मार्गशीर्ष सुरू झाला आहे आणि उपवासही. उपवास म्हटलं की त्याच त्याच पदार्थांचा कंटाळा येतो. एकादशी आणि दुप्पट खाशी अशी आपल्याकडे खरं तर म्हण आहे. त्यामुळे आषाढी एकादशी माहिती मराठी आणि आषाढी एकादशीला शुभेच्छा म्हटलं की उपवासाच्या पदार्थांची चर्चा सुरू होते. उपवासाचे पदार्थ (upvasache padarth) म्हटलं की, आपल्याकडे इतक्या वेगवेगळ्या तऱ्हेच्या रेसिपी करतात की त्यासाठी तरी किमान उपवास करावा असं काही जणांना वाटतं. उपवासाचे पदार्थ रेसिपी (upvasache recipes in marathi) अनेक आहेत. अशाच काही खास उपवासाचे पदार्थ असणाऱ्या रेसिपी आम्ही तुमच्यासाठी या लेखातून आणल्या आहेत. काही जणांना मूळ पदार्थांमध्ये वेगळं काहीतरी करून बघण्याचीही आवड असते. तर काहींना वेगवेगळे उपवासाचे पदार्थ करण्याची आवड असते. तर अशीच तुमची आवड जपण्यासाठी आम्ही काही उपवासाच्या पदार्थांच्या खास रेसिपी (upvas recipe in marathi) आणल्या आहेत.
Table of Contents
- उपवास इडली सांबार (Idli Sambar Upvas Recipe In Marathi)
- कच्च्या केळ्याचा कबाब (Kacha Kela Kebab Recipe)
- राजगिरा थालिपीठ (Rajgira Thalipeeth Upvasache Recipe In Marathi)
- उपवासाचे रगडा पॅटीस (Upvas Ragda Pattice Recipe)
- रताळ्याचा किस (Ratalyacha Kis Upvasachi Recipe In Marathi)
- उपवासाचे घावन (Upvasache Ghavan)
- उपवासाचा बटाटावडा (Upvasacha Batatawada)
- उपवासाचे भगर (वरीचा भात आणि आमटी) Upvasache Bhagar – Varicha Bhat Ani Amti)
- सफरचंदाची रबडी (Apple Rabdi)
- उपवासाचे स्पाईसी पोटॅटो वेजेस (Upvasache Spicy Potato Wedges)
- उपवासाचे धिरडे (Upvasache Dhirde)
उपवास इडली सांबार (Idli Sambar Upvas Recipe In Marathi)
हा पदार्थ वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असणार. पण हो तुम्ही उपवासासाठी इडली सांबार करू शकता. त्याची नक्की रेसिपी काय आहे हे आम्ही तुम्हाला इथे सांगणार आहोत. साबुदाणा वडा आपण नेहमीच खात असतो. खुसखुशीत साबुदाणा वडा घरी केला जातोच. पण आता वेगळी उपवासाची इडलीही तुम्ही करू शकता.
इडली साहित्य:
- 1 वाटी वरीचे तांदूळ
- 1 वाटी साबुदाणा पीठ
- एक इनोचे पाकिट
- चवीनुसार मीठ
- हिरव्या मिरच्या साधारण दोन बारीक कापलेल्या
- पाव चमचा अर्धवट कुटलेले जिरे
बनविण्याची पद्धत:
- एका मोठ्या बाऊलमध्ये भगर अर्थात वरीचे तांदूळ आणि साबुदाणा पीठ पाणी घालून व्यवस्थित दोन तास भिजवून ठेवणे
- भगरीतले पाणी काढून मिक्सरमधून त्याची पेस्ट करून घेणे आणि साबुदाण्याचीही पेस्ट करून घेणे
- या दोन्ही पेस्ट एकत्र करून त्यात मीठ, जिरे आणि हिरव्या मिरच्या घालणे. त्यामध्ये थोडेसे इनो मिक्स करा. जेणेकरून इडल्या फुगायला मदत मिळेल
- इडली पात्रात पाणी घालून नंतर त्यामध्ये पाणी उकळू द्या. इडलीच्या भांड्याला तेलाचा हात लावा आणि हे सारण त्यामध्ये भरा
- त्यानंतर साधारण 10-15 मिनिट्स वाफ देणे आणि इडल्या शिजवणे. नंतर झाकण उघडून इडल्या काढून घ्या
सांबार साहित्य:
- पाव वाटी शेंगदाणे
- 1 हिरवी मिरची
- 1 चमचा आलं
- 1 चमचा हिरवी मिरची पेस्ट
- 1 चमचा चिंचेचा कोळ
- पाव चमचे जिरे
- पाव वाटी उकडलेला लाल भोपळा तुकडे
- पाव वाटी उकडलेले बटाट्याचे तुकडे
- पाव चमचा तिखट
- मीठ आणि गूळ चवीनुसार
- तेल
- जिरे
बनविण्याची पद्धत:
- शेंगदाणे एक तास भिजवा आणि मग त्यातील पाणी काढून जिरे घालून मिक्सरवर वाटा
- एका कढईत तेल तापवा. त्यात मिरची फोडून घाला. आलं आणि मिरची पेस्ट घालून परतणे आणि त्यावर तिखट घालणे
दाण्याची पेस्ट टाकून त्यात आवश्यकतेनुसार पाणी घाला - भोपळा आणि बटाटा फोडी घालून मिक्स करा. वरून चिंचेचा कोळ, गूळ आणि मीठ घालून मिक्स करा आणि उकळी द्या
कच्च्या केळ्याचा कबाब (Kacha Kela Kebab Recipe)
आतापर्यंत आपण चाट म्हणून रगडा पॅटीस नेहमीच खाल्ले आहे. मात्र उपवासाचे रगडा पॅटीस (ragda pattice upvasachi recipe in marathi) तुम्हाला माहीत आहे का? याची सोपी रेसिपी जाणून घ्या
साहित्य:
- एक वाटी शेंगदाणे
- एक मोठा चमचा साजूक तूप
- जिरे
- ओले खोबरे
- आले – मिरची पेस्ट
- आमसूल
- चवीनुसार मीठ आणि गूळ
- तिखट
- उकडलेले बटाटे
बनविण्याची पद्धत:
- शेंगदाणे रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी उपसून साधारण त्याला 5 शिट्ट्या कुकरमध्ये द्या
- थंड झाल्यावर त्याची पेस्ट करून घ्या
- कढईत तूप तापवा त्यात जिरे, खोबरे, उकडलेले बटाट, आले – मिरची पेस्ट आणि मीठ, दाण्याचे कूट घालून नीट शिजवून घ्या
- याचे पॅटीस तयार करा आणि ते तेलावर अथवा तूपावर शेकून घ्या
- शेंगदाण्याच्या पेस्टमध्ये पाणी घालून त्यात आमसूल, मीठ, गूळ आणि वरून जिऱ्याची तूपाची फोडणी घालून रगडा तयार करून घ्या
- पॅटीसवर हा रगडा आणि तुम्हाला हवं असल्यास, चिंचगूळाची चटणी आणि हिरवी चटणी घालून या रगडा पॅटीसची चव अधिक चांगली करा
वाचा – वटपौर्णिमेचा पूजा विधी
राजगिरा थालिपीठ (Rajgira Thalipeeth Upvasache Recipe In Marathi)
राजगिरा आणि बटाटा हे दोन्ही उपवासातील ठरलेले पदार्थ. आपल्याला राजगिऱ्याची पुरी तर माहीत आहेच. पण तुम्ही आता राजगिरा आणि बटाटा या दोन्हीचा उपयोग करून थालिपीठही करून बघा.
साहित्य:
- 2 उकडलेले बटाटे
- राजगिऱ्याचे 1 वाटी पीठ
- 2 हिरव्या मिरच्या (तिखट तुमच्या आवडीप्रमाणे)
- मीठ
- साखर
- तूप
बनवण्याची पद्धत:
- उकडलेल्या बटाट्याची साले काढून ते कुस्करून घ्यावेत. त्यामध्ये राजगिऱ्याचे पीठ, हिरवी मिरची, मीठ, चिमूटभर साखर, थोडेसे तूप घालून मीठ व्यवस्थित मळून घ्यावे.
- त्यानंतर त्याने गोळे करावेत.
- बटर पेपरला तूप लावा आणि त्यावर हे थालिपीठाप्रमाणे थापा आणि मध्ये एक छिद्र पाडा
- तवा मध्यम आचेवर ठेवावा. त्यावर तूप सोडावे आणि वरून थालिपीठ लावावे
- मंद गॅसवर हे थालिपीठ खमंग भाजा
- तयार झाल्यावर दही अथवा शेंगदाण्याच्या उपवासाच्या चटणीसह खायला द्या
उपवासाचे रगडा पॅटीस (Upvas Ragda Pattice Recipe)
आतापर्यंत आपण चाट म्हणून रगडा पॅटीस नेहमीच खाल्ले आहे. मात्र उपवासाचे रगडा पॅटीस तुम्हाला माहीत आहे का? याची सोपी रेसिपी जाणून घ्या
साहित्य:
- एक वाटी शेंगदाणे
- एक मोठा चमचा साजूक तूप
- जिरे
- ओले खोबरे
- आले – मिरची पेस्ट
- आमसूल
- चवीनुसार मीठ आणि गूळ
- तिखट
- उकडलेले बटाटे
बनविण्याची पद्धत:
- शेंगदाणे रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी उपसून साधारण त्याला 5 शिट्ट्या कुकरमध्ये द्या
- थंड झाल्यावर त्याची पेस्ट करून घ्या
- कढईत तूप तापवा त्यात जिरे, खोबरे, उकडलेले बटाट, आले – मिरची पेस्ट आणि मीठ, दाण्याचे कूट घालून नीट शिजवून घ्या
- याचे पॅटीस तयार करा आणि ते तेलावर अथवा तूपावर शेकून घ्या
- शेंगदाण्याच्या पेस्टमध्ये पाणी घालून त्यात आमसूल, मीठ, गूळ आणि वरून जिऱ्याची तूपाची फोडणी घालून रगडा तयार करून घ्या
- पॅटीसवर हा रगडा आणि तुम्हाला हवं असल्यास, चिंचगूळाची चटणी आणि हिरवी चटणी घालून या रगडा पॅटीसची चव अधिक चांगली करा
रताळ्याचा किस (Ratalyacha Kis Upvasachi Recipe In Marathi)
रताळ्याचा किस करणे अत्यंत सोपे आहे. तुम्हाला हा उपवासाचा पदार्थ करण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही आणि याने पोटही भरलेले राहते आणि दिवसभर चांगली ऊर्जाही मिळते.
साहित्य:
- रताळे
- चवीनुसार साखर आणि मीठ
- दाण्याचे कूट
- ओले खोबरे
- हिरव्या मिरच्या
- जिरे
- तूप
बनविण्याची पद्धत:
- रताळ्याची साले काढून किसून पाण्यात ठेवा. जेणेकरून किस काळा पडणार नाही
- कढईत तूप घाला त्यात जिरे तडतडू द्या
- वरून मिरच्या आणि रताळ्याचा किस घालून परता
- त्यात दाण्याचे कूट, ओले खोबरे आणि साखर, मीठ घालून नीट वाफवून घ्या
- रताळ्याचा किस वाफवला आणि शिजला की खाण्यास तयार
उपवासाचे घावन (Upvasache Ghavan)
तांदळाचे घावन तर आपण सर्वांनीच खाल्ले आहेत. पण उपवासाचे घावन हा एक वेगळा पदार्थ तुम्हाला करता येऊ शकतो. तुम्ही उपवासासाठी हा पदार्थ नक्की करून पाहा. साबुदाणे हे उपवासाला अनेक पदार्थांमध्ये वापरले जातात. साबुदाण्याचे फायदेही खूप असतात. यामध्येही तुम्ही साबुदाण्यासह इतर पदार्थ वापरून घावन तयार करू शकता.
साहित्य:
- एक वाटी वरीचे तांदूळ
- एक वाटी साबुदाणे
- 2 हिरव्या मिरच्या
- ओले खोबरे
- दाण्याचे कूट
- जिरे
- चवीपुरते मीठ
- तूप
बनविण्याची पद्धत:
- वरी तांदूळ आणि साबुदाणा एकत्र भिजवा
- पाण्याची पातळी साधारण साबुदाणा आणि वरी तांदूळ भिजून त्यावर किमान दोन इंच इतकी असावी आणि हे तुम्ही रात्रभर भिजवून ठेवा
- दोन्ही व्यवस्थित भिजल्यावर सकाळी मिक्सरमधून वाटून त्याची पेस्ट करून घ्या. हे वाटतानाच त्यात मिरची, जिरे, खोबरे, दाण्याचे कूट, मीठ सर्व मिक्स करावे. नेहमीच्या घावनाप्रमाणेच हे सारण सरसरीत करावे
- नॉनस्टिक तव्याला तूप लावा आणि घावन पसरवा आणि मग भाजून घ्या
- खोबऱ्याच्या चटणीसह खायला द्या
उपवासाचा बटाटावडा (Upvasacha Batatawada)
बटाटावडा म्हटलं की कोणाच्या तोंडाला पाणी सुटणार नाही असं होणारच नाही. तिखट लसूण असणारा बटाटावडा आपण नेहमीच खातो. पण उपवासाचा बटाटावडा तुम्ही घरी करून खाऊ शकता.
साहित्य:
- उकडलेले बटाटे
- चार – पाच हिरव्या मिरच्या
- लाल तिखट
- आल्याचे तुकडे
- वरीचे पीठे
- साबुदाणा पीठ पाव वाटी
- बेकिंग सोडा
- चवीनुसार मीठ
- तळण्यासाठी तेल अथवा तूप
बनविण्याची पद्धत:
- आधी उकडलेले बटाटे मॅश करन त्यात हिरवी मिरची पेस्ट, आल्याची पेस्ट अथवा तुकडे आवडीनुसार मिक्स करा. तेलावर हे परतून बटाट्यामध्ये घाला आणि तुम्हाला हवं असेल तर दाण्याचे कूटही घालू शकता. त्यात मीठ घाला. या मिश्रणाचा वड्याचा आकार करून घ्यावा
- वरी पीठ, साबुदाणा पीठ, मीठ, तिखट आणि सोडा मिक्स करून पाणी घालून भिजवून सारण करावे
- गोळे यात बुडवून वडे तळावेत
- खोबऱ्याच्या चटणीसह हे वडे चविष्ट लागतात
उपवासाचे भगर (वरीचा भात आणि आमटी) Upvasache Bhagar – Varicha Bhat Ani Amti)
वरीचा भात आणि आमटी हा उपवासाच्या पदार्थांमधील एक खास पदार्थ आहे. बऱ्याचदा एकादशीसाठी नक्कीच हा बेत आखला जातो.
भगरीकरिता साहित्य:
- एक वाटी भगर
- अर्धी वाटी शेंगदाणा कूट
- दोन जाड किसलेले बटाटे
- हिरव्या मिरच्यांचे तुकडे
- कोकम
- जिरे
- चवीनुसार मीठ आणि साखर
- साजूक तूप अथवा शेंगदाणा तेल
आमटीकरिता साहित्य:
- पाणी
- दाण्याचे कूट
- कोकम
- चवीनुसार मीठ आणि साखर
- फोडणीसाठी तूप, जिरे
बनविण्याची पद्धत:
- वरीचे तांदूळ धुवावेत
- तूप तापवावे त्यात जिरे, आल्याचे तुकडे, दाण्याचे कूट, मिरची घालावी आणि वरून वरीचे तांदूळ घालून त्यात पाणी ओतावे. त्यात मीठ, ओले खोबरे घालून शिजवावे
- त्यात कोकम आणि बटाट्याचा किस घालून ढवळावे. साखर आणि थोडं लाल तिखट घालावे. दोन वाफ काढाव्यात. गरम आमटीसह हे खावे
- आमटी बनविण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात कोकम, दाण्याचे कूट, लाल तिखट, मीठ, साखर हे वाटून घ्या
- एका भांड्यात तुपात जिरे घाला आणि वरील वाटण त्यात ओता. त्यात पाणी घाला आणि थोडी जाडसर आमटी करा. साधारण पाच मिनिट्स तरी उकळी येऊ द्या
सफरचंदाची रबडी (Apple Rabdi)
सफरचंद अथवा सफरचंदाची खीर आपण खाल्ली आहेच. पण उपवासासाठी तुम्ही सफरचंदाची रबडीही करून पाहू शकता.
साहित्य:
- क्रिम मिल्क
- साखर
- बदाम कापलेले
- वेलची पावडर
- सफरचंद
- दूध
बनविण्याची पद्धत:
- सफरचंदाचे साल काढा आणि किसून घ्या
- दूध आटवून घ्या (साधारण एक लीटरचे अर्धा लीटर होऊ द्या)
- दूध घट्ट झाल्यावर किसलेले सफरचंद आणि साखर मिक्स करा आणि उकळी द्या
- त्यात वेलची पावडर आणि बदाम तुकडे घाला आणि पुन्हा मंद आचेवर उकळी येऊ द्या
- तुमची सफरचंद रबडी तयार. हवी असल्यास, गरम खा अथवा फ्रिजमध्ये ठेऊन नंतर खाऊ शकता
उपवासाचे स्पाईसी पोटॅटो वेजेस (Upvasache Spicy Potato Wedges)
पोटॅटो वेजेस हे लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांनाच आवडतात. बऱ्याचदा हे घरी बनवता येतात का असा प्रश्न पडतो. पण उपवासाला तुम्ही बनवू शकता.
साहित्य:
- बटाटे
- लिंबाचा रस
- तिखट
- जिरे पावडर
- मीठ
- कोथिंबीर
- तळण्यासाठी तेल वा तूप
बनविण्याची पद्धत:
- बटाटे साल काढून त्याचे उभे जाडसर तुकडे करावेत
- तुपात वा तेलात तळून घ्यावे
- बाहेर काढल्यावर त्वरीत त्यावर लिंबाचा रस, जिरे पावडर, तिखट,मीठ आणि कोथिंबीर कापून पसरवावी
गरम गरम खायला द्यावे
उपवासाचे धिरडे (Upvasache Dhirde)
धिरडे हा असा महाराष्ट्रीय पदार्थ आहे जो वेगवेगळ्या पद्धतीने करता येतो. उपवासाचे धिरडेही तुम्हाला करता येईल.
साहित्य:
- एक वाटी भगर
- हिरव्या मिरच्या
- अर्धा वाटी साबुदाणा
- शेंगदाणे कूट
- तेल
- मीठ
बनविण्याची पद्धत:
- भगर आणि साबुदाणा साधारण दोन तास भिजवा.
- त्यानंतर पाणी काढा आणि त्यात हिरव्या मिरच्या, जिरे, मीठ, शेंगदाणे कूट एकत्र करून वाटून घ्या.
बाऊलमध्ये घट्ट कालवा. - चवीनुसार त्यात मीठ घाला
- पॅनवर तेल घाला आणि हे बॅटर पसरवा. मंद आचेवर धिरडे शिजू द्या. वाफेवर शिजले की परता आणि मग खोबऱ्याच्या चटणीसह खायला द्या.
निष्कर्ष –