ADVERTISEMENT
home / आरोग्य
the-best-and-quick-home-remedies-for-acidity-in-marathi

या ट्रिक्स वापरा आणि मिळवा अॅसिडिटीपासून सुटका पटकन

एसिडिटीची समस्या (Acidity Problem) अशी समस्या आहे जी प्रत्येकाला कधी ना कधीतरी नक्कीच होते. जंक फूड, तिखट पदार्थ खाणे, रिकाम्या पोटी चहा पिणे आणि सतत तळलेले पदार्थ खाल्ल्याने ही समस्या अधिक वाढीला लागते. जेव्हा तुमच्या खाण्याची एक वेळ निर्धारित नसते, तेव्हा सर्वाधिक तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास होतो हे नेहमी लक्षात ठेवा. या समस्येमध्ये गळ्याच्या खालच्या भागात वैद्यकिय भाषेत एसोफेगस असं म्हटलं जातं. त्यामुळे एसिडिटी अधिक वाढते. यामध्ये जळजळ आणि छातीत दुखणे हे अधिक प्रमाणात दिसून येते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, अॅसिडिटी सुरू झाल्यावर पोटात एसिड पटकन निर्माण होते आणि पोटातील नाजूक अंगांना यामुळे त्रास होतो आणि नुकसान पोहचते. तुम्हीदेखील अॅसिडिटीपासून वाचण्यासाठी नियमित जेवावे, तुमचे खाणेपिणे हे व्यवस्थित करावे आणि वर्कआऊटवर नीट लक्ष द्यावे. अॅसिडिटीपासून वाचण्यासाठी नक्की काय करणे आवश्यक आहे हे आम्ही तुम्हाला या लेखातून सांगत आहोत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही चहा आणि कॉफीसारख्या कॅफेनयुक्त पदार्थांपासून दूर राहावे. याशिवायदेखील अनेक पदार्थांमध्ये कॅफेन असते. त्यामुळे योग्य पदार्थांची निवड करावी. कॅफेन हे आपल्या एसोफेगसवर परिणाम करते. त्यामुळे तुम्हाला काही प्यावंसं वाटत असल्यास, हर्बल टी अथवा ग्रीन टी चे सेवन करावे. काही ट्रिक्स वापरून तुम्ही अॅसिडीटीपासून पटकन सुटका करून घेऊ शकता. 

रिकाम्या पोटी खा 1 सफरचंद (Daily 1 Apple A Day)

ज्यांना एसिडिटीचा त्रास आहे त्यांच्यासाठी रिकाम्यापोटी एक सफरचंद खाणे हे कोणत्याही अमृतापेक्षा कमी नाही. तुम्ही एक दिवस हे नक्की वापरून पाहा. तुम्हालाच याचा परिणाम लगेच दिसून येईल. सफरचंदामध्ये अधिक प्रमाणात मिनरल्स, पोषक तत्व, पॉलिफेनाल आणि फ्लेवोनॉईड्सची तत्वे असतात, जी पोटात एसिड तयार होण्यापासून रोखतात. तुम्हाला जर सफरचंद आवडत नसेल तर तुम्ही याचे लहान लहान तुकडे करून दह्यात मिक्स करून खाऊ शकता. थोड्या थोड्या वेळाने तुम्ही हे खात राहा. तुम्ही जास्त वेळ उपाशी राहू नका अथवा थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने तुम्ही हे खात राहा जेणेकरून पोटात एसिडिटी निर्माण होणार नाही. तुम्ही बाहेर असाल तर तुम्ही आपल्या बॅगमध्ये फळं, ड्रायफ्रूट्स अथवा भाजलेले चणे आणि मखाणा यासारखे पदार्थ ठेवावे. जेणेकरून भूक लागल्यावर पटकन खाता येईल. पोट भरलेले असेल तर एसिडीटीचा त्रास होत नाही हे कायम लक्षात ठेवा. 

पुदीना अथवा बडिशेप घालून प्या पाणी (Use Mint or Fennel Water)

असिडिटी न होण्यासाठी आपल्याला नेहमी दक्ष राहायला हवे. त्यामुळे लक्षात ठेवा की, तुम्ही नेहमी उकळलेले पाणी अथवा फिल्टर्ड पाणीच प्यावे. तसंच तुम्ही पाणी उकळताना पुदिन्याची पाने त्यात टाकावी आणि हे पाणी थंड करून प्यावे. त्याशिवाय पाण्यात बडिशेप घालून उकळून घ्यावे आणि दिवसभर तुम्ही हे बडिशेपेचे पाणी पिऊ शकता. यामुळे तुम्हाला असिडिटीचा त्रास होत नाही. 

मुळ्यामुळे मिळते सुटका 

मुळा एक असा पदार्थ आहे ज्यामुळे असिडिटीपासून त्वरीत सुटका मिळते. तुम्हाला एसिडिटीचा त्रास होत असेल तर तुम्ही मुळ्याचे काप काढा. त्यावर काळे मीठ आणि काळी मिरी टाका आणि ते खा. तुम्हाला लवकरच यामुळे आराम मिळेल. तुम्हाला हवं असल्यास, मुळ्यामध्ये त्रिफळा चूर्ण घालून तुम्ही खाऊ शकता. यामुळेही तुम्हाला असिडिटीपासून त्वरीत आराम मिळतो. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

18 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT