ADVERTISEMENT
home / पालकत्व
tips to wash baby hair in Marathi

लहान बाळाचे केस धुताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

आई होणं ही आयुष्यातील एक आनंदाची गोष्ट असली, तरी बाळाचे संगोपन वाटतं तितकं सोपं नक्कीच नाही. बाळाला हाताळणं, बाळाला दूध पाजणं, बाळ का रडतं हे समजून घेणं, बाळाचा आहार सांभाळणं यासोबत नवमातेसाठी बाळाला अंघोळ घालणं आणि बाळाचे केस स्वच्छ करणं हे एक आव्हान असू शकतं. कारण बाळ या सर्व गोष्टी करताना फक्त रडून त्याच्या भावना व्यक्त करतं. मात्र आईला बाळाला कधी काय हवं ते त्याच्या हालचाल आणि रडण्यातूनच समजून घ्यायचं असतं. यासाठीच जेव्हा तुम्ही बाळाला अंघोळ घालताना त्याचे केस धुवाल तेव्हा या टिप्स फॉलो करा. 

बाळाचे केस धुण्यासाठी टिप्स –  Tips to Wash Baby Hair

tips to wash baby hair in Marathi

बाळाला अंघोळ घातलाना तुम्हाला काही गोष्टी नीट लक्षात ठेवाव्या लागतील. स्पेशली जेव्हा तुम्ही बाळाचे केस धुत असाल तेव्हा या गोष्टी लक्षात ठेवल्या तर बाळाला कोणताच त्रास होणार नाही. 

  • सर्वात आधी बाळाचे अंग आणि केस पाण्याने भिजवा. हातावर थोडा बेबी शॅम्पू घ्या आणि दोन्ही हातांवर तो रगडून त्याचा फेस तयार करा आणि मग हळूवारपणे बाळाच्या केसांना लावा. केस लगेच धुवून टाका, जास्त वेळ केसांमध्ये शॅम्पू ठेवू नका.
  • बाळाला अंघोळ घातलाना अथवा केस धुताना बाळ रडू नये यासाठी टबमध्ये काही खेळणी सोडा. ज्यामुळे बाळ खेळण्यात दंग राहील.
  • बाळाची त्वचा नाजूक असते, टाळू भरलेली नसते यासाठी बाळाचे केस हळूवारपणे स्वच्छ करा.
  • बाळाचे केस धुताना त्याला रडू येऊ नये यासाठी बाळासोबत खेळा अथवा गाणी म्हणा.
  • बाळाचे केस धुताना शॅम्पूचा फेस अथवा पाणी बाळाच्या नाकात, डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्या.
  • बाळाचे केस अंघोळ घातल्यावर लगेच कोरड्या आणि मऊ टॉवेलने स्वच्छ करा. जास्त वेळ ओले राहीले तर बाळाला सर्दी होऊ शकते. 
  • केस धुतल्यावर ते सुकले की बाळाच्या केसांना बेबी हेअर ऑईल लावा. कारण शॅम्पूमुळे कधी कधी केस आणि टाळू कोरडी पडण्याची शक्यता असते. 
  • बाळाची टाळू स्वच्छ करण्यासाठी हातापेक्षा एखाद्या मऊ स्पंजचा वापर करा. 
  • बाळाचे केस वाढल्यावर योग्य वेळी त्याचे जावळ करा. यासाठी जाणून घ्या बाळाचा जावळ विधी संपूर्ण माहिती | Javal Kadhane Vidhi Marathi

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

26 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT