हल्लीची मुलं हॉलिवूड सेलिब्सपेक्षाही फॉलो करु लागले आहेत ते के स्टार्सना आता हे के स्टार्स कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हे आहेत कोरियन स्टार्स. गेल्या काही वर्षांपासून के पॉप, के-ड्रामा यांनी विशेषत: लहान मुलांना वेड लावून सोडलं आहे. पण एखाद्या गोष्टीची इतकी क्रेझ निर्माण होणे अजिबात चांगले नाही. कारण हल्लीची मुलं बऱ्याच गोष्टी या त्या कल्चरच्या फॉलो करायला पाहात आहे. तुम्हाला के- ड्रामा किंवा या संदर्भात काहीही माहीत नसेल तर जाणून घेऊया प्रसिद्ध कोरियन एंटरटेन्मेंटबद्दल
देवमाणूस’ फेम आणि नृत्यांगना माधुरी पवार दिसणार ‘दिशाभूल’ मध्ये
बीटीएस (BTS)
कोरियन कल्चरची सुरुवात या BTS पासून केली नाही तर कसे चालेल. तुमची साधारण 12-16 वयोगयापर्यंतची मुलं वेगळ्या भाषेतील गाणी ऐकत असतील. ती फॉरेन भाषा तुम्हाला कळत नसेल तर एकदा त्यांचा टॅब नीट पाहा कारण ते BTS ची गाणी पाहण्यात दंग असू शकतात. BTS हा साऊथ कोरियामधील 7 मुलांनी एकत्र येऊन तयार केलेला बँड आहे. या बँडचे नाव बँग्टन बॉईजवरुन ठेवण्यात आलेले आहे. 2013 साली या बँडची स्थापना झाली. या बँडमधील प्रत्येक गायक आणि परफॉर्मर हा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे. वी, जीन, पार्क-जी-मीन, सुगा, जे होप अशी काही या कलाकारांची नावे आहेत. या बँडच्या आहारी जाऊन खूप जणांनी त्यांचे वेगवेगळे प्रॉडक्टही बनवले आहेत. कॉफी, टीशर्ट अशा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला त्यांचे पोस्टर्स दिसतील
ब्रेकअपच्या चर्चा नुसत्या अफवा,मलायका-अर्जुन पुन्हा एकत्र
के- ड्रामा
कोरिया हा देश नियमांनी भरलेला आहे. इथे काहीही करायचे असेल तर नियम आहेत. कोरियामध्ये काही गोष्टी निषिद्ध आहेत. तर काही गोष्टी अगदी हमखास कराव्यात अशा आहेत. ज्याप्रमाणे आपण हॉलिवूड, बॉलिवूड,टॉलिवूड अशी ओळख निर्माण केली आहे. अगदी त्याच प्रमाणे हा के – ड्रामा फारच प्रसिद्ध आहे. त्यांच्या देशात टीव्हीवर लागणाऱ्या रोजच्या सीरिजही हल्ली सगळीकडे प्रसारित होतात. सबटायटलसह ओटीटी प्लॅटफॉर्मवर या सीरिज पाहता येतात. त्यामुळे मुलांना पाहण्यासाठी विशेष कुठे जावे लागत नाही. पण याची क्रेझ आता इतकी वाढली आहे की मुलांना ओटीटीवर तेच पाहायला आवडते.
वेळीच थांबवा वेड
एखाद्या गोष्टीच्या आहारी जाणे हे पौंगडावस्थेतील मुलांसाठी अजिबात चांगले नाही. कोरियामध्ये लोकं काय खातात. त्यांचा डाएट काय? असे प्रश्न आता आपल्या मुलांना पडू लागले आहेत. कोरियन मुलांची त्वचा पांढरी आणि मुली या बारीक असतात. त्यांमुळे आता आपली मुलंही बारीक होण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. युट्युबवर या संदर्भातील इतके व्हिडिओज आहेत. ज्यामध्ये उपास करुन बारीक कसे होता येईल ते दाखवण्यात आलेले आहे. पण ते मुलांसाठी अजिबात चांगले नाही. कोरियामध्ये जे निषिद्ध आहे ते आपली मुलं करायला बघत नाही. कोरियन भाज्यांना काहीही चव नसताना ते खायला बघतात. एखादी आवड असणे चांगले पण आपल्या गोष्टी नावडत्या होणे हे इतक्या लहान वयात चांगले नाही. म्हणूनच तुमची मुलं असे काही करत असतील तर त्यांना वेळीच आवरा.
के-ड्रामा बघताना तुमची मुलं काय करत आहेत. याकडेही अधिक लक्ष द्या.
हिंदीमध्ये झळकतोय आता हा नवा मराठमोळा चेहरा, मिळत आहेत नवे कॅम्पेन्स