ADVERTISEMENT
home / आरोग्य
मूत्रमार्ग संसर्गामध्ये होतेय वाढ, महिलांनी वेळीच लक्ष द्या

मूत्रमार्ग संसर्गामध्ये होतेय वाढ, महिलांनी वेळीच लक्ष द्या

उन्हाळा संपून आता पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमधील उष्णता, शरीरातील पाण्याची कमतरता यामुळे मूत्रमार्गाचा जंतुसंसर्ग होण्याचे प्रमाण अधिक असते. मूत्राशय सतत भरल्यासारखे वाटणे, सतत लघवीला होणे ,मूत्रोत्सर्जन करताना वेदना होणे,  दाह होणे, लघवीचा रंग गडद असणे, लघवीमध्ये रक्ताचे प्रमाण असणे, लघवीचा उग्र वास येणे,महिलांच्या ओटीपोटात दुखणे अशा प्रकारची लक्षणे मूत्रमार्गाचा संसर्गामध्ये दिसून येतात. हे त्रास जाणवू लागल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास निदान होऊन योग्य उपचार घेतल्याने तो कमी होऊ शकतो. परंतु या त्रासांकडे दुर्लक्ष केल्यास संसर्ग वाढत जाऊन आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होतात. याबाबत महिलांना माहिती असणे आवश्यक आहे. 

यीस्ट इन्फेक्शनशिवाय ‘या’ ५ कारणांनीही येऊ शकते व्हजायनामध्ये खाज

योनीमार्गाचा संसर्ग होण्याची अनेक कारणे

योनीमार्गाचा संसर्ग होण्याची अनेक कारणे

Freepik

ADVERTISEMENT

महिलांमध्ये योनीमार्गाचा संसर्ग होण्याची अनेक कारणे आहेत. जिवाणू व बुरशी ही योनीमार्गाचा संसर्ग होण्याची दोन प्रमुख कारणे. योनीमार्गातील त्वचा कायम ओली राहिली, नियमितपणे स्वच्छ केली गेली नाही किंवा जंतुसंसर्ग असलेल्या साथीदारासोबत लैंगिक संबंध ठेवल्यास जिवाणूजन्य संसर्गाचा धोका असतो. याशिवाय योनीमार्ग अस्वच्छ राहिल्यास अनेक स्त्रियांना विशेषत: मधुमेही स्त्रियांनाही योनीमार्गात कॅण्डिडा या बुरशीमुळे दाह सहन करावा लागतो. या संसर्गात लघवी होण्यास सुरुवात झाल्यावर वेदना होतात. अशा प्रकारचा त्रास 15 ते 45 या वयोगटांतील महिलांमध्ये अधिक दिसतो.

पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पीटलमधील यूरोलॉजिस्ट डॉ. सूरज लुनावत यांनी यासंदर्भात अधिक माहिती दिली. ते म्हणाले, वारंवार लघवी होणे, जास्त काळ मूत्र धरून ठेवणे आणि अस्वच्छतेमुळे युटीआय संसर्गाचा सामना करावा लागू शकतो. योनीमार्गात जास्त घाम यणे हे देखील जंतूसंसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरू शकते. यूटीआयशी निगडित सर्वात सामान्य जीवाणू म्हणजे एशेरिचिया कोलाई हा आहे,  हा जीवाणू संक्रमणास जबाबदार आहे. कोणत्याही वयोगटातील महिलांना याचा त्रास होऊ शकतो. गेल्या काही महिन्यांमध्ये अशाप्रकारच्या तक्रारी घेऊन येणा-या रुग्णांमध्ये वाढ झाली असून गेल्या काही महिन्यांमध्ये 50 ते 60 रुग्णांमध्ये मूत्रमार्ग संसर्गासंबंधी तक्रारींवर उपचार करण्यात आले. डॉ. लुनावत यांनी पुढे स्पष्टे केले की, यूटीआय संसर्गाच्या समस्येकडे वेळीच लक्ष दिले गेले नाही तर पायलोनेफ्रायटिस (मूत्रपिंडाचा दाह) किंवा सेप्सिस सारखी गंभीर गुंतागूंत होऊ शकते. म्हणून, एकदा लक्षणे दिसल्यास उपचारास विलंब करू नका.

लघवी रोखून धरण्याची तुम्हालाही आहे का सवय ? मग एकदा वाचाच

जळजळ आणि वेदना झाल्यास, डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक

जळजळ आणि वेदना झाल्यास, डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक

ADVERTISEMENT

Freepik

पुण्यातील अपोलो डायग्नोस्टिकचे झोनल टेक्निकल हेड अँड कन्सल्टंट पॅथॉलॉजिस्ट डॉ. संजय इंगळे यांनी सांगितले की, लघवी करताना जळजळ व वेदना होत असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. मधुमेह असल्यास किंवा मूतखड्यासारखी समस्या असल्यास संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. वेळी चाचणी केल्यास पुढील धोका टाळता येऊ शकतो. अन्यथा या समस्येचा मूत्रपिंडावर देखील दुष्परिणाम होतो. कोविड – 19  सारख्या महामारीच्या काळातही तुम्ही घरबसल्या मूत्रविकारासंबंधी चाचणी करू शकता त्यामुळे टाळाटाळ न करता वेळीच लक्ष द्या. यूटीआय संसर्ग टाळण्यासाठी, भरपूर पाणी प्या आणि हायड्रेटेड रहा, जास्त काळ मूत्र रोखून धरणे टाळा, अंतर्वस्त्र वापरण्यापूर्वी स्वच्छ धुवा, सार्वजनिक शौचालय आणि जलतरण तलावाचा वापर शक्यतो टाळा, नाजूक भागावर रसायनांचा वापर करू नका आणि सूती कपड्यांचा वापर करा.  मासिक पाळी दरम्यान सॅनिटरी नॅपकीन वेळोवेळी बदलत आहात याची खबरदारी घ्या. 

जाणून घ्या हिवाळ्यात महिलांना युरिन इन्फेक्शनचा का असू शकतो जास्त धोका

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

11 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT