ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
Tips For Making Monthly Budget

घरगुती खर्चासाठी महिन्याचे बजेट ठरवताना फॉलो करा या सोप्या टिप्स

पैशांचे योग्य नियोजन आणि बचत करण्यासाठी प्रत्येक गोष्टींचे बजेट ठरवायला हवं. जर कोणताही खर्च करण्यापूर्वी त्याचं आधीच बजेट ठरवलं तर वायफळ खर्च कमी होतो. सतत बजेट डोक्यात असल्यामुळे खर्च वाढणार नाही याची काळजी घेतली जाते. जर नेहमी घर खर्चावर तुमचे जास्त पैसे खर्च होत असतील तर एकदाच महिन्याच्या खर्चाचं बजेट ठरवा आणि त्यानुसारच खरेदी करा. ज्यामुळे तुमचा विनाकारण खर्च कमी होईल. यासाठी फॉलो करा या काही सोप्या टिप्स यासोबतच ‘या’ सोप्या टिप्स वापरून करा बचत आणि व्हा श्रीमंत

Tips For Making Monthly Budget

घरखर्चाचे बजेट ठरवण्यासाठी टिप्स

तुम्ही घरात किती खर्च करता यावर तुमच्या पैशांचे नियोजन अवलंबून आहे. त्यामुळे पैशांची बचत करायची असेल तर आधी महिन्याचे बजेट ठरवा. 

  • सर्वात आधी सामानाची यादी तयार करा. ज्यामध्ये तुम्हाला महिनाभर लागणारे वाणसामान, सॅनिटरी  आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी असतील.
  • दररोज अथवा आठवड्याला सामान खरेदी करण्याऐवजी महिनाभराचे वाणसामान एकदाच भरा. ज्यामुळे तुमचा खर्च नक्कीच कमी होईल. 
  • स्वयंपाकघरात एक नोंदवही ठेवा आणि तुम्हाला महिनाभर किती आणि कोणते सामान लागते याची वेळोवेळी नोंद करा ज्यामुळे महिन्याचे सामान एकत्र खरेदी करणे सोपे जाईल.
  • वाणसामान एखाद्या वाण्याकडून खरेदी करण्याऐवजी सुपर मार्केटमधून खरेदी करा. ज्यामुळे तुम्हाला होलसेल रेटमध्ये सामान मिळेल.
  • तुमच्या घरात भरपूर माणसं असतील आणि तुम्हाला खूप वाणसामान लागत असेल तर त्याची खरेदी एखाद्या होलसेल मार्केटमध्ये जाऊन करा. वाशी, क्रॉपर्ड अशा ठिकाणी घाऊक सामान घेतल्यास चांगला  फायदा होऊ शकतो.
  • ज्या गोष्टी तुम्हाला भरपूर प्रमाणात लागतात त्याच खरेदी करा उगाचच न लागणाऱ्या वस्तू घरात भरून ठेवू नका.
  • महिन्याचे बजेट जितके ठरले असेल त्या बजेटमध्येच सामान खरेदी करण्याचा प्रयत्न करा.
  • स्वयंपाक करताना अन्न वाया जाणार नाही याची काळजी घ्या ज्यामुळे तुमचा महिन्याचा खर्च नक्कीच कमी होईल.
  • शक्य असल्यास सामान ऑनलाईन खरेदी करा ज्यामुळे तुमचा जाण्यायेण्याचा वेळ आणि पैसा वाचेल
  • कोणत्या सामानावर विशेष सवलत आहे ते पाहून त्या महिन्यात ती वस्तू जास्त प्रमाणात खरेदी करा. पुढच्या महिन्यात ती वस्तू खरेदी न करता ज्यावर जास्त सवलत आहे ती वस्तू तुम्हाला खरेदी करता येऊ शकते. 
  • वारंवार हॉटेलमध्ये जेवण केल्यामुळे तुमच्या महिन्याचे बजेट वाढू शकते. शिवाय यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता अधिक असते.
  • हॉटेलचा खर्च वाचवण्यासाठी घरात पुरेसे सामान भरा आणि स्वयंपाकासाठी मदतनीस ठेवा ज्यामुळे तुम्हाला घरचे अन्न मिळेल आणि तुमचे पैसे वाचतील. तुम्ही यासाठी फक्त भाजी पोळी करण्यासाठी अथवा सामान स्वच्छ करून, भाज्या निवडून कापून ठेवण्यासाठी मेडची मदत घेऊ शकता. ट्रॅव्हलिंगमध्ये कसे वाचवावेत पैसे, पर्याय आणि टीप्स
  • एखाद्या महिन्यात तुमचे घरखर्चाचे बजेट वाढले तर पुढच्या महिन्यात काही खर्च कमी करून त्यात संतुलन साधा. ज्यामुळे तुमचा खर्च आटोक्यात राहिल. तुमच्या ‘या’ सवयींमुळे नकळत खर्च होत आहेत तुमचे पैसे
  • घरातील वीजे बिल, घर आणि घरातील उपकरणांचा मेटेंनन्स, घरगुती स्वयंपाकाच्या गॅसचं बिल, फळं आणि भाजीचा खर्च, मदतनीसांचा खर्च या सर्व गोष्टींचा विचार करून बजेट ठरवा. 
07 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT