ADVERTISEMENT
home / Natural Care
सकाळी लवकर उठण्याच्या सवयीमुळे मिळेल चमकदार त्वचा, करून पाहा प्रयोग

सकाळी लवकर उठण्याच्या सवयीमुळे मिळेल चमकदार त्वचा, करून पाहा प्रयोग

सकाळी तुम्ही किती वाजता उठता आणि उठल्याबरोबर नेमकं काय करता याचा तुमच्या त्वचेवर परिणाम होत असतो. जर तुम्ही उशीरा उठत असाल आणि उठल्याबरोबर सर्वात आधी मोबाईल चेक करत असाल तर याचा दुष्परिणाम तुमच्या त्वचेवर दिसू लागतो. यामुळे तुमचे डोळेच नाही तर त्वचेच्या स्नायूंवरही चुकीचा परिणाम होतो. या सवयीमुळे त्वचेवर ताण आल्यामुळे तुम्हाला लवकर सुरकुत्या आणि एजिंग मार्क्स दिसू लागतात. प्रत्येकीला तिची त्वचा नितळ आणि चमकदार दिसावी असं वाटत असतं. मात्र त्यासाठी जीवनशैलीत काही विशेष बदल करणं गरजेचं आहे. यासाठीच लवकर उठणं आणि उठल्यानंतरचे दोन तास तुम्ही काय करता यावर नीट लक्ष ठेवा आणि त्यात आवश्यक ते बदल करा.

सकाळी लवकर उठा –

सकाळी लवकर उठणं म्हणजे सुर्योदयापूर्वी उठणं. कारण याचा तुमच्या शरीराच्या निसर्गचक्रावर चांगला परिणाम होतो. लवकर उठे आणि लवकर निजे त्याला आरोग्यसंपदा लाभे असं म्हटलं जातं. यासाठी स्वतःला लवकर उठण्याची सवय लावा. कारण यामुळे तुमच्या त्वचेतही चांगले बदल दिसू लागतील. पहाटे उठल्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटतं कारण हा काळ नेहमी उत्साह देणारा असतो. काळोखावर मात करत पहाटेचं तांबडं फुटत असतं. निसर्गात होणारा हा बदल तुमच्या दिवसाची सुरूवातही सकारात्मक करतो आणि या सकारात्मक वातावरणाचा तुमच्या त्वचेवर चांगला परिणाम होतो. 

उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्या –

जर तुम्हाला नितळ म्हणजे डाग विरहित त्वचा हवी असेल तर तुमच्या स्किन केअर रूटिनमध्ये या गोष्टीचा समावेश असायलाच हवा. रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाणी पिण्यामुळे तुमच्या पोटातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होतो. पोट स्वच्छ झाल्यामुळे याचा चांगला परिणाम तुमच्या त्वचेवर दिसू लागतो. त्वचेची निगा राखण्यासाठी दिवसभरात कमीत कमी चार लीटर पाणी पिणं गरजेचं आहे. याची सुरूवात तुम्ही सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी पिण्याने करू शकता.

ADVERTISEMENT

Shutterstock

नियमित व्यायाम करा –

व्यायाम जसा शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी उत्तम आहे तसाच तो तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठीही गरजेचा आहे. म्हणूनच सकाळी उठल्यानंतर व्यायाम करण्याची सवय लावा. दिवसभरात कमीतकमी 30 मिनिटे व्यायाम केल्यामुळे तुमच्या शरीराचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते. रक्ताभिसरण सुधारते आणि शरीराला आणि त्वचेला पुरेसा ऑक्सिजन मिळतो. ज्याचा परिणाम तुमच्या त्वचेतील कोलेजीनच्या निर्मितीवर होतो आणि तुमच्या त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो.

स्किन केअर रूटिन पाळा –

त्वचेची काळजी घेण्यासाठी डेली स्किन केअर रूटिन खूपच महत्त्वाचे आहे. मात्र त्यात सर्वात महत्त्वाचे आहे मॉर्निंग स्किन केअर रूटिन. तुम्ही यासाठी सकाळी उठल्यावर त्वचा क्लिंझिंग, टोनिंग आणि मॉईस्चराईझ करायलाच हवी. कारण या तीन स्टेप्स फॉलो केल्यामुळे तुमच्या त्वचेवरील डेड स्किन निघून जाईल आणि त्वचेला तलेजदारपणा मिळेल. त्वचा मॉईस्चराईझ केल्यावर त्वचेला चांगल्या सनस्क्रिनने सुरक्षित करून मगच घराबाहेर पडावं. यासाठी सनस्क्रिन SPF 30 पेक्षा जास्त असेल याची काळजी घ्यावी.

ADVERTISEMENT

Shutterstock

पौष्टिक नास्टा करा –

सकाळचा नास्टा हा दिवसभराच्या ऊर्जेसाठी खूप महत्त्वाचा आहे. मात्र तुम्ही नास्त्यामध्ये काय खाता अथवा पिता यावर तुमच्या त्वचेचं आरोग्य अवलंबून आहे. चमकदार त्वचा हवी असेल तर नास्ट्यातून पौष्टिक पदार्थ, फळं, दूध, फळांचे रस, स्मुदी, ग्रीन टी अशा गोष्टी घ्या. कारण  यातील घटक तुमच्या त्वचेसाठी नक्कीच उपयुक्त आहेत. सकाळी उठल्याबरोबर चहा, कॉफी घेणं आणि नास्त्यामध्ये तेलकट, तिखट पदार्थ खाणं  तुमच्या  त्वचेसाठी नक्कीच चांगलं नाही. 

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

त्वचेवरील तेलकटपणा कमी करण्याच्या सोप्या पद्धती

जोजोबा आईल आहे त्वचेसाठी वरदान, दररोज करा असा वापर

येत्या लग्नसराईमध्ये नवरीने त्वचेचे सौंदर्य खुलवावे अशा पद्धतीने

25 Nov 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT