सरळ केस असले की प्रत्येकाला मला कुरळे केस का नाही असा विचार मनात येतो. केस सरळ करणे जितके सोपे काम आहे तितके केस कुरळे करणे हे कठीण आहे. कारण केस कुरळे करताना अधिक मेहनत घ्यावी लागते. जर तुम्हालाही सतत केस कुरळे करायला आवडत असेल तर तुम्हाला काही गोष्टींची माहीत असायला हवी. केस कुरळे केल्यामुळे नेमकं काय होऊ शकतं आणि काय खबरदारी आपण घ्यायला हवी ते जाणून घेणेही गरजेचे आहे. केस कुरळे कधी करावे? त्यानंतर त्याची काळजी कशी घ्यावी चा जाणून घेऊया.
केस कुरळे करण्यासाठी लागणारी हिट
ज्या प्रमाणे केस सरळ करण्यासाठी आपण केसांच्या स्टेटरनरचा उपयोग करतो. अगदी त्याचप्रमाणे केस कुरळे करण्यासाठी टाँगचा उपयोग केला जातो. हल्ली अनेक जण स्ट्रेटनरचा वापर करुन ही केस कुरळे केले जातात. केस कुरळे करण्यासाठी ज्यावेळी या मशीन्स वापरल्या जातात त्यावेळी हिटचा प्रयोग केला जातो. केसांना कुरळे करण्यासाठी केसांवर हिटचा खूप जास्त वापर होतो. त्यामुळे तुमचे केस किती सरळ आहेत आणि त्याची किती घनता आहे हे लक्षात घेऊन तुम्ही त्याचा किती वापर करता हे तुम्हाला माहीत असायला हवे. केसांमध्ये ही मशीन कितीवेळ ठेवायची हे देखील माहीत असायला हवे.
केसांचा गुंता सोडविण्यासाठी 5 सोप्या टिप्स, केस नाही तुटणार
केसांवर मशीन लावण्याआधी घ्यावयाची काळजी
केसांना कोणतीही मशीन लावण्याआधी तुम्ही केसांची काय काळजी घ्यायला हवी त्यासाठी काही मुद्दे
- केसांना कोणतीही मशीन लावण्यापूर्वी केसांवर एक लेअर लावणे गरजेचे असते. त्यासाठी तुम्ही केसांना सीरम लावू शकता. त्यामुळे केसांना थेट मशीनची हिट लागली तरी केस चांगले राहण्यास मदत मिळते.
- केसांना मशीन लावण्यापूर्वी त्याची हिट किती आहे ते तपासणे गरजेचे असते. त्यामुळे जर तुमच्या मशीनवर हिट दिसत असेल तर ती तपासून आवश्यक एवढ्या सेटिंग्जवर तुम्ही त्याची सेटिंग करावी
- केस खूप सरळ असतील तर ते कुरळे करण्यासाठी नक्कीच वेळ जातो. पण याचा अर्थ तुम्ही केसांवर खूप वेळासाठी मशीन ठेवणे अजिबात चांगले नाही. त्यामुळे तुम्ही किती वेळासाठी ती ठेवता त्याचे भान ठेवा. कारण अनेकदा नजर घटी दुर्घटना घटी असे होऊन तुमचे केसही जळू शकतात.
- जर तुम्हाला काही कारणास्तव तुमचा लुक बदलणे गरजेचे असेल तर तुम्ही केसांना कुरळे करताना तुम्ही नो हिट कर्लचा वापर केला तरी चालू शकतो.
- केसांना सतत कुरळे केल्यामुळे केसांचा वॉल्युम कमी होऊ लागतो. जे तुम्हाला सुरुवातीला कळणार नाही. पण त्याचा त्रास तुम्हाला कालांतराने जाणवू लागतो.
केस कुरळे करताना तुम्ही या गोष्टींचा विचार करणेही गरजेचे आहे. तुम्ही या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल.