ADVERTISEMENT
home / Vastu
लॉकडाऊनमध्ये सासू-सुनेतील वाद टाळण्यासाठी करून पाहा हे उपाय

लॉकडाऊनमध्ये सासू-सुनेतील वाद टाळण्यासाठी करून पाहा हे उपाय

देशभरात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारद्वारे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. यामुळे लोकांना घराबाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनेकांना घरातल्यांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळत आहे तर काही लोकांना घरी कैद झाल्यासारखं वाटत आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांनी घरी वेळ दिल्यामुळे जुन्या नात्यांमध्ये पुन्हा जिवंतपणा आल्याचं चित्र आहे. एकमेंकाप्रती प्रेमही जागृत झालं आहे. पण म्हणतात ना, प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. काही नात्यांमध्ये लॉकडाऊन वाढल्याने तणावही वाढत आहे. जर तुमच्याकडेही असं घडत असेल मुख्यकरून सासू-सूनेमध्ये तर खालील उपाय तुम्हाला करता येतील आणि वाद-तणाव टाळता येईल.

मनाच्या शांतीसाठी 

जर घरात सासू-सूनेत वाद वाढत असल्यास दोघींनी काही वेळ देवाच्या नामस्मरणात व्यतित करावा. सध्या लॉकडाऊनमुळे अनेकजण देवाच्या भक्तीत स्वतःला मग्न करून तणाव कमी करत आहेत. तुम्हीही हा उपाय नक्की करून पाहा आणि दिवसातला काही वेळ देवापुढे नक्की व्यतीत करा. 

ADVERTISEMENT

चांदीचा तुकडा

वास्तूशास्त्रानुसार जर घरातील सासू-सूनेत वाद वाढले असल्यास त्यांनी चांदीचा चौकोनी तुकडा स्वतःजवळ ठेवावा किंवा जास्त ताणतणाव असल्यास गळ्यात चांदीची चेन घालावी. एकमेंकाना पांढरी वस्तू देणं किंवा घेणं टाळा. थोडक्यात चांदी स्वतःजवळ बाळगल्याने तुमच्या शरीरातीलही उष्णता कमी होईल. परिणामी तुमचं मन शांत राहील आणि वाद आपोआपच कमी होतील. 

सूर्यदर्शन

लॉकडाऊनमध्येही कंटाळा न करता वेळेवर उठा. तुमचं लॉकडाऊन आधी असलेलं रूटीन फॉलो करा. रोज सकाळी लवकर उठून आंघोळीनंतर गूळ घातलेलं पाणी सूर्याला अर्पित करा. थोडक्यात सूर्यप्रकाशाने तुमची बॉडी सायकल नीट राहील आणि त्याचा फायदा तुमच्या मनाला तरारी मिळण्यासाठी होईल. 

ADVERTISEMENT

घराची स्वच्छता

हो… या गोष्टींचाही आपल्या मनावर परिणाम होत असतोच. आसपास जर स्वच्छता असेल तर मनही प्रसन्न राहतं. सध्या घरात कोणीही मोलकरीण किंवा मदतनीस कामाला नसल्याने घराच्या स्वच्छतेच्या कामावरूनही वाद होऊ शकतात. ते टाळा. काम वाटून घ्या किंवा पुढाकार घेऊन सूनेने ती जबाबदारी घ्यावी. वास्तूशास्त्रानुसार सूर्येादयाआधी घरातील केर काढून कचरा घराबाहेर टाकावा. सगळ्यांनाच हे शक्य नाही. पण घरात स्वच्छता ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळे घर स्वच्छ ठेवण्याचा जास्तीतजास्त प्रयत्न करा.

आर्थिक अडचणींसाठी राशीनुसार करा हे उपाय

ADVERTISEMENT

मग तुम्हीही घरातील वादविवाद टाळून एकमेकांशी संवाद साधा. या संकटाच्या काळात आपणच एकमेंकाना धीर देऊन मनाला उभारी देणं आवश्यक आहे.

Vaastu Tips : घरात बासरी ठेवण्याचे फायदे

VaastuTips : चुकूनही उशीखाली ठेवू नका या गोष्टी

19 Apr 2020
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT