घर स्वच्छ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या केरसुणीला हिंदू घरात खूपच जास्त महत्व असते. नवी केरसुणी आणल्यानंतर तिची पूजा करुनच मग तिचा वापर केला जातो. घरात केरसुणीची एक जागा ठरलेली असते. तिला इथे तिथे किंवा कसेही टाकले जात नाही. त्याला एक जागा असते. घरात असलेल्या केरसुणीला लक्ष्मी म्हटले जाते. त्यामुळे वास्तुशास्त्रात देखल केरसुणीसंदर्भात काही गोष्टी सांगितल्या जातात. त्या सगळ्यांना माहीत असायला हव्यात. घरात केरसुणी असेल तर तुम्हाला त्याचे काही नियम माहीत असायला हवेत
जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार कसं असावं स्वयंपाकघर
घरात केरसुणी महत्वाची
केरसुणी ही घरात फारच महत्वाची असते. केरसुणीचा वापर करुन घराची स्वच्छता केली जाते. घरी असलेल्या नकारात्मक उर्जेला झाडून काढण्याचे काम केरसुणी करते म्हणूनच केरसुणी ही फार महत्वाची समजली जाते. केरसुणी या वेगवेगळ्या प्रकारातील असतात. झाडू हे एक प्रकारच्या गवतापासून बनवले जाते. हल्ली प्लास्टिकच्या केरसुणीदेखील मिळतात. पण गवतापासून तयार झालेल्या केरसुणी या नेहमीच फायद्याचा असतात. त्यालाच जास्त महत्व असते. पारंपरिक पद्धतीचा झाडू हा फार महत्वाचा असतो.
घरात कोळी वाढले असतील तर असे करा सोपे उपाय
केरसुणीसंदर्भात पाळा हे नियम
केरसुणी संदर्भात तुम्ही काही नियम पाळणे हे नेहमीच गरजेचे असते. तुम्ही जर असे काही नियम पाळण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला ही गोष्ट माहीत असायला हवी.
- वास्तूच्या नियमानुसार झाडू हा घरात कधीही उलटा ठेवला जाऊ नये. जर तुम्ही घरात झाडू उलटा ठेवला तर घरात कलह वाढण्याची शक्यता असते. जर तुमच्याकडे सतत भांडण होत असतील तर तुम्ही झाडू कसा ठेवला आहे याची खात्री करुन घ्या.
- केरसुणी ही लक्ष्मी असते. त्यामुळे तिचे उघड उघड प्रदर्शन करु नये. झाडू हा नेहमी लपवून ठेवावा. ज्याप्रमाणे आपण लक्ष्मीला लपवून ठेवतो. अगदी त्याचप्रमाणे आपण केरसुणी लपवून ठेवावी. त्यामुळे घरातील लक्ष्मी टिकून राहील.
- नवीन घरात जाताना कधीही जुना झाडू घेऊन जाऊ नये कारण ते वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते. त्यामुळे अजिबात जुना झाडू घेऊन जाऊ नका.
- झाडू खराब झाला असेल तर नवा झाडू हा शनिवारी आणावा. कारण शनिवारी झाडू आणणे शुभ मानले जाते. त्यामुळे चांगल्या गोष्टी घडतात.
- झाडू हा गच्चीवर किंवा बाहेर ठेवू नये त्यामुळे घरात चोरी होण्याची शक्यता असते. त्यामुळे झाडू अशा ठिकाणी ठेवू नये.
- घरात जर लहान मुल हातात केरसुणी घेऊन केर काढत असेल तर त्या घरात पाहुणा येणार असे सांगितले जाते.
- एखाद्याला स्वप्नात झाडू दिसल्यास ते शुभ मानले जाते. त्याचे नशीब फळफळेल असे म्हणतात .
- झाडू आडवा ठेवावा तो लटकून आधांतरी मुळीच ठेवू नये
- स्वयंपाक घरात कधीही झाडू नेऊ नये कारण ते अशुभ मानले जाते.
आता केरसुणी संदर्भात या गोष्टी सगळ्यांनी कायम लक्षात ठेवाव्यात
Vastu Tips: घराच्या मुख्य दारावर ठेऊ नका या गोष्टी, धनहानी होण्याची शक्यता