एखादं लग्नकार्य असो वा सणसमारंभ एखनिक लुक कम्पीट होतो तो मोठ्या कानातल्यांमुळेच. साडी, पंजाबी ड्रेस, पार्टी वेअर गाऊन, लेंगा असं कशावरही तुम्ही मोठे कानातले घालू शकता. डॅंगलर्स अथवा मोठे झुमके घातल्यामुळे तुम्ही नक्कीच स्टायलिश दिसता. मात्र खूप वेळ असे मोठे आणि जड कानातले घातल्यामुळे कानाचे छिद्र मोठे होतात किंवा कानामधून असह्य वेदना जाणवतात. मात्र जर तुम्ही असे मोठे कानातले घालताना काही टिप्स फॉलो केल्या तर तुम्हाला हा त्रास नक्कीच जाणवणार नाहीत.
नंबलिग क्रिम –
तुम्हाला कोणत्याही केमिस्टकडे नंबलिंग क्रिम सहज मिळेल. झुमके अथवा मोठे कानातले घालण्यापूर्वी तुमच्या कानांच्या पाळ्यांना हे क्रिम लावा आणि थोडावेळ सुकू द्या. ज्यामुळे तुमच्या कानाच्या पाळ्या थोड्यावेळासाठी बधीर अथवा सुन्न होतील आणि त्यामुळे कानावर कानातल्यांमुळे येणारे प्रेशर तुम्हाला जाणवणार नाही. मात्र लक्षात ठेवा ही क्रिम वापरण्यापूर्वी तुम्ही एखाद्या स्किन स्पेशलिस्ट चा सल्ला अवश्य घ्या. कारण यामुळे तुमच्या त्वचेवर कोणताही दुष्परिणाम जाणवता कामा नये.
ट्रान्सफरंट दोरा लावा –
जर तुमचे कानातले खूप जड असतील तर तुम्ही कानातल्याच्या पुढील भागाकडून आणि मागील भागाकडून एक ट्रान्सफरंट दोरा लावू शकता. जो दोरा तुम्ही तुमच्या कानाभोवती गुंडाळून कानाच्या मागच्या बाजूने त्याला एक गाठ मारू शकता. असं केल्याने कानातल्याचा भार पाळ्यांवर न येता संपूर्ण कानावर येईल. कानाच्या पाळ्या न दुखल्यामुळे तुम्हाला या पद्धतीने मोठे आणि जड कानातले घालणं सुसह्य होईल. शिवाय दोरा ट्रान्सफरंट असल्यामुळे तो कानातल्यासोबत झाकला जाईल. ही पद्धत तुम्ही फक्त जेव्हा तुम्हाला खूप जड कानातले घालायचे असतील तेव्हाच वापरू शकता.
सपोर्ट पॅच लावा –
जेव्हा कानातले खरेदी कराल तेव्हा त्या कानातल्यांसोबत सपोर्ट पॅचदेखील विकत घ्या. बाजारात तुम्हाला कानासाठी सपोर्ट पॅच सहज विकत मिळतील. हे सपोर्ट पॅच ट्रान्सफरंट आणि मऊ मटेरिअलचे असतात. ज्यामुळे ते कानातल्यांसोबत घातल्यावर दिसत नाहीत आणि कानांना आधार मिळल्यामुळे कान दुखत नाहीत. कानातले घालताना कानाच्या पाळीच्या मागच्या बाजूने हे सपोर्ट पॅच तुम्हाला फक्त कानातल्यामध्ये अडकवण्याची गरज असते. कानाचे छिद्र मोठे होऊ नये यासाठी सपोर्ट पॅच घालणं नेहमीच फायद्याचं ठरतं.
लाईटवेट कानातले निवडा –
जर तुम्हाला मोठे आणि आकर्षक कानातले आवडत असतील तर त्यामध्ये लाईटवेट असतील असेच कानातले निवडा. आजकाल बाजारात लाईटवेट कानातल्यांचे खूप प्रकार मिळतात. असे कानातले दिसायला मोठे असले तरी वजनाला खूप हलके असतात. मोठे कानातले खरेदी करताना ते ऑनलाईन विकत घेण्यापेक्षा बाजारात जाऊन विकत घ्या ज्यामुळे तुम्हाला ते किती वजनदार आहेत हे आधीच समजेल.
कानातल्यासोबत घाला चैन –
अनेक मोठया पारंपरिक कानातल्यांसोबत कानाच्या पाळ्यांभोवती गुंडाळण्याच्या अथवा मागच्या बाजूने केसांमध्ये अडकवण्याच्या चैन मिळतात. या चैन कानातल्यांसोबत घातल्यामुळे तुम्ही स्टायलिश तर दिसताच शिवाय तुमच्या कानावर येणारा ताण विभागला जातो. चैनमुळे कानातल्यांचा भार कानाच्या पाळ्यांवर न पडता कानाचा वरचा भाग आणि केसांकडे वळवता येतो.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
तुमच्या चेहऱ्याच्या आकारानुसार निवडा तुमच्यासाठी परफेक्ट कानातले
कानाचे छिद्र झाले आहे मोठे, मग तुमच्यासाठी सोपे घरगुती उपाय
लग्नसराईसाठी खास कानातले डिझाईन – Earring Designs For Wedding