ADVERTISEMENT
home / आरोग्य
eizspit

थुंकण्याच्या वाढत्या समस्येला आळा घालण्यासाठी ‘इझीस्पिट’चे अनावरण

राजधानी दिल्लीत इझीस्पिट (EzySpit) या अनोख्या उत्पादनाचे अनावरण करण्यात आले आहे. ज्याचा उद्देश हा स्वच्छ भारत अभियानाला पुढे घेऊन जाणे हा आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याच्या वाढत्या समस्येला आळा घालण्यासाठी पर्यावरणपूरक थुंकी उत्पादनांविषयी जागरूकता करणारे हे स्टार्टअप आहे. स्टार्टअपने तयार केले उत्पादन हे आपल्याला जंतू पसरण्याच्या भीतीशिवाय कुठेही थुंकण्याचे स्वातंत्र्य देईल. नागपूरमधील रितू मल्होत्रा, प्रतीक हर्डे आणि प्रतीक कुमार मल्होत्रा यांनी सात वर्षांचे संशोधन आणि परिश्रमानंतर ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात दिल्ली-एनसीआर, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, महाराष्ट्र, तामिळनाडू, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, गुजरात, हरियाणा आणि पश्चिम बंगालसह विविध राज्यांच्या बाजारांना हे स्टार्टअप लक्ष्य करेल. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याच्या वाढत्या समस्येला आळा घालण्यासाठी देशात पर्यावरणपूरक स्पिटून उत्पादनांविषयी जागरूकता पसरवणे हा या स्टार्टअपमागील उद्देश आहे.  मानवी थुंकीच्या कचऱ्यापासून झाडे वाढवण्याच्या विचाराने ही मोहीम तयार करण्यात आली आहे.

अधिक वाचा – कधी कधी न रडताही का येतं डोळ्यातून पाणी, जाणून घ्या तज्ञ्जांचा सल्ला

वेगळा विचार

इझीस्पिटच्या सह-संस्थापक सुश्री रितू मल्होत्रा म्हणाल्या, “आम्हाला खात्री आहे की, या नवकल्पनामुळे सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याची कल्पना मोडेल. उघड्यावर थुंकणे टाळणे तसेच या पुन्हा वापरता येण्याजोग्या थुंकीच्या वापराविषयी जनजागृती करणे हा या स्टार्टअपचा उद्देश आहे. स्टार्टअपने तयार केलेले हे पॉकेट पाउच (10 ते 15 वेळा पुन्हा वापरता येण्याजोगे आहे), मोबाईल कंटेनर (20, 30, 40 वेळा पुन्हा वापरता येण्याजोगे) आणि थुंकीचे डबे (2000 ते 5000 वेळा वापरता येऊ शकता), इझीस्पिट स्पिटून (EzySpit spittoon) मध्ये मॅक्रोमोलेक्यूल पल्प टेक्नॉलॉजी आहे. आम्ही 2015 पासून या उत्पादनाचा अभ्यास करत आहोत. आज आम्ही हे उत्पादन राष्ट्राला देत आहोत.  स्वच्छ भारत आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे.  सर्वात अनोखी गोष्ट म्हणजे याची संपूर्ण उत्पादन टीम 24 महिलांच्या टीमद्वारे हाताळली जात आहे. मानव आणि निसर्ग यांच्यातील संबंध सुधारणे आणि पर्यावरणातील सौंदर्य आणि आरोग्याला प्रोत्साहन देणे हे आमचे ध्येय आहे. आपले अस्तित्व आणि आरोग्य केवळ या गोष्टींवर अवलंबून आहे.

अधिक वाचा – कानात उष्णतेची पुळी येत असेल तर करा सोपे उपाय

ADVERTISEMENT

कसे करते काम

थुंकण्यामुळे होणारे डाग साफ करण्यासाठी भारतीय रेल्वे दरवर्षी 1200 कोटी रुपये आणि भरपूर पाणी खर्च करते.  रेल्वे स्थानकांव्यतिरिक्त बस स्टॅण्ड, रुग्णालये, बाजारपेठ आणि इतर अनेक सार्वजनिक ठिकाणी थुंकीचे निशाण सहज दिसतात.  अनेक सार्वजनिक ठिकाणी शौचालये, डस्टबिन इत्यादींची योग्य व्यवस्था असल्याने आणि दुसरीकडे थुंकण्याची योग्य व्यवस्था असावी जेणेकरून लोक कोणत्याही ठिकाणी थुंकू नयेत आणि संसर्ग पसरू नये.  या पाऊचमध्ये काही वाळू सारखे साहित्य असते जे थुंकी शोषून घेते.  पाऊच वापरल्यानंतर ते जमिनीत टाकता येते जेथे वनस्पतीदेखील वाढवता येते.  पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते रतन टाटा यांनी स्वच्छतेसह वृक्षारोपण करण्याच्या या अनोख्या नवकल्पनाची प्रशंसा केली आहे. हा एक चांगला उपक्रम चालू करण्यात आला असून याचा सर्वांनी उपयोग करून घ्यावा अशीच अपेक्षा करण्यात येत आहे. यामुळे अनेक आजारांपासून दूर राहता येईल. 

अधिक वाचा – छातीत दुखणे हे अपचन आहे की येणारा हार्ट अटॅक – जाणून घ्या फरक

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

05 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT