ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
Healing After Toxic Relationship

टॉक्सिक नात्यातून बाहेर पडल्यावर अशी घ्या स्वतःची काळजी 

जेव्हा आपण एखादे व्यक्तीबरोबरचे नाते स्वीकारतो तेव्हा आपल्या मनात अनेक आशा आणि स्वप्ने असतात. आपल्या काही अपेक्षा असतात. आणि हे नाते टिकवण्याचे आपण खूप प्रयत्न करतो. पण काही वेळा असे घडते की समोरची व्यक्ती खूप टॉक्सिक असते. त्या व्यक्तीमुळे आयुष्य खराब होते. त्यावेळी आपल्याला काही कठोर निर्णय घेऊन त्या नात्यातून बाहेर पडावे लागते. जरी आपल्या मनाला माहित असते की हे टॉक्सिक नाते तोडणे आवश्यक होते.पण तरीही नाते तुटल्यावर आपल्याला अपयशी वाटू लागते कारण माणसाला कायम एकटे राहण्याची भीती वाटते. या परिस्थितीला तोंड देणे खूप कठीण होऊन बसते. जीवनात पुढे जाण्यासाठी टॉक्सिक नात्यातून बाहेर पडणे आवश्यक आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. अशा नात्यातून बाहेर पडल्यावर स्वतःची काळजी कशी घ्यायची ते वाचा. 

तुमच्या भावनांना वेळ द्या

Healing After Toxic Relationship
Healing After Toxic Relationship

आपण नेहेमी स्वतःच्या भावना स्वीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण जर आपण त्या स्वीकारल्या नाहीत तर आयुष्यात पुढे जाणे कठीण होते. काहीवेळा भूतकाळाची आठवण झाल्याने वाईट वाटणे यात काहीही चुकीचे नाही. तुमच्या भावना व्यक्त करा. त्यांच्याबद्दल बोला आणि प्रामाणिक रहा. त्यांना लपविण्याची घाई केल्याने परिस्थिती आणखी वाईट होऊ शकते. तुमचे दुःख स्वीकारा आणि त्यापासून लांब पळणे टाळा.

सोशल मीडिया डिटॉक्स करा 

Healing After Toxic Relationship
Healing After Toxic Relationship

जेव्हा आपण एखाद्या वाईट गोष्टीतून बाहेर पडत असतो , हीलिंगसाठी प्रयत्न करत असतो अशा वेळी सोशल मीडियापासून ब्रेक घेणे हा योग्य निर्णय आहे कारण सोशल मीडिया तुम्हाला त्या दु:ख आणि वाईट आठवणींकडे ढकलू शकतो. सोशल मीडियावरील काही गोष्टी वाचून, बघून तुमच्या भावना दुखावू शकतात. त्यामुळे त्यापासून ब्रेक घेणे शहाणपणाचे आहे. 

स्वतःची काळजी घ्या

Healing After Toxic Relationship
Healing After Toxic Relationship

एखाद्या वाईट नात्यातून बाहेर पडल्यानंतर स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे, कारण जर तुम्हीच स्वतःची काळजी घेतली नाही तर इतर कोण घेईल? स्वतःच स्वतःची काळजी घेणे ही उपचारांची दुसरी आणि सर्वात महत्वाची पायरी आहे. स्वतःची काळजी घ्या, विशेषत: या काळात मानसिक ताण तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो. म्हणून स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. चांगल्या आरोग्यासाठी योग्य पोषण आणि चांगली झोप मिळणे खूप महत्वाचे आहे. आवडेल ते पौष्टिक पदार्थ खा, फिरायला जा, तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींबरोबर वेळ घालवा, तुमचा आवडता छंद जोपासा. 

ADVERTISEMENT

तुमच्या आवडत्या लोकांना भेटा

Healing After Toxic Relationship
Healing After Toxic Relationship

आपल्या आवडीची माणसे आपल्या बरोबर असली तर आपली मनस्थिती सुधारण्यास मदत होते. आवडत्या लोकांबरोबर घालवलेले हे क्षण तुमचे मानसिक आरोग्य आणि शेवटी तुमचे शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत करतील. 

आवडता छंद जोपासा 

आपल्या सर्वांनाच कुठला ना कुठला छंद असतो. हे जीवनात पुढे नेणारे उपक्रम आहेत. तुम्ही तुमचे छंद पुन्हा नव्याने जोपासल्याने तुमचा मूड आणि मानसिक आरोग्य सुधारेल. मग ते वाचन असो, पोहणे असो किंवा कुटुंबासोबत वेळ घालवणे असो. तुम्ही नवीन छंद किंवा छंद वर्ग देखील सुरू करू शकता जेणेकरून तुमचा वेळ सकारात्मक पद्धतीने घालवता येईल.

जर्नलिंग करा 

Healing After Toxic Relationship
Healing After Toxic Relationship

जर्नलिंग हा डायरी लिहून विचार आणि भावनांचा निचरा करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. तुमच्या मनात जे काही चालले आहे ते लिहा. हे तुम्हाला तणाव कमी करण्यात मदत करू शकते. पेन आणि कागदाद्वारे लिहिण्याची ही जुनी पद्धत आपल्या दडपलेल्या भावनांवर प्रभावी उपचार करू शकते.

तुम्हाला नैराश्य किंवा अँझायटीचा त्रास होत असल्यास तज्ज्ञांची मदत घेतल्यास या परिस्थितीला सामोरे जाण्यास मदत होऊ शकते. थेरपी हा बरे वाटण्याचा आणि समस्या सोडवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. कोणतेही बंधन तोडणे सोपे नाही. पण तरीही भूतकाळ मागे सोडून पुढे जा.

ADVERTISEMENT

Photo Credit- istock

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

09 Aug 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT
good points logo

good points text