ADVERTISEMENT
home / सौंदर्य
these habits makes you beautiful and attractive

फक्त मेकअप आणि फॅशनच नाही ‘या’ सवयींमुळे तुम्ही दिसू शकता सुंदर

सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करता. ब्रॅंडेड कपडे, ब्युटी ट्रिटमेंट, स्टायलिश एक्सेसरिज, मेकअप करूनही बऱ्याचदा चेहऱ्यावर हवा तसा ग्लो येत नाही. कारण असं म्हणतात की सौंदर्य हे दिसण्यात नसून त्या व्यक्तीच्या मनात दडलेलं असतं. ज्यामुळे प्रत्येक व्यक्ती सुंदरच आहे. एखादी व्यक्ती वरून सुंदर दिसत असली पण तिच्या मनात नकारात्मकता असेल तर त्या सौंदर्याचा काहीच फायदा नाही. कारण अशा व्यक्तीचे डोळे नेहमीच अबोल आणि निस्तेज असतात. यासाठी सुंदरता ही मनात असायला हवी. असं खऱ्या अर्थाने सुंदर दिसण्यासाठी तुम्हाला स्वतःला काही चांगल्या सवयी मात्र नक्कीच लावायला हव्यात. कारण या सवयींमुळे तुम्ही चेहरा आणि मन दोन्ही कडून सुंदर दिसाल.

चेहऱ्यावर सतत स्मितहास्य असू द्या

जेव्हा तुम्ही हसता तुमचा चेहरा आनंदी आणि डोळे बोलके होतात. हसरी व्यक्ती प्रत्येकाला हवी हवीशी वाटते. एखाद्याचे सुंदर स्मित हास्य दुसऱ्यांच्या मनालाही प्रसन्न करते. म्हणूनच इतरांमध्ये वावरताना आपण सतत हसतमुख असायला हवं. प्रत्येकाला आयुष्यात काही ना काहीतरी समस्या असतातच. पण जर तुम्ही एखाद्याशी प्रेमाने हसून संवाद साधला तर त्या व्यक्तीला तुमच्याबद्दल आदर आणि प्रेम वाटते. हसरा चेहरा प्रत्येकाच्या लक्षात राहतो म्हणूनच तो जास्त सुंदर दिसतो. यासाठी सतत हसत राहा. दीर्घायुषी व्हायचं असेल तर आताच स्वतःला लावा ‘या’ चांगल्या सवयी

स्वावलंबी व्हा

समाजाचा मुलींकडे पाहण्याचा दृष्टीकोण नेहमीच संकुचित असतो. त्यामुळे स्वावलंबी मुलींकडे कोणाची  वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत नसते. ज्या मुली आर्थिक दृष्ट्या सक्षम असतात त्यांच्याकडे इतर लोक आदरपूर्वक पाहतात. अशा आत्मनिर्भर आणि स्वावलंबी मुलींकडे आत्मविश्वास असल्यामुळे त्या मनातूनच सुंदर असतात. त्यांना सुंदर दिसण्यासाठी इतरांच्या कौतुकाचे दाखले नको असतात. 5 सवयी ज्या तुमच्या केसांची वाढ होण्यास करतात मदत

स्वतःवर आत्मविश्वास ठेवा

स्वावलंबन आणि आत्मविश्वास एकमेकांसोबतच असतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही स्वावलंबी असता तेव्हा तुमच्या मनात स्वतःबद्दल आत्मविश्वास असतोच. आत्मविश्वासामुळे तुमचे राहणीमान, वागणे बोलणे, दिसणे आपसूकच सुंदर आणि आकर्षक होते. अशा स्वावलंबी महिलांचे सौंदर्य त्यांच्या कामातून, त्यांच्या कार्यातून, त्यांच्या बोलण्यातून सतत दिसते. सकाळी लवकर उठण्याच्या सवयीमुळे मिळेल चमकदार त्वचा, करून पाहा प्रयोग

ADVERTISEMENT

नम्र राहा

एखादी स्त्री जी स्वावलंबी आणि आत्मनिर्भर असते तिने नेहमी नम्र असणे गरजेचे आहे. कारण अंहकार ही एक अशी गोष्ट आहे जी भल्या भल्यांचा सर्वनाश करते. त्यामुळे जर एखादी कर्तुत्ववान स्त्री नम्र असेल तर तिचे समाजात नेहमीच कौतुक होते. अशा महिलांची नम्रता त्यांना यशाच्या शिखरावर पोहचवते. अशा महिलांना सुंदर दिसण्यासाठी कधीच चांगले कपडे, स्टायलिश एक्सेसरिज,महागड्या ब्युटी ट्रिटमेंटची गरज नसते. 

12 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT