लग्नामध्ये कोणते दागिने घालायचे यासाठी आपण नेहमी वेगवेगळे पर्याय शोधत असतो. सध्या ट्रेंडमध्ये आहे ती म्हणजे टेम्पल ज्वेलरी (Temple Jewellery). टेम्पल ज्वेलरी किंवा डान्स ज्वेलरी हे पारंपरिक दक्षिण भारतीय दागिने आहेत. मात्र हल्ली लग्नामध्ये टेम्पल ज्वेलरीचा ट्रेंड जास्त पाहायला मिळत आहे. हे दागिने अगदी पूर्वीच्या काळापासून देवदेवतांच्या अंगावर चढवले जात होते. तसंच यामध्ये देवळाच्या डिझाईनचे अनेक दागिने आपल्याला दिसायला देतात. विशेषतः कांजिवरम अथवा दाक्षिणात्य साड्यांवर या दागिन्यांचा साज अगदी शोभून दिसतो. हे दागिने अगदी पूर्वीपासून नृत्यांगना जास्त प्रमाणात घालत होत्या त्यामुळेच त्याला डान्स दागिने असेही म्हटले जाते. तंजावर शहरातील देवळातील खांबांवर असलेल्या शिल्पकला या दागिन्यांच्या नक्षीसाठी प्रेरणास्थान असल्याचे समजते. देवी – देवता, कमळ, मोर अशा प्रकारची मोठी आणि ठसठशीत नक्षी या दागिन्यांवर दिसून येते आणि म्हणूनच हे दागिने पटकन डोळ्यात भरतात आणि अगदी लग्नांमध्येही उठून आणि शोभून दिसतात.
नववधूसाठी ‘पर्ल पर्ल’ दिल के पास (Pearl Jewellery Designs In Marathi)
कमळातील लक्ष्मी जास्त ट्रेंडिंग
या टेम्पल ज्वेलरीमध्ये नक्षीकाम असले तरीही यामध्ये सगळ्यात जास्त कमळामध्ये बसलेली लक्ष्मी असा हार जास्त प्रसिद्ध आहे. यामध्ये विशेष नक्षीकाम करण्यात येते. यामध्ये हार, कर्णभूषण, कंठीहार, केशभूषण, नथ, वेणी, पायातील तोडे, जोडवी, कंबरपट्टा, बांगड्या, बाजूबंद, बिल्वर अशी अगदी केसांपासून ते पायापर्यंत सर्व आभूषणं अर्थात दागिने आपल्याला टेम्पल ज्वेलरीमध्ये दिसतात. या दागिन्यांमध्ये नववधू नखशिखांत नटली तर तिच्यावरची नजर हटत नाही हे नक्कीच मान्य करावे लागेल. गडद रंगाच्या साड्यांवर हे टेम्पल दागिने खूपच सुंदर दिसतात. इतकंच नाही तर या दागिन्यांमध्ये स्त्री चे रूप अधिक खुलून दिसते. साधारण या दागिन्यांमध्ये सोन्याचा वापर केला जातो. पण जर इमिटेशन ज्वेलरी असेल तर त्यावर सोन्याचा मुलामा चढवला जातो. तसंच यामध्ये सोनं असेल तर त्यामध्ये हिरे, माणिक, मोती, पोवळे या खड्यांचा वापर करून त्यावर कलाकुसरही करण्यात येते. तुम्हाला हवं तसं डिझाईन तुम्ही बनवून घेऊ शकता.
कोणतेही दागिने ठेवायचे असतील चमकदार, तर करू नका ‘या’ चुका
आजकाल वाजवी दरात आहेत उपलब्ध
सध्या सोन्याच्या दागिन्यांपेक्षा तुम्हाला हवं तसं तुम्ही टेम्पल ज्वेलरी करून घेऊ शकता. या दागिन्यांमध्ये मूळ साचा तांबे, चांदी आणि सोने असा मिश्रित असतो. या तांब्याच्या अथवा चांदीच्या दागिन्यांवर सोन्याचा मुलामा चढवला जातो. आजकाल हे दागिने शुद्ध सोन्यात तर मिळतातच. पण तुम्हाला हे दागिने परवडणारे नसतील तर तुम्हाला वाजवी दरामध्येही हे दागिने उपलब्ध करून देण्यात येतात. तुम्हाला बाजारामध्ये टेम्पल ज्वेलरी तुमच्या खिशाला परवडणारीही मिळू शकते. त्यासाठी अमाप पैसा मोजण्याची गरज नाही. तसंच तुमची साडी कोणत्या पद्धतीची आहे त्याप्रमाणे तुम्ही या दागिन्यांची निवड करू शकता. मात्र तुम्ही यासाठी कांजिवरम, कांचीपुरम अथवा काही दाक्षिणात्य साड्यांची निवड केली तर नक्की तुमच्या दागिन्यांची शोभा अधिक वाढते. कारण या साड्यांवर हे दागिने अधिक चांगले शोभून दिसतात. त्यामुळे यावेळी तुम्ही लग्नात काही वेगळा लुक करायचा विचार करत असाल तर नक्कीच टेम्पल ज्वेलरीचा विचार करावा. तुम्हीही दिसाल अधिक सुंदर आणि आकर्षक!
या दिवाळीसाठी वापरा खास आकर्षक दागिने, निवड करा अशी
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक