ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
भाजी मसाला

बोअरींग भाज्यांमध्ये जरासा हा मसाला घाला…बोट चाटत राहाल

 भाज्या हा खूप जणांसाठी एकदम नावडीचा विषय असतो. खूप जणांना भाज्या खायला अजिबात आवडत नाही. अशावेळी मुलांसाठी भाज्या कशा करायच्या.डब्यासाठी भाज्या कशा करायच्या हे कळत नाही. पडवळ, शिराळी, वांगी, तोंडली अशा भाज्या आरोग्यासाठी खूपच चांगल्या असतात.  आज आम्ही भाज्यांसाठी असा एक मसाला तयार केला आहे. ज्याच्यामुळे तुमची भाजी ही मस्त होईल याची गॅरंटी आम्हाला आहे. 

Samosa Recipe In Marathi | खुसखुशीत आणि चविष्ट समोसा रेसिपीज मराठी

मस्त सुका मसाला

मस्त सुका मसाला

अनेकदा भाज्या या डब्याला न्यायच्या असतात किंवा फुलक्यासोबत खाताना सुक्या भाज्या खायला अनेकांना आवडतात. अशावेळी काही खास भाज्यांना तुम्हाला सुका मसाला वापरता येतो. त्यामुळे भाजी एकदम चविष्ट होते 

साहित्य:  एक वाटी शेंगदाण्याचे कूट, ¼ चमचा धण्याची पूड, हळद, लाल तिखट, गोडा मसाला, मीठ

ADVERTISEMENT

कृती:  शेंगदाणे चांगले भाजून घ्या. शेंगदाणे चांगले भरडून मिक्सरमध्ये त्याचे जाड शेंगदाणा कूट घ्या. त्यामध्ये धण्याची पूड, हळद, लाल तिखट, गोडा मसाला आणि मीठ घालून सगळे एकत्र करुन एक मसाला तयार करुन घ्या.
आता हा तयार सुका मसाला तुम्ही ज्यावेळी भाजी तयार कराल. त्यावेळी छान भुरभुरा. शेंगदाणे चांगले शिजले आणि मसाले तेलात परतले की, त्याचा एक खमंग वास सुटतो. त्यामुळे  कोणतीही भाजी सुंदरच लागते. 

घरात उरलेल्या भाज्यांपासून बनवा मिक्स व्हेज भाजी, अशी करा स्वादिष्ट

ओला चटपटीत मसाला

वांगी मसाला

जर तुम्हाला शेंगदण्याचा मसाला नको असेल तर तुम्ही ओल्या खोबऱ्याचा वापर करुन देखील तुम्ही मस्त ओला चटपटीत मसाला करु शकता. साहित्य:  एक वाटी ओलं खोबरं, अर्धी वाटी सुकं खोबरं, लाल तिखट, हळद, मीठ, चिचेंचा कोळ, गूळ
कृती : एखादी ग्रेव्हीची भाजी करायची असेल तर तुम्ही मस्त ओला चटपटीत आणि राहणारा असा मसाला करायला हवा. तव्यावर खोबरं, सुकं खोबरं चांगले परतून घ्या. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही त्यामध्ये आलं-लसूण पेस्ट घाला. मिश्रण चांगले एकजीव झाल्यावर तुम्ही  ते छान वाटून घ्या. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले घाला. चिंचेचा अगदी थोडासा कोळ आणि गूळ घातला की त्याची चव चांगली लागते. जर तुम्हाला रस भाजी खायला आवडत असेल तर तुम्ही हा मसाला वापरुन रसभाजी देखील करु शकता.  ही भाजी मस्तच चटपटीत आणि चांगली लागते.

आता तुम्हाला थोड्या वेगळ्या भाज्या करायच्या असतील तर तुम्ही अगदी नक्कीच हा मसाला करायला हवा.

ADVERTISEMENT

पालकची तीच तीच भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर

31 Jan 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT