सुंदर आणि मनमोहक हास्यात तुमचे मोत्यासारखे दात अधिक भर घालतात. त्यामुळे प्रत्येकाला आपले दात पांढरेशुभ्र आणि निरोगी असावे असं वाटतं. जेवताना तोडणे आणि चावणे या गोष्टी मजबूत दातांशिवाय करताच येत नाहीत. पण जर तुम्ही दातांची योग्य काळजी घेतली नाही तर तुमच्या दातांचे आरोग्य बिघडते आणि दात खराब होतात. दातांची निगा राखण्यासाठी फक्त दोन वेळ ब्रश करणे, चुळ भरणे पुरेसं नाही. कारण तुमच्या दैनंदिन जीवनातील काही चुका देखील दातांचे आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरू शकतात.
या सवयींमुळे दात होतात खराब
दातांची निगा राखायची असेल तर वेळीच या सवयी बदला नाहीतर बिघडेल दातांचे आरोग्य
रगडून दात घासणे
दात घासणे दातांची निगा राखण्यासाठी गरजेचे असले तरी यासाठी रगडून दात मुळीच घासू नये.कारण त्यामुळे दातांच्या वरील सुरक्षित आवरण निघून जाते आणि दातांचा जीवजंतूंशी थेट संबध येतो. यासाठी सॉफ्ट ब्रशने दात घासावेत.
नखं चावणे
बऱ्याच लोकांना टेन्शन आल्यावर नखं चावण्याची सवय असते. संशोधनाच्या आधारे ही सवय मानसिक स्वास्थ बिघडण्याचे लक्षण असू शकते. पण जर तुम्हाला लहानपणापासून नखं खाण्याची सवय असेल तर ती सोडवणं नक्कीच कठीण होतं. नखं चावण्यामुळे नखं तर तुटतातच शिवाय यामुळे तुमचे दातही खराब होतात. तुमच्या तोंडाच्या जबड्यावर याचा वाईट परिणाम होतो. यासाठीच दातांच्या सुरक्षेसाठी नखं चावण्याची सवय आताच बदला.
तोंडाची दुर्गंधी घालवण्याचे उपाय (How To Get Rid Of Bad Breath)
दातांचा असा वापर करणे
खाऊचे पाकीट फोडण्यासाठी अथवा बाटलीचे झाकण काढण्यासाठी काही लोक चक्क दातांचा वापर करतात. ही अतिशय वाईट सवय आहे. कारण यामुळे तुमचे दात कमजोर होतात. जरी तुमचे दात नैसर्गिक रित्या मजबूत असले तरी अशा प्रकारे सतत दातांचा वापर केल्यामुळे ते कमजोर होऊन शेवटी तुटू शकतात. यासाठीच कात्री अथवा ओपनरच्या जागी तुमचे दात वापरू नका. योग्य टूल्सचा वापर करा आणि दातांचे आरोग्य राखा.
जाणून घ्या दात दुखीवर घरगुती उपाय (Home Remedies For Toothache In Marathi)
बर्फ चावून खाणे
थंडगार पेय आणि त्यामध्ये बर्फाचा खडा म्हणजे अनेकांसाठी उकाडा कमी करण्याचं एक उत्तम साधन असतं. पण अती थंड पेय पिण्याने अथवा बर्फ दाताने चावून खाण्यामुळे तुमचे दात खराब होऊ शकतात. कारण दातांच्या नसा अतिशय संवेदनशील असतात. त्यामुळे थंडगार पाणी, पेय अथवा बर्फ दातांच्या नसांना सहन होत नाही आणि त्यांचे नुकसान होते.