घरी बसून काम करण्याचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत आहे. वर्क फ्रॉम होम करण्याचे कित्येक फायदे आहेत. याचा फायदा केवळ कर्मचाऱ्यांनाच नाही तर कंपनीला देखील होतो. डिजिटलच्या जमान्यात स्काइप (Skype), फेसटाइम (Facetime), स्लॅक( Slack) आणि क्लाउड कम्प्युटिंग (Cloud Computing) सारख्या उपलब्ध झालेल्या तंत्रज्ञानामुळे कोणत्याही जागेवरून काम करणं अधिक सोपे झाले आहे. यासाठी तुम्हाला ऑफिसमध्ये हजर राहण्याची आवश्यकताही नाही. त्याऐवजी तुम्ही घरातच बसून ऑफिसची कामे आणखी चांगल्या पद्धतीनं करू शकता. वर्क फ्रॉम होमची सुविधा कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिल्यास त्यांचा वाहतुकीपासून वेळ वाचण्यास मदत होते. घरातून ऑफिसमध्ये जाण्या-येण्याचा वेळ वाचतोच शिवाय ताणतणाव देखील कमी होतो. या खर्च होणाऱ्या वेळेत तुम्ही अधिक चांगली कामे करू शकता. कंपन्यांनाही ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांना बोलवण्याऐवजी ‘वर्क फ्रॉम होम’चाच पर्याय फायद्याचा वाटत आहे.
(वाचा : गाढ झोप हवी आहे का, रात्री ‘या’ 5 अन्नपदार्थांचं करा सेवन)
…तर होईल कोट्यवधींचा फायदा
ज्या कंपन्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ची संस्कृती स्वीकारलेली नाही. त्यांनी हे माहिती करून घेणं गरजेचं आहे की घरातून काम करण्याची संधी देऊन काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांवर खर्च होणाऱ्या तब्बल सात लाख रुपयांची बचत केली आहे. उदाहरणार्थ जर एखाद्या कंपनीकडे 10 कर्मचारी आहेत आणि तर वर्क फ्रॉम होमचा पर्याय स्वीकारून वर्षभरासाठी 70 लाख रुपयांहून अधिक बचत केली जाऊ शकते. शिक्षण, आरोग्य, सरकार, इंजिनिअरिंग, तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांशी संबंधित कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमची संस्कृती स्वीकारून प्रत्येक वर्षी कोट्यवधी रुपयांचा फायदा करून घेतला आहे. तुम्ही घरी बसल्या असिस्टंट, ट्रान्सलेटर, कॉल सेंटर कर्मचारी, डेंटा एंट्री ऑपरेटर किंवा शिक्षण क्षेत्रातलं कोणतंही काम घरी बसल्या करू शकता आणि चांगली रक्कमदेखील कमावू शकता.
(वाचा : सावधान! अजिबातच घाम येत नाही, मग ‘हा’ आजार घेईल तुमचा जीव)
या गोष्टींची घ्यावी लागेल काळजी
वर्क फ्रॉम होमद्वारे करिअरमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. सर्वात आधी तुम्ही हे लक्षात घ्या तुमचं यश आणि अपयश तुमच्याच हाती आहे. त्यामुळे स्वतःला शिस्त लावून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही कामाच्या वेळांचं काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे. घरातून काम करण्याचा अर्थ म्हणजे तुम्ही तुमच्या मर्जीचे मालक आहात, असं नाही. भलेही तुमचा येण्या-जाण्याच्या वेळेची बचत होत असेल, पण तुम्ही यादरम्यान अजिबात टंगळमंगळ करता कामा नये. महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही प्रकारच्या खर्चात वाढ होऊ नये.प्रवासाचा खर्च जरी आटोक्यात आला असला तरीही घरातील काही गोष्टींचा खर्च वाढण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ वीजबिल, इंटरनेटचा खर्च इत्यादी. जर तुम्ही फ्रीलान्सर म्हणून काम करत असाल तर कंपनीकडून कोणत्याही विमा पॉलिसीचा लाभ मिळत नाही. स्वतःसाठी आणि कुटुंबीयांसाठी तुम्हालाच विमा पॉलिसीचा खर्च करावा लागेल.
(वाचा : गर्लफ्रेंडच्या ‘या’ इच्छा तुम्ही करता का पूर्ण, असं करा तिला खूश)
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.