ADVERTISEMENT
home / आरोग्य
रक्ताचा कॅन्सर

जाणून घ्या रक्ताचा कर्करोग, लक्षणे (Symptoms Of Blood Cancer In Marathi)

कॅन्सर, कर्करोग या आजाराविषयी ऐकल्यानंतरच खूप जणांच्या पायाखालची जमीन सरकू लागते. या आजाराचे योग्यवेळी निदान झाले तर यावर योग्य इलाज करता येतो आणि आयुष्य वाढवता येते.  कॅन्सर या आजाराला खूप जण फारच घाबरुन जातात. आजही लोकांमध्ये या आजाराबाबत तेवढी सजगता नाही. आज आपण ज्या आजाराबद्दल जाणून घेणार आहोत तो कर्करोगाचा प्रकार ‘रक्ताचा कर्करोग’ आहे. या विषयीची थोडीफार माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.  रक्ताचा कर्करोग म्हणजे नेमकं काय ते आधी जाणून घेऊया.  ल्युकेमिया हा कर्करोगाचा असा प्रकार आहे जो रक्तांच्या पेशीशी निगडीत असा आजार आहे. हा आजार नेमका कसा होतो याचे एक असे कारण सांगता येत नाही. पण हा कर्करोग हा खूपच प्राणघातक स्वरुपाचा मानला जातो. रक्तपेशींमध्ये होणाऱ्या बदलामुळे हा आजार होऊ लागतो. रक्ताचा कॅॅन्सर हा बोनमॅरो अर्थात अस्थिमज्जामध्ये  सुरु होतो.  रक्तातील पांढऱ्यापेशी या असामान्य होण्यामुळे हे कर्करोग होतो. रक्ताचा कर्करोग झाला आहे याचे निदान करण्यासाठी बायोप्सीद्वारे निदान केले जाते. या आजाराचे निदान झाल्यानंतर  केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी केली जाते. ब्लड कॅन्सरची नेमकी लक्षणे कोणती हे देखील जाणून घेऊया

ब्लड कॅन्सर ची लक्षणे (Symptoms Of Blood Cancer In Marathi)

Symptoms Of Blood Cancer In Marathi

आपले शरीर वेगवेगळे संकेत देत असते. ब्लड कॅन्सर ची लक्षणेही आपल्याला जाणवत असतात. ही लक्षणे (Symptoms Of Blood Cancer In Marathi ) देखील आपण जाणून घेणे फारच गरजेचे असते.

वजन कमी होणे (Weight Loss)

काही जणांचे वजन हे अचानक कमी होते. काहीही न करता जर तुमचे वजन झपाट्याने कमी होत असेल तर  ही फारच चिंतेची बाब आहे. कारण शरीराचे वजन असे अचानक कमी होणे म्हणजे शरीरात काही बदल होण्यासारखे असते. त्यामुळे जर असे झपाट्याने वजन कमी झालेले असेल तर तुम्ही योग्यवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यानुसार तुम्ही काही चाचणी करा. म्हणजे तुम्हाला त्याचे निश्चित कारण कळू शकेल. 

ताप (Fever)

 ताप हे देखील रक्ताच्या कर्करोगाचे  एक लक्षण आहे.  जर तुम्हाला वरच्या वर सतत त्रास होत असेल तर ही देखील गंभीर बाब आहे. ताप हे वेगवेगळ्या कारणामुळे येऊ शकतात. अनेक साथीचे आजार देखील असतात. पण कोणत्याही साथीच्या आजाराशिवाय तुमचे शरीर गरम होत असेल सतत ताप येत असेल तर तुम्ही याची योग्य चाचणी करुन घ्यावी. अनेकदा डॉक्टर अशावेळी कॅन्सरची चाचणी करण्याचा नक्कीच सल्ला देतात.

ADVERTISEMENT

थकवा (Fatigue)

 थकवा येणे हे देखील कर्करोगाचे एक लक्षण आहे.  ल्युकेमिया झालेल्या व्यक्तिला काम करण्यास अडथळा येऊ लागतो. त्याच्याकडून कोणतेही काम नीट होत नाही. जर तुम्हाला असा थकवा काहीही कारण नसताना होत असेल तर ते ल्युकेमियाचे एक लक्षण असू शकते.  त्यामुळे थकवा येत असेल तर त्याकडे मुळीच दुर्लक्ष करु नका. थकवा येण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात. ही कारणे देखील माहीत हवीत

हाडं आणि सांध्यामध्ये दुखापत (Bone and joint pain)

सांधेदुखीचा त्रास हे देखील रक्ताचा कर्करोगासाठी कारणीभूत ठरु शकतो.  कधी कधी या वेदना फारच कमी असतात म्हणून आपण त्याकडे लक्ष देखील देत नाही. या वेदनेमागे पांढऱ्या पेशी कारणीभूत असू शकतात.  त्यांच्यामध्ये बदल झाला की, तुमहाला अशाप्रकारची सांधेदुखी जाणवू लागते. आमवात म्हणजे काय? आमवातावरील उपाय जाणून घेत काळजी घ्या.

सूज आणि लसिका गाठी (Swelling Of Lymph Nodes)

 रक्ताचा कर्करोग झाल्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती आधीच कमी झालेली असते. त्यामुळेच ही काही लक्षण आपल्याला जाणवू लागलेली असतात.  यामुळेच शरीराला सूज येऊ लागते. विशेषत: लसिका गाठी यांना सूज येऊ लागते. मान, ओटीपोट, खासगी जागेत सूज येते.ज्यांचा रगं निळा किंवा काळा देखील असतो. अशा गाठींकडे दुर्लक्ष करु नका.

 ब्लड कॅन्सरची कारणे (Blood Cancer Causes In Marathi)

Blood Cancer Causes In Marathi

ब्लड कॅन्सर होण्यामागे काही कारणेही असू शकतात. जाणून घेऊया ब्लड कॅन्सरची कारणे (Blood Cancer Causes In Marathi).

ADVERTISEMENT
  1. वाढते वयोमान देखील शरीरातील पांढऱ्या पेशींच्या असामान्यपणासाठी कारणीभूत असते. 
  2. अनुवंशिकता देखील यासाठी कारणीभूत ठरु शकते. 
  3. कमकुवत रोगप्रतिकार शक्ती
  4.  एखादे इन्फेक्शन 
  5. बदलती जीवनशैली 
    अशा काही कारणांमुळे रक्ताचा कर्करोग होण्याची शक्यता असते. याशिवाय कॅन्सरचे अन्य प्रकार जसे की स्तनांचा कर्करोग हा देखील महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो

ब्लड कॅन्सरचे प्रकार (Types Of Blood Cancer In Marathi)

Types Of Blood Cancer In Marathi

ब्लड कॅन्सरची लक्षणे (Symptoms Of Blood Cancer In Marathi) आणि कारणे जाणून घेतल्यानंतर याचे प्रकार (Types Of Blood Cancer In Marathi) जाणून घेऊया.

ल्यूकेमिया (Lukemia)

ल्युकेमिया नावाने रक्ताचा कर्करोग ओळखला जातो. यामध्ये रक्तात असे टिश्यू तयार होतात जे रक्तातील पांढऱ्या पेशींची संख्येमध्ये बराच बदल करतात. रक्तातील पांढऱ्या पेशी वाढणे आणि कमी होणे हे दोन्हीही त्रासदायक असते.  हाडांमधून हा आजार पसरत शरीरात जातो. पण हा त्रास नेमका कशामुळे होतो याचे ठोस कारण अद्याप विज्ञानाकडे नाही. पण अस्थिमज्जेमधून हा आजार पसरत जातो आणि पांढऱ्या पेशींवर हल्ला करत त्यांची संख्या कमी जास्त करतो.

लिंफोमा (Lymphoma)

लिँफॅटीम सिस्टीम ही शरीरातील अशी यंत्रणा आहे जी वेगवेगळ्या आजारांशी लढत असते.  यामध्ये लिंफ नॉडस, स्पिलिन, थायमस य़ा भागांना त्रास होऊ लागतो.  याचा त्रास होऊ लागला की, वजन कमी होऊ लागते.  असा काही त्रास तुम्हाला होऊ लागला की, तुम्हाला लिंफोमा प्रकारातील रक्ताचा कर्करोग झाला आहे असे समजावे.

मायलेओमा (Myleoma)

प्लासमा  हे असे पांढऱ्या पेशीतील घटक आहे जे अशा प्रकारामध्ये बोनमॅरोमध्ये परिणाम करतात. प्लाझमा सेल्सवर परिणाम झाल्यामुळे प्रतिकार शक्ती, किडनी आणि लाल पेशींवर परिणाम होऊ लागतो. त्यामुळे जर  असा त्रास तुम्हाला  होत असेल तर तुम्ही योग्य तपासणी करुन घ्या. 

ADVERTISEMENT

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)

  1. रक्ताच्या कॅन्सरची पहिली पायरी कोणती ?
    रक्ताच्या कॅन्सरच्या पहिल्या पायरीमध्ये लिंब नॉड्स या वाढू लागतात. हे यामुळे होते कारण शरीरात अचानक lymphocytes वाढू लागतात. या पहिल्या पायरीमध्ये कॅन्सर हा शरीरात पसरलेला नसतो. या योग्यवेळीच त्याची जाणीव झाली की, त्यावर योग्य इलाज करता येतो. जर तुम्हाला असे काही होत असेल तर तुम्ही योग्य वेळी इलाज करायला हवा.
  2.  कॅन्सर झाला हे सांगणारी 7 लक्षणे कोणती ?
    छातीत दुखणे,  ताप, खाण्याची इच्छा नसणे,  रात्री घाम येणे, थकवा जाणवणे, शरीराला खाज येणे, श्वास घेण्यास त्रास होणे  असा काही त्रास जाणवायला लगाला की, त्याकडे दुर्लक्ष करु नका. कारण हा त्रास कॅन्सर असू शकतो.
  3.  रक्ताच्या कॅन्सरचे निदान कसे होते ?
    रक्ताची चाचणी केल्यानंंतर त्यामध्ये असणारे वेगवेगळ्या रक्तपेशींची तपासणी केली जाते. या शिवाय बोनमॅरो बायोप्सी करुन देखील ह कॅन्सर झाला की नाही हे कळते.  वेगवेगळ्या चाचण्या करुन रक्ताच्या कॅन्सरचे निदान केले जाते. 
03 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT