ADVERTISEMENT
home / Uncategorized
Birthday wishes for daughter in marathi

150+ Birthday Wishes For Daughter In Marathi | मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

घरात मुलीचा जन्म होणं ही भाग्याची गोष्ट समजली जाते. कारण मुलीच्या माध्यमातून प्रत्यक्ष लक्ष्मीमाताच आपल्या घरी येते असं भारतीय संस्कृतीत मानलं जातं. त्यामुळे मुलीवर आईवडीलांचं जास्त प्रेम असतं. मुली घरात सर्वांच्याच लाडक्या असतात. अशा लुमच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस म्हणजे वर्षातील एक खास समारंभ असतो. आपल्या मुलीला दीर्घायुष्य लाभावं आणि तिला तिच्या वाढदिवशी आनंद मिळावा यासाठी आईवडील आणि घरातील सर्व मंडळी खास कार्यक्रम आखतात. अशा खास दिवशी तुम्हाला तिला गिफ्ट आणि भेटवस्तूंसोबत काही खास शुभेच्छा संदेश द्यायचे असतात. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे काही खास संदेश

Birthday Wishes For Daughter In Marathi | मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

Birthday Wishes For Daughter In Marathi
Birthday Wishes For Daughter In Marathi

लेकीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश तुमच्या नक्कीच उपयोगी पडतील.

१. या आनंदाच्या दिवसी तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे, तुझ्या यशाला सीमा न राहू दे, तुझ्या आयुष्यात सुखाचा  वर्षाव होऊ दे, माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

२. माझं विश्व तू, माझं सुख तू, माझ्या जीवनात आलेला आनंदाचा क्षण तू, तुझ माझ्या जगण्याची आशा तूच माझा श्वास तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा आजचा दिवस आहे खास

ADVERTISEMENT

३. तू माझ्या जीवनात आलेली सुंदर परी आहेस, तुझ्या मुळे मिळाला आम्हाला जगण्याचा आनंद, तूच आमचा प्राण आहेस… बाळा तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

४. मला आजही आठवतं ज्या दिवशी तुझा जन्म झाला… तुला माझ्या हातात घेताना माझ्या ह्रदयाचा ठोका चुकला होता. त्यानंतरचा प्रत्येक क्षण माझं ह्रदय फक्त तुझ्यासाठी धडकत आहे. तुच माझ्या जगण्याचा श्वास, ध्यास आणि विश्वास आहेस. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा बाळा

५. या शुभदिनी तुला दीर्घायुष्य लाभो… यश, समृद्धी, कीर्ती, सुख आणि समाधान तुझ्यासोबत कायम नांदो.. माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

६. तुझ्या जन्माने दुःख विसरले, तुझ्या जन्माने सुख अनुभवले… तुझं असणं श्वास आहे माझा… तुझा वाढदिवसाच्या  खूप खूप शुभेच्छा

ADVERTISEMENT

७.  सोनेरी किरणांनी अंगण सजावे, फुलांच्या सुंगधाने वातावरण फुलावे आजच्या या  शुभदिनी तुला जे जे हवे ते सारे काही मिळावे… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

८. येणारी अनंत वर्षे तुझ्यावर सुख, समृद्धीची बरसात होवो… तुझ्या सर्व इच्छा लवकर पूर्ण होवो… हिच परमेश्वराकडे  प्रार्थना… माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

9. माझ्या आयुष्याच्या बागेत फुललेलं तु एक सुंदर फुल आहेस…तुझ्या सुंगधाने माझं आयुष्य फुललं तुझं आयुष्य त्याहून सुंदर असावं हिच ईच्छा… माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

१०. उंच उंच आकाशात तू झेप घ्यावी…. तुझ्या यशाला कशाचीच सीमा नसावी… तुझी सारी स्वप्न पूर्ण व्हावी…. हवी असलेली प्रत्येक गोष्ट तुला मिळावी. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

ADVERTISEMENT

वाचा – ५०० पेक्षा जास्त सुंदर Birthday Wishes In Marathi

Birthday Wishes For Daughter-In-Law In Marathi | मुलीप्रमाणे असलेल्या सुनेला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

Birthday Wishes For Daughter-In-Law In Marathi | मुलीप्रमाणे असलेल्या सुनेला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

Birthday Wishes For Daughter-In-Law In Marathi

सून हीदेखील कोणाचीतरी लेक असते. मुलीपेक्षा सून तुमच्या आयुष्यभर सोबत असते. यासाठी तुमच्या सुनेला वाढदिवसासाठी द्या अशा शुभेच्छा

१. सून माझी भासे मला, माझ्या मुलीसारखी, कधी केला नाही दुरावा, घेते माझी काळजी वेळोवेळी, करते सर्वांचा आदर, गुणम आहेत महान, कधी रागावलं कुणी, तरी त्यांचा राखते मान, भाग्य लागले तुझ्यासारखी सून मिळायला…सूनबाई तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा

ADVERTISEMENT

२. हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
नातीगोती आणि प्रेमाने संसारात फुललेले,
आनंदाने नांदो तुमचा संसार याच माझ्या तुला वाढदिवशी शुभेच्छा

३. तुमच्या प्रेमाला आणखी पालवी फुटू दे, तुमच्या दोघांचा संसार भरभरून फुलू दे सूनबाई वाढदिवसाच्या शुभेच्छा

४. स्वतःचं घर सोडून सासरी आलीस आणि आम्हाला ओढ लावलीस, मुलीची कमतरता भासू दिली नाहीस.. सून नाही तू माझी लेकच आहेस. वाढदिवसाच्या शुभेच्छा

५. सासू, सुनेचं नातं म्हणजे जणू एकमेकांच्या पाठराखिणी, कितीही तू तू मै मै झालं तरी राहतात सोबतीने… अशा माझ्या लाडक्या सूनबाईला वाढदिवसाच्या शुभेच्छा

ADVERTISEMENT

६. सारे आप्त सोडून तु आमच्या घरी आलीस आणि येत क्षणीच घरची माणसं आपलीशी केलीस… असंच  आपलं प्रेम वाढत राहो….दीर्घायुषी हो, वाढदिवसाच्या शुभेच्छा 

७. अशी सून प्रत्येकाला मिळावी… जिला भेटताच घट्ट मैत्री व्हावी… अशा माझ्या लेक, सून आणि मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

८. चांगला स्वभाव हा शुन्यासारखा असतो ज्याच्यासोबत राहतो त्याची किंमत वाढवतो अशी माझी किंमत द्विगुणित करणाऱ्या माझ्या लाडक्या सूनेला वाढदिवसाच्या शुभेच्छा

९. ओढ म्हणजे काय ते प्रेम केल्याशिवाय कळत नाही तसंच सून की लेक ते जीव लावल्याशिवाय कळत नाही… अशीच ओढ लावणाऱ्या माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

ADVERTISEMENT

१०. माझ्या पोटी जन्माला आली नाहीस पण लेक मात्र झालीस… माझ्या जीवनात माझा श्वास, ध्यास आणि विश्वास बनलीस… अशा माझ्या लाडक्या सूनबाईस वाढदिवसाच्या शुभेच्छा

वाचा – मुलीच्या वाढदिसाचे आमंत्रण मेसेज

Birthday Messages For Daughter In Marathi | मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा  - Birthday Messages For Daughter In marathi

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा – Birthday Messages For Daughter In Marathi

ADVERTISEMENT

मुलीच्या वाढदिवशी तिच्या भेटवस्तूंवर लिहिण्यासाठी हे शुभेच्छा संदेश नक्की वापरा. तसंच तुमच्या मुलीची आई म्हणजेच बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा नक्की वाचा.

१. तुझा वाढदिवस म्हणजे झुळझुळ झरा, तुझा वाढदिवस म्हणजे सळसळणारा वारा, तुझा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी उन्हामधल्या श्रावणधारा… तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा

२. सोनेरी सुर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोन्याचा दिवस, अशा या सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्या सारख्या माझ्या लेकीला…. वाढदिवसाच्या शुभेच्छा

3. शिखर उत्कर्षाचे तु सर करत जावे, मागे वळून पाहलाना आम्हा दोघांना स्मरावे… तुझ्या इच्छा आकाक्षांचा वेल गगनाला भिडू दे… तुला आयुष्यात सर्व काही मिळू दे…माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

ADVERTISEMENT

४. वाढदिवसाची भेट मी तुला काय द्यावी… परमेश्वराने मला दिलेली तू एक अनमोल भेट आहेस. तुझ्यासोबत माझं सारं आयुष्य मला जगता येईल यातंच मला समाधान आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा

५. आयुष्याच्या या नव्या टप्यावर माझे आर्शीवाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत, माझ्या डोळ्यांना आता फक्त तुझ्या भेटीचा ध्यास आहे. तुझ्या वाढदिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा

६. वाढदिवसाचं गिफ्ट द्यायला आईबाबांना झालाय लेट, पण रूसुन बसू नकोस कारण सातासमुद्रा पार असलीस तरी त्या तुझ्या पर्यंत पोहचतील त्या थेट… माझ्या मुलीला वाढदिवसाच्या  शुभेच्छा

७. मंगल क्षणांनी जीवनात प्रवेश करून आला हा वाढदिवसाचा क्षण मला जितका हवा हवासा वाटतो तितका कोणताच दिवस वाटत नाही. अशा या माझ्या आवडत्या दिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा

ADVERTISEMENT

८. माझ्या प्रत्येक शब्दाचे एक गीत व्हावे आणि  ते तुझ्यासोबत नेहमीच रहावे… तुझ्या पुढे या आकाशाने ठेंगणे व्हावे, तुझ्या प्रत्येक उंच शिखराने नम्रपणे खाली वाकावे… तुझ्या यशाचे गोडवे सातासमुद्रापार गायले जावे… वाढदिवसाच्या शुभेच्छा

९. तुझ्या प्रत्येक वाढदिवसागणिक तुझ्या यशाचं आभाळ विस्तारत जावं, तुझ्या प्रेमाने तु साऱ्या जगाला जगाला साद घालावं हिच इच्छा आहे… वाढदिवसाच्या शुभेच्छा बाळा

१०. प्रत्येक क्षणी मला तुझी पडावी भुल… कारण माझ्या आयुष्यात बहरलेलं तु आहेस एक सुंदर फुल… वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा

भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बेस्ट आहेत हे शुभेच्छा संदेश

ADVERTISEMENT

Birthday Wishes For Daughter From Dad In Marathi | वडिलांकडून मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Daughter From Dad In Marathi | वडिलांकडून मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes For Daughter From Dad In Marathi

मुलीचं आणि वडिलांचं एक खास नातं असतं म्हणूनच वडिलांचं मुलीवर सर्वात जास्त प्रेम असतं. अशा तुमच्या लाडक्या मुलीला वाढदिवसानिमित्त द्या या शुभेच्छा

१. नवे क्षितीज नवी पहाट, मिळावी तुला आयुष्यात स्वप्नांची वाट, तुझ्या आनंदात माझं समाधान कारण तूच आहेस माझ्या जगण्याचं साधन… वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा

२. नवा गंध, नवा आनंद…. निर्माण करत प्रत्येक क्षण यावा, नव्या सुखाने, नव्या यशाने आयुष्याचा प्रत्येक क्षण द्विगुणित व्हावा. दीर्घायुषी हो बाळा… वाढदिवसाच्या शुभेच्छा

३. तुला प्रत्येक पावलावर फक्त यशच मिळो, तुझ्या जीवनात नेहमीच सुख नांदो, तुला कशाचीच कमतरता न राहो आणि तुझ्याकडे पाहत माझं आयुष्य जावं… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा

ADVERTISEMENT

४. माझ्या लाडक्या परीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

५. तुझ्या वाढदिवसानिमित्त आकाशातील चंद्र तारेही हसले, म्हणूनच तुला देवाने फक्त आमच्यासाठीच निवडले… वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा

६. तु आमच्या जीवनातील एक छोटी परी आहे, तूच आमची छोटूशी बाहुली आहेस, आमचं सारं विश्व तूच आहेस. माझ्या छकुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

७. तुझं बापावर रूसणं, फुगणं खूप आनंद देणारं आहे खरंतर त्यातुनच माझं जीवन फुलत आणि बहरत आहे. लाडक्या लेकीला तिच्या बापाकडून खूप खूप शुभेच्छा

ADVERTISEMENT

८. सुख, समृद्धी, समाधान, दीर्घायुष्य तुला लाभो… वाढदिवसाच्या शुभेच्छा

९. झेप अशी घे की सर्वांना अभिमान वाटावा, ज्ञान असं मिळव ती सागरही अचंबित व्हावा, इतकी प्रगती कर की काळ ही पाहत राहावा आणि तुझ्या कतृत्वाने चोहीकडे लख्ख प्रकाश पडावा… वाढदिवसाच्या शुभेच्छा

१०. चाहूल तुझी लागताच आनंदी झालो आम्ही, तुझ्या बाललींलामध्ये रमून गेलो आम्ही…यशवंत हो, किर्तीवंत हो हाच आर्शीवाद… बेटा वाढदिवसााचे खूप खूप शुभ आर्शीवाद 

वाचा – Happy Birthday Wishes For Mama In Marathi

ADVERTISEMENT

Birthday Wishes To Daughter From Mom In Marathi | आईकडून मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes To Daughter From Mom In Marathi | आईकडून मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes To Daughter From Mom In Marathi

मुली म्हणजे आईच्या ह्रदयाची स्पंदनंच  असतात. आपल्या आईच्या वाढदिवसाला शुभेच्छांसोबत लेकींना काय करू आणि काय नको असं होतं. मग अशा तुमच्या लाडक्या लेकीला वाढदिवसानिमित्त या शुभेच्छा द्या.

१. पऱ्यांसारखी सुंदर आहेस तू, तुझी आई होऊन झाले धन्य…इतकी समजूतदार आहेस की जन्मोजन्मी मीच व्हावी तुझी मुलगी… वाढदिवसाच्या शुभेच्छा

२. आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे, जिने माझ्या जगण्याला अर्थ दिला… माझ्या लाडक्या परीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

३. मी तुला जन्म दिला की तू मला आई केलंस आजही मला समजत नाही, तुझ्यासोबत मोठं होताना माझं प्रौढपणही मला जाणवत नाही. वाढदिवसाच्या शुभेच्छा बाळा

ADVERTISEMENT

४. प्रत्येकाच्या आयुष्यात एक छोटी परी यावी… जिने त्यांच्या जीवनात स्वप्ननगरी तयार करावी. माझ्या परीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

५. आयुष्यात एक तरी परी असावी, जशी कळी उमलताना पाहता यावी, मनातील गुपिते तिने हळुवार माझ्या कानात सांगावी वाढदिवसाच्या शुभेच्छा

६. पाहुन माझी गोंडस लेक माया मनात दाटते, तिला पाहत जगण्याची नवी उमेद मिळते, माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

७. लेक हे असं एक खास फुल आहे जे प्रत्येक बागेत फुलत नाही, माझ्या बागेत फुललं यासाठी देवा मी तुझी आभारी आहे. माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

ADVERTISEMENT

८. लेक माझी भाग्याची राजकन्या आहे माझ्याय घराची… वाढदिवसाच्या शुभेच्छा 

९. माझी लेक म्हणजे आनंदाचा झरा, माझी लेक म्हणजे वात्सल्याचा दुवा… वाढदिवसाच्या शुभेच्छा

१०. तुझ्या केवळ अस्तित्वाने रोम रोम माझे फुलले, तुझ्या येण्याने माझे जीवनच फुलले… वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुलीच्या वाढदिवसाप्रमाणेच कन्यादिनासाठी शुभेच्छा संदेश.

ADVERTISEMENT

Birthday Poem For Daughter In Marathi | मुलीच्या वाढदिवसासाठी कविता

Birthday Poem For Daughter In Marathi | मुलीच्या वाढदिवसासाठी कविता
मुलीच्या वाढदिवसासाठी कविता – Birthday Poem For Daughter In Marathi

तुम्ही कवी मनाच्या असाल तर मुलीच्या वाढदिवसानिमित्त या कविता तुम्हाला नक्कीच आवडतील.

१. पोटी एक तरी मुलगी असावी
जिच्या  जन्मानंतर बर्फी वाटावी,
पोटी एक तरी मुलगी असावी
छानसा फ्रॉक घालून
जणू ती परीच भासावी
पोटी एक तरी मुलगी असावी
कधीतरी कच्ची पक्की पोळी 
करून तिने घासभर बाबाला भरवावी
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 
– अज्ञात

२. छे ती कुठे
माझी मुलगी
ती तर आहे
श्वास माझा
उद्या मनांवर
राज्य करेल
स्वप्नं नाही
विश्वास माझा…
वडील होण्या इतपत जगात
कोणताच प्रचंड आनंद नाही
नि कन्या झाली तर कोणतचं सुख
त्याहून बेधुंद नाही.
माझ्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 
– अज्ञात 

३. मुठ आवळून जेव्हा तू बोट धरतेस
तो प्रत्येक क्षण माझा खास होतो
तुझ्या इवल्या इवल्याश्या मुठीत
मला जग जिंकल्याचा भास होतो.
– अज्ञात

ADVERTISEMENT

४. माझ्या गाण्यापेक्षा बेडकाचं
किंचाळणं जरी मधूर आहे
माझ्या अंगाईने झोपतं पिल्लू माझं
हे समाधान भरपूर आहे.
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 
-अज्ञात

५. असावं लागतं गाठी पाठी पुण्य
आणि त्याही पेक्षा खूप भाग्यवान
कारण तेव्हाच होतं एका पित्याचे हातून
सर्वात श्रेष्ठ कार्य कन्यादान.
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 
-अज्ञात

६. मुला-मुलीत भेदभावाचा
तो प्रश्नच मी उगारत नाही
वडीलांचं मुलीवर प्रेम जास्त
हे सत्यही मी झुगारत नाही.
वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा
-अज्ञात

७. बाबा म्हणत माझ्या मुलीचे
जसे नाजूक ओठ हलू लागतात
समाधानाची इवली इवली फुलं
ह्या निवडुंगाच्या देहावर फुलू लागतात.
बाळा वाढदिवसाच्या शुभेच्छा 
– अज्ञात

ADVERTISEMENT

८. तू सुखी राहावीस
देवाकडे एवढचं मागणं आहे
म्हणूनच तुझ्या भविष्यासाठी
दिवसरात्र झिजणं, जगणं आहे.
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 
–  अज्ञात

९. आनंदाचे अगणित क्षण तिच्या
नाजूक हास्यात दडले आहेत
तिला कायम हसतं ठेवण्यासाठी
मलाही प्रयत्नांचे वेड जडले आहे.
माझ्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 
-अज्ञात

१०. भाग्य ज्याला म्हणतात ते
माझ्या मुलीतच सापडलं आहे
माझ्या ग्रहांचे मन कदाचित
तिच्याच पायांशी अडलं आहे.
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 
– अज्ञात

११. मुलगी सासरी जाण्याचा क्षण
वडीलांसाठी मोठी अग्नीपरीक्षा असते
स्वतःच्या काळजा पासून दुरावणं
जगातली सर्वात मोठी शिक्षा असते.
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 
– अज्ञात

ADVERTISEMENT

१२.आभाळा एवढं सुख काय ते
मुलगी झाल्यावर कळतं
एक वेगळच आपलेपण
तिचं प्रत्येक हास्य उधळतं.
माझ्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 
– अज्ञात

१३. इतरांचे नशीब घेऊन येतात
त्या बाबतीत मुली माहीर आहेत
मुलगी म्हणजे धनाची पेटी
हे सत्यही तसं जग जाहीर आहे
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 
– अज्ञात

१४. मुलींचे एक छान असतं
मुलगी असण्याचा अभिमान असतो
त्यांचा अभिमान वडीलांसाठी
मान, शान व सन्मान असतो.
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 
– अज्ञात

१५. संसारात रमण्या पेक्षा मी
मुलीच्या भातुकलीच्या खेळात रमतो
भावनांच्या खेळात आई नंतर
मुलीचाच तर क्रम येतो
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 
-अज्ञात

ADVERTISEMENT

१६. जशी सायलीची कळी, सोनचाफ्याची पाकळी
तशी नाजूक, देखणी माझी लेक सोनसळी

यावी पुनवेच्या राती जशी शकुनचाहूल,
तसं अंगणात माझ्या तिचं इवलं पाऊल

हसू तिचं जशी बरसावी वळवाची सर,
चांदण्याची गोड खळी गोबऱ्याशा गालांवर

ओठी घेऊन आली ती गोड चैतन्याची गाणी
जसं पहाटेचं स्वप्न, जशी परीची कहाणी

ADVERTISEMENT

लाडाकोडात वाढली माझी लेक कौतुकाची,
आली जाण छकुलीला मायबापाच्या सुखाची

बरोबरीनं राबते लेक घरादारासाठी
अडचणीला उभी ही, जशी जगदंबा पाठी!

कधी दुखलं काळीज, तिच्या हास्याचा उपाय
लेक होते कधी कधी माय-पित्याचीच माय!

किती गुणाची ही पोर, आहे नक्षत्र की परी?
उद्या उडून जायची कुणा परक्याच्या घरी

ADVERTISEMENT

जरी घोर आज लागे मायबापाच्या मनाला,
कन्या परक्याचं धन, द्यावं लागे ज्याचं त्याला!

देवा, माझ्या चिमणीला लाभो सुखाचं सासर,
मिळो अतोनात प्रेम, देई एवढाच वर

औक्ष लाभू दे उदंड, व्हावी नभाहून मोठी
जन्मोजन्मी लेक होऊन ती यावी माझ्या पोटी

माझ्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
– अज्ञात 

ADVERTISEMENT

अधिक वाचा:

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

Birthday Wishes For Husband In Marathi

आईसाठी सुंदर वाढदिवसाच्या शुभेच्छा

ADVERTISEMENT
29 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT