचे काही दुष्परिणाम कमी होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते योगामुळे कर्करोगाशी संबंधित थकवा कमी होतो तसेच झोप सुधारते व नैराश्य, चिंता आणि त्रास कमी होण्यास मदत होते.
सीटेड स्पायनल ट्विस्ट
हे आसन पचन सुधारण्यास आणि मळमळ कमी करण्यास मदत करते. जमिनीवर मांडी घालून ताठ बसा..दीर्घ श्वास घ्या. श्वास बाहेर सोडताना उजव्या गुडघ्यावर डावा हात ठेवून उजवा हात पाठीमागे नेऊन उजवीकडे हळूहळू वळण्याचा प्रयत्न करा. नंतर परत दीर्घ श्वास घेऊन श्वास सोडताना उजवा हात डाव्या गुडघ्यावर व डावा हात पाठीमागे नेऊन डावीकडे हळूहळू वळण्याचा प्रयत्न करा.
विपरित- करणी
हे आसन थकवा दूर करण्यास मदत करते. प्रथम उताणे झोप. दोन्ही हात शरीराजवळ सरळ ठेवा. भिंतीचा आधार घेऊन तळहात जमिनीवर ठेवून दोन्ही पाय न दुमडता एकाच वेळेला नव्वद अंशांपर्यंत वर उचला व हळूहळू कम्बर वर उचलण्याचा प्रयत्न करा. कमरेला हातांनी आधार द्या. डोळे मिटून दीर्घ श्वास घ्या. व हळूहळू पाय खाली आणा.
सुप्त बद्ध कोणासन
सुप्त बद्ध कोणासन केल्याने देखील थकवा आणि तणाव कमी होतो तसेच अन्नपचन सुधारण्यास मदत होते. शवासनाच्या मुद्रेत आडवे व्हा. हळूहळू गुडघे दुमडून दोन्ही पावले नमस्कार करण्याच्या स्थितीत एकमेकांना जोडा. हात पसरवा आणि तळहात वरच्या दिशेने ठेवा. या स्थितीत काहीवेळ थांबून दीर्घ श्वासोच्छवास करा.
ध्यानधारणा
मांडी घालून ताठ बसा. हात गुडघ्यांवर सरळ ठेवून ज्ञान मुद्रा करा व डोळे बंद करून दीर्घ श्वासोच्छवास करा. मन शांत करा. हे केल्याने मन शांत होण्यास तसेच नैराश्य कमी होण्यास मदत होते.
पोटाचा कर्करोग होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी
पुढील गोष्टींचे पालन करून आपण पोटाच्या कर्करोगाचा धोका कमी करू शकतो.
- मद्याचे सेवन अगदी कमी प्रमाणात करणे किंवा ते टाळले तर उत्तमच.
- तंबाखूजन्य पदार्थ वर्ज्य करणे. तंबाखूमुळे तोंडाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.
- स्मोक्ड पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि खारट मांस आणि खारवलेले मासे खाणे टाळणे.
- आहारात ताजी फळे आणि भाज्या यांचा समावेश करणे आणि प्रक्रिया न केलेल्या अन्नधान्याचा आहारात समावेश करणे.
- वजन आटोक्यात ठेवणे.
- नियमितपणे व्यायाम करणे व तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करणे.
- भरपूर प्रमाणात फायबर, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी असलेला आहार घेतल्याने पोटाच्या कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो.
- धूम्रपान सोडा. धूम्रपान सोडल्याने अनेक आजारांचा धोका कमी होतो. धूम्रपान सोडल्याने पोट, डोके आणि मान, स्वरयंत्र, अन्ननलिका, फुफ्फुस, मूत्राशय, मूत्रपिंड आणि स्वादुपिंड यांच्या कर्करोगासह अनेक प्रकारच्या कर्करोगांचा धोका कमी होतो.
पोटाच्या कर्करोगाविषयी पडणारे काही सामान्य प्रश्न – FAQ
पोटाचा कर्करोग प्रथम कुठे पसरतो?
पोटाच्या कर्करोगाचा प्रसार होण्याचे सर्वात सामान्य ठिकाण म्हणजे यकृत होय. पण पोटाचा कर्करोग फुफ्फुसे, , लिम्फ नोड्स किंवा उदर पोकळी (पेरिटोनियम) मध्ये देखील पसरू शकतो. त्यामुळे त्याचे निदान लवकर होणे आवश्यक आहे.
पोटाच्या कर्करोगाचे प्रारंभिक लक्षण काय आहे?
पोटाच्या कर्करोगाचे सर्वात महत्वाचे लक्षण (stomach cancer symptoms in marathi) म्हणजे काहीही प्रयत्न न करता अचानक वजन कमी होणे हे आहे. तसेच ओटीपोटात दुखणे, नाभीच्या वर पोटात अस्वस्थता जाणवणे, थोडेसेच जेवण केले तरी एकदम खूप पोट भरल्यासारखे वाटणे ही लक्षणे जाणवत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
आपल्याला पोटात गाठ असेल तर ती जाणवू शकते का?
आपल्याला ट्युमर असेल तर तो जाणवू शकत नाही कारण पोटाचा कर्करोग हळूहळू विकसित होतो. पोटातील ट्यूमर बहुतेकदा डॉक्टरांनाच शारीरिक तपासणी दरम्यान जाणवतो.
बद्धकोष्ठतेमुळे पोटाचा कर्करोग होऊ शकतो का?
ओटीपोटात ट्यूमर असेल तर त्यामुळे आतडे अरुंद होऊ शकतात व बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. पचनाचे विकार हे पोटाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. तुम्हाला जर फार काळ पचनाचे विकार जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
पोटाचा कर्करोग, ज्याला गॅस्ट्रिक कर्करोग देखील म्हटले जाते तेव्हा होतो जेव्हा पोटातील निरोगी पेशींचे म्युटेशन होते व त्या नियंत्रणाबाहेर वाढतात. पोटातील ट्यूमर कर्करोगजन्य किंवा बेनाइन असू शकतो. कर्करोगाची गाठ घातक असते, म्हणजे ती वाढू शकते आणि शरीराच्या इतर भागांमध्ये पसरू शकते. बेनाइन ट्यूमर वाढू शकतो पण तो इतर ठिकाणी पसरत नाही. पोटाच्या कोणत्याही भागात कर्करोगाची सुरुवात होऊ शकते आणि तो जवळपासच्या लिम्फ नोड्स आणि शरीराच्या इतर भागांमध्ये देखील पसरू शकतो.
बहुतेक पोटाचा कर्करोग हा एडेनोकार्सिनोमा नावाचा प्रकार असतो. याचा अर्थ असा होतो की पोटाच्या आतील बाजूस असलेल्या ग्रंथीच्या ऊतीमध्ये कर्करोगाची सुरुवात होते. पोटात तयार होणाऱ्या इतर प्रकारच्या कर्करोगाच्या गाठींमध्ये लिम्फोमा, गॅस्ट्रिक सारकोमा आणि न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर यांचा समावेश होतो, परंतु हे दुर्मिळ आहेत. पोटाच्या कॅन्सर ची लक्षणे सुरुवातीला अगदी सौम्य असतात किंवा कधी पोटाचा कॅन्सर लक्षणे दाखवत देखील नाही. अशावेळी तो जर सेकण्ड स्टेजला गेला तर त्यावर उपचार करणे कठीण होऊन बसते. पोटाच्या कॅन्सरवर उपाय नक्कीच आहेत पण तो लवकर लक्षात आला तर धोका लवकर कमी होतो. म्हणूनच प्रत्येकाने आपापल्या पोटाच्या आरोग्याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे.
फोटो क्रेडिट – istockphoto
अधिक वाचा –