भारतात अजूनही लैंगिक आरोग्य या विषयावर बोलण्यास संकोच केला जातो. पूर्वी तर हा विषय उघडपणे बोलणे म्हणजे निर्लज्जपणा समजला जायचा. मुलं व मुली यांना स्वतःच्या व भिन्नलिंगी शरीरचनेची पूर्ण शास्त्रशुद्ध माहिती असणे आवश्यक आहे. या विषयावर सहसा मुलींना त्यांची आईच माहिती देते. जिथे आई नसेल तिथे वडिलांनीही ही माहिती द्यायला काहीच हरकत नाही. पण पालक सहसा त्यांच्या लहान मुलांशी लैंगिक आरोग्याविषयी चर्चा करण्यास नाखूष असतात, परंतु त्यांच्याशी या विषयावर बोलणे महत्वाचे आहे, कारण यामुळे त्यांना त्यांचे शरीर अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होते. तसेच, हे त्यांना अनेक गैरसमज आणि आरोग्य समस्यांपासून दूर ठेवेल.
किशोरवयात मुलींचे शरीर इतके वेगाने बदलते की त्यांना काहीच समजत नाही. पण लैंगिक आरोग्यावर चर्चा केल्याने त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात. त्याच वेळी, त्यांना हे देखील माहित होते की कोणत्याही गोंधळाच्या वेळी कोणाशी संपर्क साधावा. तुमच्या मुलीशी लैंगिक आरोग्य आणि नातेसंबंधांवर चर्चा करण्याचे आणखी एक कारण म्हणजे किशोरवयीन मुलांनी लैंगिक संबंध, कंडोमशिवाय सेक्स किंवा एकाहून अधिक पार्टनर्स बरोबर लैंगिक संबंध यासारखे लैंगिक जोखमीचे वर्तन अत्यंत जबाबदारीने करावे हे आहे. भारतीय पालकांनी जागे होण्याची प्रचंड गरज आहे कारण आता लग्नापूर्वी सेक्स ही केवळ पाश्चात्य देशांतील संकल्पना राहिली नसून ती भारतातही पोचली आहे.
मुलांचे सेक्सबद्दल असणारे गैरसमज दूर करा
सेक्स हा केवळ शारीरिक नसतो, सहसा लोक सेक्सला शारीरिक समजतात, परंतु मुलीला हे समजावून सांगणे आवश्यक आहे की सेक्स शारीरिक पेक्षा अधिक भावनिक आहे. भावनिक जवळीक आपल्याला सुरक्षित आणि विश्वासू वाटते. म्हणून, जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीबरोबर सुरक्षित वाटते तेव्हा लैंगिक जवळीक आपल्याला एक आनंददायी अनुभूती देते. मुले मीडियावर दाखवलेले संदेश आणि चित्रे अगदी अचूक मानतात. म्हणून, तुमच्या मुलींशी वास्तविक जीवनातील जवळीक आणि मीडिया प्लॅटफॉर्मवर काय दाखवले जाते यातील फरकाबद्दल बोलणे आवश्यक आहे. ज्यामुळे त्यांना योग्य गोष्टींची जाणीव होते, त्यांना समज विकसित करण्यात मदत होऊ शकते.
सेक्ससाठी दबाव नव्हे संमती सर्वात महत्त्वाची
संमती ही निरोगी नातेसंबंधाची महत्त्वाची बाब आहे. मुलींना स्पष्टपणे सांगा की कुठल्याही दबावाला बळी पडून शरीरसंबंधांना संमती देऊ नका. तुम्हाला मनापासून इच्छा नसेल तोवर कुणाच्याही जबरदस्तीला , दबावाला, इमोशनल ब्लॅकमेलिंगला बळी पडून सेक्ससाठी संमती देऊ नका. जेव्हा नात्यात जबरदस्ती किंवा भीती असते तेव्हा प्रेम आणि आदर असू शकत नाही. त्यामुळे दबाव असेल तर संबंध पुढे नेण्यास सक्तपणे नाही म्हणा.
कंडोम आणि बर्थ कंट्रोल
कंडोम हे लैंगिक संक्रमित रोग (एसटीडी) आणि गर्भधारणेची शक्यता कमी करण्यासाठी वापरले जाते. जेव्हा तुम्हाला मूल हवे असते फक्त तेव्हाच कंडोमचा वापर करू नये. अन्यथा एचआयव्ही, एड्स आणि इतर एसटीडीपासून संरक्षणासाठी तसेच अनियोजित गर्भधारणा टाळण्यासाठी सेक्स करताना कंडोम वापरणे अत्यावश्यक आहे हे तुमच्या मुलीला आवर्जून सांगा.
फिमेल सेक्शुअलीटीविषयीही चर्चा होणे आवश्यक
प्रौढ मुलीसाठी स्त्री लैंगिकता महत्त्वाची असते. म्हणूनच पालकांनी सेक्स, हस्तमैथुन आणि लैंगिक समाधान यासारख्या काही महत्त्वाच्या शब्दांचा अर्थ स्पष्ट केला पाहिजे. या गोष्टींबद्दल सहसा बोलले जात नाही, आणि त्याच वेळी, बहुतेक स्त्रियांना लैंगिक समाधानाची गरज माहित नसते. प्रामुख्याने पितृसत्ताक समाजात लैंगिक इच्छा असलेल्या स्त्रियांकडे अनेकदा वाईट नजरेने पाहिले जाते. स्त्री लैंगिकतेशी संबंधित हे शब्द शिकवल्याने मुलींना त्यांच्या शरीराबद्दल आणि गरजांबद्दल अधिक जाणून घेण्यास मदत होऊ शकते.
आपल्या वयात येणाऱ्या मुलामुलीशी बोलताना या विषयावर संभाषण हळूहळू सुरू करा. सर्व माहिती एकाच वेळी शेअर केली पाहिजे असे नाही. त्यांना जसे जसे प्रश्न पडतील त्याची त्यांना मोकळेपणाने व तार्किक उत्तरे द्या व त्यांच्या वयासाठी योग्य असे शब्द वापरा. याविषयी बोलताना शरीराच्या अवयवांसाठी योग्य सायंटिफिक शब्द वापरा.
मुलांसाठी लैंगिक शिक्षण आवश्यक आहे, मग ते पालकांद्वारे असो किंवा शाळांद्वारे. बहुतेक पालकांना त्यांच्या मुलांना लैंगिक आरोग्याविषयी कसे शिकवायचे हे माहित नसते. अशा परिस्थितीत पालकांना प्रशिक्षण देण्यासाठी संस्थांनी पुढे यायला हवे जेणेकरुन ते आपल्या मुलांशी लैंगिक आरोग्याबाबत प्रभावीपणे संवाद साधू शकतील.
Photo Credit- istockphoto
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक