दागिने घालण्याची आवड आपल्या सगळ्यांनाच असते पण सगळेच दागिने तुम्हाला चांगले दिसतील असे नाही. आता यामध्ये वाईट वाटण्यासारखे काहीच नाही. याचे कारण असे की, प्रत्येकाची देहयष्टी वेगळी असते. चेहऱ्याचा आकार वेगळा असतो त्यानुसार तुम्हाला तुमच्या दागिन्यांची निवड करायची असते. हल्ली आपण फार दागिने घालत नसलो तरी कानातले सगळ्यांनाच घालायला आवडतात. कारण नुसते कानातले घालूनसुद्धा तुम्हाला चांगला लुक मिळू शकतो. पण चांगला लुक मिळवण्यासाठी तुमच्या कानातल्यांची निवडही महत्वाची असते. शिवाय कोणत्या ड्रेसवर किंवा अटायरवर ते घालायला हवे हे देखील तुम्हाला माहीत हवे. त्यासाठीच या खास टिप्स
कोणत्याही ट्रेडिशनल ड्रेसवर उठून दिसतात मोजडी, तुम्ही ट्राय केलीत का?
सगळ्यांच्या ज्वेलरी बॉक्समध्ये रिंग्ज असतात. लहान मोठ्या आकाराच्या या रिंग्ज दिसायला नक्कीच चांगल्या दिसतात. रिंग्जचा आकार साधारणपणे गोल असतो. अगदी लहान आकारापासून तुम्हाला मोठ्या आकारपर्यंत या रिंग्ज मिळतात.हल्ली वेगवेगळ्या आकारातसुद्धा या रिंग्ज मिळतात.
झुमका हा प्रकार सध्या आपल्या सगळ्यांच्याच आवडीचा आहे. ट्रेडिशनल वेअरवर अगदी हमखास हा प्रकार घातला जातो. गोल घुमटासारखा आकार त्याखाली मोती किंवा लटकन असा हा प्रकार असतो. हल्ली गोलच नाही तर चौकोनी, त्रिशंकु अशा वेगवेगळ्या स्वरुपात तुम्हाला झुमके मिळतात.
चांदबाली हा प्रकार अनेकांना आवडतो.चंद्रासारखा आकार असतो म्हणून त्याला चांदबाली असे म्हटले जाते. चांदबालीमध्येही तुम्हाला वेगवेगळे आकार मिळतात. तुम्हाला या कानातल्यांच्या बाबतीतही अशीच निवड करायची आहे. मोठ्या चांदबाली तुम्हाला लग्न समारंभासारख्या कार्यक्रमांना वापरता येतील. तर लहान चांदबालीज तुम्हाला अगदी छोटेखानी समारंभांना वापरता येतील.
कानातल्यांचा प्रकार कोणताही असो तुम्ही काही गोष्टी लक्षात घेतल्या तर तुम्हाला तुमचे कानातले छानच दिसतील.तुमचा वर्ण, तुमच्या चेहऱ्याचा आकार, आणि कानातल्यांचे निमित्त लक्षात घेत त्यांची निवड करा.
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.