ADVERTISEMENT
home / आरोग्य
दिवसभर ‘या’ छोट्या छोट्या सवयींमुळे कमी होऊ शकते प्रतिकार शक्ती

दिवसभर ‘या’ छोट्या छोट्या सवयींमुळे कमी होऊ शकते प्रतिकार शक्ती

कोरोना महामारीपासून वाचण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे रोग प्रतिकार शक्ती मजबूत राखणे. कारण  आजारपण अथवा संक्रमणापासून वाचण्यासाठी तुमची प्रतिकार शक्ती चांगली असमं गरजेचं आहे. मात्र सध्या कोरोनामुळे भीतीचं वातावरण इतकं पसरलं आहे की कुणी सांगेल ते उपाय प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी केले जातात. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का की  तुमच्या काही छोट्या छोट्या सवयीदेखील प्रतिकार शक्ती कमी करण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. यासाठी तुम्हाला माहीत असायला हवं की प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी काय करावं आणि काय करू नये. 

तुमच्या या सवयींमुळे कमी होऊ शकते प्रतिकारशक्ती

तुमच्या या छोट्या छोट्या सवयी वेळेत बदलल्या नाहीत तर कमी होऊ शकते प्रतिकार शक्ती … यासाठी वेळीच सावध व्हा!

पाणी कमी प्रमाणात पिणे

शरीरातील सर्व क्रिया उत्तम रित्या होण्यासाठी शरीराला पुरेशी पाण्याची गरज असते. जर तुम्ही दिवसभरात पुरेसं पाणी पिलं नाही तर तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. शरीर हायड्रेट नसेल तर तुमची प्रतिकार शक्ती कमजोर होतो. यासाठीच पाणी कमी पिणं तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकता. तज्ञ्जांच्या सल्लानुसार यासाठी प्रत्येकाने दिवसभरात कमीत कमी  आठ ग्लास पाणी पिणे गरजेचं आहे.

भाज्या अथवा चिकन स्वच्छ न धुणे

आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, चिकन, मटण यांचा समावेश असणं उत्तम आरोग्यासाठी गरजेचं आहे. पण निरोगी राहण्यासाठी गरजेचं आहे भाज्या, फळ, चिकन अथवा मटण व्यवस्थित स्वच्छ करणं. जर तुम्ही बाहेरून आणलेले हे पदार्थ शिजवण्यापूर्वी स्वच्छ धुतले अथवा निर्जंतूक केले नाही तर तुमची प्रतिकार शक्ती कमजोर होण्याची शक्यता अधिक वाढते.

ADVERTISEMENT

अन्न अर्धवट शिजवणे

अती तळलेले अथवा अती शिजलेल्या पदार्थांमधून पोषकतत्त्वं कमी  होतात. मात्र यासाठी पदार्थ अर्धवट शिजवून मुळीच खाऊ नये. जर अन्नपदार्थ व्यवस्थित शिजले नाहीत तर त्यातील जीवजंतू तसेच राहतात. कच्चे अन्न खाण्यामुळे तुमच्या पचनशक्तीवर वाईट परिणाम होतो. ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती कमजोर होऊ शकते.

फार वेळ उपाशी राहणे

कमी प्रमाणात अन्न खाणे, वेळेवर न जेवणे अथवा डाएटचा अती मारा  शरीरावर करणे तुमच्या आरोग्यासाठी महागात पडू शकते. कारण बराच वेळ उपाशी राहण्यामुळे तुमची प्रतिकार शक्ती कमजोर होते आणि तुम्ही आाजारी पडण्याची शक्यता वाढते.

पोषक आहार न घेणे

प्रतिकार शक्ती मजबूत होण्यासाठी पोषक आणि संतुलित आहार घ्यायला हवा. ज्यात प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स भरपूर प्रमाणात असावे. चांगला आहार घेतल्यामुळे तुमची प्रतिकार शक्तीच नाही तर शरीरदेखील मजबूत होते. ज्यामुळे तुम्ही पटकन आजारी पडत नाही.

जंक फूड अती प्रमाणात खाणे

आजकाल सतत घरामध्ये राहून बाहेरचे जंकफूड खाण्याची इच्छा वारंवार मनात निर्माण होत असते. मात्र जंक फूड खाण्यामुळे तुमच्या शरीराचे पोषण होत नाही. वजन नियंत्रित राहत नाही ज्यामुळे आजारी पडण्याची शक्यता वाढते. यासाठी आहारात पुरेसे पोषक पदार्थ वाढवावेत आणि जंक फूडपासून दूर राहावे.

ADVERTISEMENT

आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेल्या या हेल्थ टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये अवश्य कळवा. 

फोटोसौजन्य –

अधिक वाचा –

रक्तातील ऑक्सिजनची वाढवण्यास मदत करतील हे पदार्थ

ADVERTISEMENT

कांद्याचे फायदे , आरोग्य आणि सौंदर्यासाठी (Kandyache Fayde)

दूध उभे राहून आणि पाणी बसून का प्यावं, जाणून घ्या आयुर्वेदिक कारण

23 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT