ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
crop top fashion

प्लस साईज महिलांनी वापरावा क्रॉप टॉप अशा पद्धतीने, स्टायलिंग टिप्स

प्लस साईज (Plus Size) महिला बऱ्याचदा आपल्या स्टायलिंगसाठी नक्की काय वापरायचं याच्या विचारात असतात. काही वेळा आवडलेल्या कपड्यांची साईज मिळत नाही तर साईज मिळाल्यावर कपडेच आवडत नाहीत अशी परिस्थिती बऱ्याचदा निर्माण होते. तसंच असे अनेक आऊटफिट्स आहेत जे त्यांना घालायचे असतात पण त्याच्या मोठ्या पोटामुळे आपल्याला हे कपडे चांगले दिसणार नाहीत असं त्यांना वाटतं आणि त्यामुळे कपडे घातले जात नाहीत. यामुळे पूर्ण लुक बिघडेल अशी भीती त्यांना वाटते. असा काहीही विचार केला जाऊ शकतो. असा कपड्यांपैकीच एक आहे क्रॉप टॉप (Crop Top). क्रॉप टॉप तर अतिशय स्टायलिश असतात आणि त्यामुळे बऱ्याच मुलींकडे हा असतोच. पण प्लस साईड महिला आपल्या मनात असूनही क्रॉप टॉप कॅरी करू शकत नाहीत असं त्यांना वाटतं. पण तुम्ही जर स्मार्टली क्रॉप टॉपचा वापर केलात तर प्लस साईज महिलांनाही याची स्टायलिंग करता येऊ शकते. तुम्हाला क्रॉप टॉप घालायचा असेल तर अजिबात तुमचे मन मारू नका. आम्ही तुम्हाला काही स्टायलिंग आयडिया देत आहोत. त्याचा वापर करा आणि दिसा अधिक सुंदर! या स्टायलिंग टिप्सचा (Styling tips) वापर करून तुम्ही क्रॉप टॉप नक्कीच घालू शकता. 

क्रॉप टॉपची उंची

Image – Freepik

क्रॉप टॉप घालण्याचा अर्थ हा नाही की, तुम्ही आकाराने लहान असणारा क्रॉप टॉपच निवडावा. तुम्हाला तुमच्या पोटाच्या दिसण्याबाबत नेहमीच अडचण असते. त्यामुळे तुम्ही असा क्रॉप टॉप निवडा ज्याची उंची किमान बेंबीपर्यंत तरी असेल. तसंच तुमच्या क्रॉप टॉपची उंची तुमच्या बॉटम स्टाईलवरदेखील अवलंबून असते. उदाहरणार्थ तुम्ही जर हायवेस्ट बॉटम यासह घालणार असाल तर तुम्हाला तुमचा क्रॉप टॉप हा छातीच्या उंचीपर्यंत निवडावा लागतो. तर जीन्स असल्यास, क्रॉप टॉप घालताना तुम्ही उंची अधिक ठेऊन स्टाईल करू शकता. 

को-आर्ड लुक निवडा

Co – aard look

सर्व प्लस साईज महिलांसाठी क्रॉप टॉप स्टाईल करण्याचा एक चांगला पर्याय आहे. तो म्हणजे तुम्ही को – आर्ड लुकमध्ये काळ्याच्याऐवजी पेस्टल रंगापासून ते सॉलिड रंगांपर्यंत को-आर्ड आऊटफिट घालून अधिक स्टायलिश दिसू शकता. उदाहरणार्थ तुम्ही क्रॉप टॉपसह हाय वेस्ट स्कर्ट घालून को-आर्ड लुक क्रिएट करू शकता. तसंच तुम्ही दिवसभर अगदी संध्याकाळपर्यंत हे आऊटफिट घालून आऊटिंगदेखील करू शकता. 

या गोष्टीची घ्या काळजी 

क्रॉप टॉप न घालण्याचं कारण जाडी असेल तर लक्षात घ्या की, असा कोणताही फॅशन ट्रेंड हा खास फिगरसाठी बनविण्यात आलेला नसतो. प्रत्येक मुलीला फिट होईल आणि चांगला दिसेल अशीच फॅशन नेहमी बाजारात येत असते. कोणतीही स्टाईल तुम्ही योग्य पद्धतीने आणि आत्मविश्वासाने कॅरी करणे महत्त्वाचे आहे. प्लस साईज महिला कपडे निवडताना आपले पोट दिसणार नाही याची काळजी घेतात पण त्यादरम्यान बरेचदा चुकीचे आऊटफिट निवडतात. त्यामुळे अधिक जाडी दिसते. तसंच अधिक टाईट कपडे हे तुम्हाला अधिक जाडसर दाखवतात. त्यामुळे तुम्ही क्रॉप टॉप अशा पद्धतीने घाला जो अधिक टाईट नसेल अथवा अधिक सैलसर नसेल. तसंच क्रॉप टॉप घालताना पोट लपविण्याचा उगीचच प्रयत्न करण्याच्या फंदात पडू नका. तर योग्यरित्या स्टाईल करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करा त्यामुळे तुम्ही स्टायलिश दिसालच. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

15 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT