वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजाजवळ सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेचा स्रोत असतो. हे केवळ प्रवेशद्वारच नाही तर अशी जागा आहे जिथे आपण बाहेरून आतमध्ये प्रवेश करताना लक्ष्मी आणि चांगल्या नशीबाने प्रवेश करतो. त्यामुळे घराचे मुख्य प्रवेशद्वारे हे नेहमीच स्वच्छ असायला हवे आणि नेहमीच सजवून ठेवलेले असायला हवे. यामुळे घरात लक्ष्मीमातेसह सकारात्मक उर्जेचाही घरात प्रवेश व्हावा हीच इच्छा असते. पण बऱ्याचदा घराच्या मुख्य दरवाजाजवळ अशा काही गोष्टी ठेवल्या जातात ज्यामुळे लक्ष्मी रूसते असतेही वास्तुशास्त्रात सांगण्यात येते. यामुळे आर्थिक स्थिती खराब होते. तुम्हाला धनहानी नको असेल तर काही गोष्टी या पाळायलाच हव्यात. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मुख्य दरवाजाजवळ ठेवणे तुमच्यासाठी नुकसानदायी ठरू शकते ते जाणून घ्या. या वास्तुटिप्सचा वापर तुम्ही तुमच्या घरासाठीही करू शकता.
घराच्या मुख्य दरवाजाजवळ ठेऊ नका चप्पल
असं म्हटलं जातं की, घराच्या मुख्य दरवाजा हा लक्ष्मी मातेचे प्रवेशद्वार आहे. त्यामुळे हे स्थान अत्यंत स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे, ज्यामुळे घरात नियमित लक्ष्मी येऊ शकते. घराच्या मुख्य दरवाजावर चुकूनही तुम्ही चप्पल ठेऊ नका. तसंच तुम्ही घराच्या मुख्य दरवाजाजवळ चपलांचे कपाटही ठेऊ नका. असं केल्यामुळे लक्ष्मीचे येणे बंद होत आणि घरात आर्थिक हानी होऊ लागते. प्रवेश द्वाराजवळ चप्पल ठेवल्यास, घरात आर्थिक खर्च वाढतात आणि पैशाची आवक कमी होते असंही मानले जाते.
कधीही दरवाजाजवळ ठेऊ नका मनी प्लांट
बरेच जण घराच्या सजावटीसाठी मनी प्लांट घराच्या मुख्य दरवाजापाशी ठेवतात. मात्र असं करणे वास्तुशास्त्रानुसार योग्य नाही. कारण मनी प्लांट हे पैशाचे झाड मानले जाते आणि मुख्य दरवाजाजवळ ठेवल्याने यावर सर्वांची नजर जाते. ज्यामुळे घरातील धनसंपत्ती विनाकारण कमी होऊ लागते. याशिवाय काही जण मनी प्लांटची पाने अथवा त्याची डहाळी तोडून आपल्या घरात लावतात यामुळेही घरातील आर्थिक स्थितीवर परिणाम होताना जाणवतो. घरातील मुख्य दरवाजावर काटेरी झुडपंही लाऊ नयेत. त्यामुळे घरातील माणसांमध्ये सौख्य राहत नाहीत असंही मानले जाते. सतत घरात भांडणतंटा होत राहतो.
घराच्या मुख्य दरवाजाजवळ ठेऊ नका लक्ष्मीची मूर्ती
वास्तुशास्त्रानुसार मानण्यात येते की, घराच्या मुख्य दरवाजावर लक्ष्मीची कोणत्याही पद्धतीची मूर्ती अथवा चित्र लाऊ नये. जर अशी मूर्ती स्थापन करण्यात आली तर त्याची नियमित पूजा व्हायला हवी. पण घराच्या बाहेर लक्ष्मी लावली तर त्याची पूजा होत नाही आणि लक्ष्मीचे मुखही बाहेरच्या दिशेने असणे चांगले नाही. आतील संपत्ती बाहेर जाऊ लागते असंही म्हणतात. त्यामुळे सहसा लक्ष्मीची मूर्ती वा फोटो घराच्या दरवाजावर लाऊ नये.
अधिक वाचा – घरात शांतता राहण्यासाठी वास्तु शास्त्र टिप्स मराठीत (Vastu Shastra Tips For Home In Marathi)
मुख्य दरवाजाजवळ कचरा ठेऊ नये
बरेचदा काही लोक आपल्या घरातील कचरापेटी ही दरवाज्या मुख्य दरवाजाजवळ बाहेर ठेवतात. पण प्रवेशद्वारानेच लक्ष्मी येत असल्याने कचरा या ठिकाणी ठेऊ नये असे सांगण्यात येते. कचरा असेल त्या ठिकाणी लक्ष्मी वास्तव्य करत नाही असा समज आहे. तसंच जास्त प्रमाणात आर्थिक हानी होते. याशिवाय आतबाहेर करणाऱ्याचे लक्षही सतत कचऱ्यावर जाऊन बुद्धीवर त्याचा परिणाम होतो आणि घरातील भांडणाला कारणीभूत ठरते.
घरातील प्रवेशद्वारावर ठेऊ नका तुटलेले सामान
बऱ्याचदा काही जण आपल्या घरातील तुटलेले सामान बाहेर काढल्यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशदाराजवळ ठेवतात. असं केल्याने येता जाता माणसांची नजर सामानावर पडते आणि हे आर्थिक हानीचे कारण होते. घरातील आर्थिक स्थिती व्यवस्थित ठेवायची असेल तर कधीही तुटलेले सामान अर्थात तुटलेले फर्निचर, खराब इलेक्ट्रॉनिकचे सामान अथवा कोणतेही तुटलेले छोटे मोठे सामान मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेऊ नये.
अधिक वाचा – जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार कसं असावं स्वयंपाकघर
कोणतीही झाडू ठेऊ नका
झाडू हे लक्ष्मीचे रूप मानण्यात येते. त्यामुळे झाडूला कधीही पायांचा स्पर्श होऊ देऊ नका. याशिवाय झाडू घरातील नेहमी अशा ठिकाणी ठेवावी जे दुसऱ्यांच्या नजरेत भरणार नाही. त्यामुळे घराच्या मुख्य दरवाजाजवळ झाडू ठेऊ नयेत. लोकांच्या दृष्टीमुळे घरातील आर्थिक स्थिती खराब होते. तसंच घराच्या बाहेर झाडू ठेवल्यास घरातील लक्ष्मी निघून जाते.
घराचे मुख्य दार कसे असावे
- घराचे मुख्य दार नेहमी उत्तर, उत्तर – पूर्व अथवा पश्चिम दिशेला उघडेल अशा स्वरुपात असावे. कारण वास्तुच्या दृष्टीने या दिशा योग्य मानण्यात आल्या आहेत. दक्षिण, दक्षिण – पश्चिम, उत्तर – पश्चिम अथवा दक्षिण – पूर्व या बाजूला मुख्य द्वार असू नये. अशा दिशेला दरवाजा असणे हे घरातील मुख्य माणसासाठी चांगले नाही आणि घरात आजाराचेही कारण असते
- मुख्य दरवाजावर गणपती अथवा कोणत्याही देवाचे फोटो वा मूर्ती असू नयेत. तसेच गणपतीची पाठ दिसेल अशी मूर्ती ठेऊ नये
- मुख्य दरवाजावर मूर्तीपेक्षा लक्षमीची घराच्या आतल्या दिशेने जाणारी पावले लावावी. यामुळे अधिक प्रगती होते
- मुख्य दरवाजावर सुंदर आणि सजावट असणारी झाडे लावावी. जेणेकरून घरात सकारात्मक उर्जा येईल
वरील टिप्स आणि माहिती ही वास्तुशास्त्राच्या अभ्यासानुसार देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही याचा तुमच्या घरासाठी उपयोग करून घेऊ शकता.
अधिक वाचा – Vastu Tips: घरातील घड्याळाचा आकार बदलते तुमचे नशीब
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक