वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अगदी महत्त्वाचा दिवस असतो. आपल्याला आपल्या नातेवाईकांचे, आप्तेष्टांचे, मित्रमैत्रिणींचे अनेक संदेश, शुभेच्छा यादिवशी येत असतात. आठवणीने अनेक जण वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्याला देतात. त्यामुळे वाढदिवसाच्या धन्यवाद संदेश देणे हे आपलंही कर्तव्य आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा बद्दल धन्यवाद (Thanks for Birthday Wishes In Marathi) देणारे संदेश मराठीतून आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे देत आहोत. कोणालाही असंच धन्यवाद न देता राहणं योग्य नाही. त्यातही आपल्या मायबोलीमधून धन्यवाद देणे (Birthday Thanks Msg In Marathi) अधिक आपुलकी वाढवते. वाढदिवसाचे आभार प्रदर्शन (Birthday Abhar Pradarshan In Marathi) आता अगदी सोशल मीडियासाठीही महत्त्वाचे झाले आहे. तुम्हीही आता तुमच्या मित्रमैत्रिणींना वाढदिवस धन्यवाद संदेश (Thanks SMS For Birthday Wishes In Marathi) पाठवा.
Table of Contents
- मित्रमैत्रिणींसाठी वाढदिवस शुभेच्छा धन्यवाद संदेश (Thanks For Birthday Wishes In Marathi To Friends)
- वरिष्ठांना वाढदिवसाच्या शुभेच्छा बद्दल धन्यवाद संदेश (Thank You Message For Birthday Wishes In Marathi To Elders)
- सहकाऱ्यांसाठी वाढदिवस शुभेच्छा धन्यवाद संदेश (Thanks SMS For Birthday Wishes In Marathi To Colleagues)
- जिवलग मित्रांना वाढदिवसाच्या आभार संदेश मराठी (Thank You For Birthday Wishes In Marathi To BFF)
- वाढदिवस शुभेच्छा दिल्याबद्दल आभार प्रदर्शन (Birthday Abhar Pradarshan In Marathi)
मित्रमैत्रिणींसाठी वाढदिवस शुभेच्छा धन्यवाद संदेश (Thanks For Birthday Wishes In Marathi To Friends)
Thanks For Birthday Wishes In Marathi To Friends
मित्रमैत्रिणींशिवाय कधीच आपला वाढदिवस पूर्ण होत असतो. आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतात. आपल्या सुखदुःखातील जवळच्या मित्रमैत्रिणींना पाठवायचे आपण वाढदिवसाबद्दल धन्यवाद शुभेच्छा संदेश (Thank You For Birthday Wishes In Marathi) जाणून घेऊया.
1. आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त प्रेमरूपी शुभेच्छा दिल्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. सर्वांचे मनापासून आभार!
2. तुमच्यासारखा मित्रपरिवार मला लाभला हे मी माझं भाग्य समजते. तुमच्याशिवाय माझा हा वाढदिवस साजरा झालाच नसता. तुम्ही दिलेल्या लाखमोलाच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद!
3. माझ्यावर केलेल्या शुभेच्छांच्या वर्षावासाठी मनापासून धन्यवाद! तुमच्याशिवाय आजचा दिवस इतका सुंदर साजरा झालाच नसता.
4. तुमच्या शुभेच्छांमुळेच माझा वाढदिवस अधिक खास झाला. तुमच्या प्रेमाबद्दल मी तुमची शतशः आभारी आहे.
5. आपण दिलेल्या शुभेच्छांचा जणू माझ्यावर वर्षावच झाला. आपल्या याच शुभेच्छांमुळे माझा आनंद द्विगुणित झाला आहे. आपणास मनापासून धन्यवाद!
6. खरेच आपण वेळात वेळ काढून मला शुभेच्छा दिल्याबद्दल मनापासून आभार. असेच चांगल्या-वाईट प्रसंगात माझ्या पाठीशी उभे रहा. धन्यवाद!
7. तुमच्यासारख्या मित्रमैत्रिणी मला लाभल्या हे मी माझे भाग्य समजते/समजतो. माझा वाढदिवस अधिक विशेष केल्याबद्दल तुमचे आभार
8. वेळात वेळ काढून मला शुभेच्छा दिल्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानते/मानतो. दरवर्षी आपले प्रेम असेच वृद्धिंगत होवो हीच सदिच्छा.
9. माझ्या वाढदिवसानिमित्त आपण ज्या प्रेमरूपी सदिच्छा दिल्या, शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी आपला खूप खूप ऋणी आहे.
10. मला माझ्या वाढदिवसादिवशी भरभरून शुभेच्छा देणाऱ्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे मनः पूर्वक आभार. धन्यवाद…!
11. वाढदिवसाच्या दिवशी आपण दिलेल्या शुभेच्छा या माझ्यासाठी खास आहेत. स्नेह आहेच तो वृद्धिंगत व्हावा हीच इच्छा. आपले मनःपूर्वक धन्यवाद!
12. माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी विविध माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शुभेच्छारुपी स्नेह व्यक्त केल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद!
13. माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही दिलेल्या प्रेमरूपी शुभेच्छांची मी अखंड ऋणी आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छांचा आदर ठेवून सर्वांचे मनःपूर्वक आभार!
14. आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी वेळात वेळ काढून मला फोन करून, भेटून व मेसेज करून ज्या शुभेच्छा दिल्या त्यासाठी आपले खूप खूप आभार. असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहू द्या.
15. आपले प्रेम, स्नेह आणि विश्वास याचा अमूल्य ठेवा मनाच्या गाभाऱ्यात कायम जतन राहील. आपण दिलेल्या शुभेच्छांबद्दल खूप खूप आभार!
वाचा – वाढदिवसाला पाठवण्यासाठी भन्नाट विनोद
वरिष्ठांना वाढदिवसाच्या शुभेच्छा बद्दल धन्यवाद संदेश (Thank You Message For Birthday Wishes In Marathi To Elders)
Thank You Message For Birthday Wishes In Marathi To Elders
आपल्याकडे आजही घरातील अथवा बाहेरील मोठ्यांचे आशिर्वाद वाढदिवसाच्या दिवशी मिळणं ही परंपरा आहे. वरिष्ठांचा आशिर्वाद आणि शुभेच्छा या आपल्या आयुष्यात भरभराट आणतात असा आपल्याकडे समज आहे. त्यामुळेच अशाच वरिष्ठ व्यक्तींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद मेसेज पाठवा.
1. आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या, आपले प्रेम आणि आशीर्वाद दिलेत, त्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद…!
2. वाढदिवसाच्या दिवशी आपल्या वरिष्ठांचे आशिर्वाद मिळणं हे भाग्यच आणि हे भाग्य मला लाभलं आहे. तुम्हाला सर्वांना धन्यवाद!
3. आपण सर्वांनी मला माझ्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मला मिळाले. मी आपणा सर्वांची मनापासून आभारी आहे.. आपण आपले शुभाशीर्वाद असेच माझ्यावर ठेवाल अशी मी आशा बाळगते… धन्यवाद!
4. माझ्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, वडीलधारी आणि मित्र परिवार यांनी दिलेल्या आशीर्वाद रुपी शुभेच्छांचा मी मनस्वी स्वीकार करते.
5. कोणी विचारलं काय कमावलं तर मी अभिमानाने सांगू शकेल की तुमच्यासारखी जिवाभावाची माणसं कमावली. पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप आभार…!
6. माझ्या वाढदिवशी मला मिळालेली सर्वात सुंदर भेट म्हणजे तुमच्या शुभेच्छा. असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहू देत, धन्यवाद!
7. माझ्या वाढदिवशी मला मिळालेल्या शुभेच्छा आणि आशीर्वादांबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार
8. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आपण दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी लाखमोलाच्याच होत्या. असेच प्रेम माझ्यावर राहील हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आपले खूप खूप आभार
9. आपण दिलेल्या शुभेच्छा कायमच आमच्या आठवणीत राहतील. माझ्या वाढदिवसानिमित्त आपण जो माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देत आहे. असेच प्रेम माझ्यावर राहू द्या हीच ईश्वरचरणी प्रार्थना
19. आपण सर्वांनी आज मला खूप शुभेच्या व आशीर्वाद दिले त्यासाठी मी आपली ऋणी राहीन. असेच प्रेम व आशीर्वाद आमच्यावर राहू दे
11. आपला आशीर्वाद नेहमीच माझ्यासह राहील हे मला माहीत आहे. आपण लक्षात ठेऊन मला वाढदिवस शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल आभार
12. आपण दिलेल्या शुभेच्यांबद्दल खूप खूप आभार. असेच प्रेम यापुढे राहील ही अपेक्षा.
13. आपले आशीर्वाद हे माझ्यासाठी अत्यंत मोलाचे आहेत. आईवडिलांप्रमाणेच तुम्ही नेहमी माया दिलीत. वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद!
14. मोठ्यांचे आशीर्वाद वाढदिवसाच्या दिवशी मिळणं हे भाग्य असतं आणि मी खरंच भाग्यवान आहे. तुमच्या शुभेच्छांसाठी खूप खूप आभार!
15. तुमच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द हा मनापासून मिळालेला आशीर्वादच आहे. तुम्ही माझ्या आयुष्याचा भाग आहात हे माझे भाग्य. शुभेच्छांसाठी खूप खूप आभार!
वाचा – Birthday Invitation Message In Marathi
सहकाऱ्यांसाठी वाढदिवस शुभेच्छा धन्यवाद संदेश (Thanks SMS For Birthday Wishes In Marathi To Colleagues)
Thanks SMS For Birthday Wishes In Marathi To Colleagues
आपण विविध कार्यालयात (Office) काम करतो. घरापेक्षा अधिक वेळ आपण कार्यालयातील सहकाऱ्यांसह (colleagues) घालवत असतो. आपला वाढदिवस अधिक सुंदर बनविण्यासाठी या सहकाऱ्यांचीही साथ लाभते. अशाच सहकाऱ्यांना धन्यवाद संदेश मराठीतून (Thanks SMS For Birthday Wishes In Marathi)
1. तुम्ही केवळ माझे सहकारीच नाही तर माझ्या आयुष्याचा एक भाग आहात. माझा हा वाढदिवस इतका खास केल्याबद्दल मी तुमचा खूपच आभारी आहे
2. घरापेक्षा अधिक वेळ मी तुमच्या सान्निध्यात असतो. माझा हा आजचा खास दिवस तुम्ही आपलासा केलात आणि माझा आनंद द्विगुणित केलात त्यामुळे तुमचे मनापासून धन्यवाद!
3. एखाद्याच्या आयुष्यात चांगली माणसं असणं यापेक्षा अधिक मोठा खजिना तो काय असणार. सहकाऱ्याच्या रूपाने हा खजिना मला मिळाला आहे. माझा वाढदिवस खास केल्याबद्दल आभार
4. आपण सर्वांनी आज मला खूप शुभेच्या व आशीर्वाद दिले त्यासाठी मी आपली ऋणी राहीन. असेच प्रेम कायम राहू दे हीच सदिच्छा!
5. आपण वेळात वेळ काढून मला शुभेच्या दिल्याबद्दल मनापासून आभार. असेच चांगल्या-वाईट प्रसंगात माझ्या पाठीशी उभे रहा. धन्यवाद
6. माझ्यासाठी तुम्ही माझ्या आयुष्यात असणं हाच मोठा आनंद आहे. आजचा माझा वाढदिवस इतका खास बनविल्याबद्दल मनःपूर्वक आभार
7. सहकारी म्हणून सुरूवात होऊन कधी कुटुंब झालात कळलंत नाहीच. अत्यंत खास दिवशी तुमच्यासारख्या खास माणसांना धन्यवाद हे द्यायलाच हवेत.
8. तुमच्यासारखे सहकारी लाभणं हे मी माझे भाग्य समजते. माझा वाढदिवस अधिक खास बनविल्याबद्दल धन्यवाद!
9. आपण दिलेल्या शुभेच्छा कायमच आमच्या आठवणीत राहतील. माझ्या वाढदिवसानिमित्त आपण जो माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देत आहे. तुम्ही खूपच खास आहात.
10. मी आपणा सर्वांची मनापासून आभारी आहे. आपण आपले शुभाशीर्वाद असेच माझ्यावर ठेवाल अशी मी आशा बाळगते.
मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
जिवलग मित्रांना वाढदिवसाच्या आभार संदेश मराठी (Thank You For Birthday Wishes In Marathi To BFF)
Thank You For Birthday Wishes In Marathi To BFF
खरंतर जिवलग मित्र मैत्रिणींना आपण खूपच गृहीत धरतो. ते आपल्या आनंदासाठी बरंच काही करत असतात. अशा जिवलग मित्र मैत्रिणींना बऱ्याचदा धन्यवाद द्यायचे राहूनच जातात. खास जिवलग मित्रमैत्रिणींसाठी वाढदिवस शुभेच्छा धन्यवाद मेसेज (Thanks Message For Birthday Wishes In Marathi). मित्रमैत्रिणींचा वाढदिवस असेल तर मेसेज आपण पाठवतोच.
1. तुझ्याशिवाय माझा वाढदिवसच काय पण माझं आयुष्यही अपूर्ण आहे. मी असेपर्यंत प्रत्येक वाढदिवस हा तुझ्याबरोबरच साजरा करायचा आहे. तुझ्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद!
2. जितका आईबाबांसाठी मनात आदर आहे ना तितकाच आदर तुझ्यासाठीही आहे. माझा वाढदिवस इतका खास बनविल्याबद्दल खूप खूप आभार!
3. खरं तर आभार मानून तुला परकं करायचं नाही. पण आभार मानले नाही तर मला चैन पडणार नाही. तू माझ्यासाठी काय आहेस हे शब्दात व्यक्त करता येणं कठीण आहे. माझा प्रत्येक वाढदिवस तुझ्यासोबतच असावा हीच सदिच्छा!
4. वाढदिवस हा खास असतोच. पण तो अधिक खास होतो जेव्हा तुमच्या आयुष्यात खास व्यक्ती असतात आणि ती खास व्यक्ती तू आहेस. माझा वाढदिवस तुझ्यामुळेच खास झाला आहे. खूप खूप धन्यवाद
5. माझ्या आयुष्यात येऊन माझा प्रत्येक वाढदिवस स्पेशल बनविल्याबद्दल थँक्स
6. तुझ्याशिवाय माझा वाढदिवस पूर्ण होऊच शकला नसता. प्रत्येक परिस्थितीत कायम सोबत राहिल्याबद्दल खूप खूप आभार!
7. या वाढदिवसाला तू सोबत असण्याइतकं मोठं गिफ्ट काहीच असू शकत नव्हतं. वेळात वेळ काढून माझ्याबरोबर राहिल्याबद्दल खूप खूप आभार!
8. कधी हसणार आहे..कधी रडणार आहे…मी कायम तुला जपणार आहे. वाढदिवस खास केल्याबद्दल खूप धन्यवाद!
9. तुझ्यासारखी मैत्रीण माझ्या आयुष्यात आहे यापेक्षा मला अधिक काहीच नको. खूप खूप धन्यवाद. वाढदिवस अतिशय स्मरणीय केल्याबद्दल आभारी आहे!
10. माझा प्रत्येक दिवस वाढदिवसासारखाच साजरा करणाऱ्या माझ्या मैत्रिणी तुझे आभार मानायचे राहूनच जातात. आजच्या खास दिवशी तुला खूप खूप धन्यवाद!
वाढदिवस शुभेच्छा दिल्याबद्दल आभार प्रदर्शन (Birthday Abhar Pradarshan In Marathi)
Birthday Abhar Pradarshan In Marathi
खरं तर आजकाल सोशल मीडियामुळे वाढदिवसाचे अनेक मेसेज येत असतात. त्यामुळे त्या मेसेजना धन्यवाद मेसेजने रिप्लाय देणे गरजेचे झाले आहे. असेच आभार प्रदर्शन करणारे काही संदेश मराठीतून (Birthday Abhar Pradarshan In Marathi)
1. मला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिलेल्या शुभेच्छांबद्दल आपण सर्वांचे मनःपूर्वक आभार!
2. माझ्या वाढदिवशी आपण दिलेल्या शुभेच्छा या लाखमोलाच्या होत्या. आपणा प्रत्येकाला व्यक्तिगतरित्या धन्यवाद देणे शक्य नाही झाले त्याबद्दल क्षमस्व. पण आपल्या शुभेच्छासाठी खूप खूप आभारी आहे.
3. आपल्या सर्वांचा स्नेह आणि प्रेम आहेच आणि ते असेच वृद्धिंगत होत राहो याच सदिच्छा. मी आपल्या सर्वांच्या शुभेच्छांनी भारावून गेले आहे. मनापासून आभार!
4. वाढदिवस हा तुमच्यामुळेच खास झाला आहे. आपल्या सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत मी आपले आभार मानत आहे.
5. माझ्यासाठी असणारा हा सामान्य दिवस तुमच्यामुळेच खास होतो. तुमच्या शुभेच्छांच्या वर्षावाने न्हाऊन निघाले आहे. खूप खूप आभार!
6. वाढदिवसाचा हा दिवस तुमच्यामुळेच अधिक विशेष झाला आहे. तुमच्या सर्वांचे मनापासून आभार!
7. आपण दिलेल्या शुभेच्छांचा अगदी मनापासून स्वीकार. कोणालाही व्यक्तीगतरित्या आभार मानायचे राहून गेले असेल तर क्षमस्व. पण आपल्या सर्वांच्या शुभेच्छांसाठी मी आभारी आहे.
8. माझा वाढदिवस अधिक खास केल्याबद्दल मनापासून शुभेच्छा आणि धन्यवाद!
9. मनःपूर्वक आभार! तुम्ही आज मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी दिलेल्य शुभेच्छा आणि प्रेम हे माझ्या पुढच्या वाटचालीसाठी बहुमोलाचे आहे.
10. आपण दिलेल्या शुभेच्छा आणि आशिर्वादांसाठी मनःपूर्वक धन्यवाद!
तुमच्या जवळच्यांना वाढदिवसाच्या आभार संदेश मराठी नक्की पाठवा आणि आभार व्यक्त करा.